Saturday, 30 March 2019

OROP - 2018 will not Benefit Majors, JCOs / OR - Brig CS Vidyasagar (Rtd)

Dear Sir,

1. OROP – 2018 is to be implemented w.e.f. Jul 2019. From the past experience of OROP – 2013, the PCDA (Pensions) Allahabad will make a circular similar to Circular 555. A number of anomalies cropped up in OROP – 2013 and Justice L Narasimha Reddy, Chairman of Single Man Judicila Committee submitted his report on anomalies in OROP – 2013 to Min of Def on 26 Sep 2016. It lies buried in the Min of Def. The achievement of Min of Def from 26 Sep 2016 till date is the report is under consideration of Committee of Joint Secretaries from PMO, Min of Def and Min of Fin. May be each of them will be awarded Ph D in OROP by Delhi University for their new findings of OROP.

2. The rationale applied by Def Accts Dept is basically to deny benefit of OROP. They criterion applied by them is as under: -

(a) Pension of earlier retirees is same as Average pension of those who actually retired in calendar year 2013. The result : -

(a) There is no benefit of OROP to MNS Officers as none retired in the rank of Maj due to AVS Committee w.e.f. 18 Dec 2004 promoting all who put in commissioned service of 13 years.

(b) Pension of all Majors who retired prior to 2013 was fixed with same pension of lone Major with 22 years’ service. All Pre – 2013 Majors with service more than 22 were fixed pension of Rs 23,815 pm.

(c) Reservists were excluded from OROP as there was no reservist retired in 2013. Reservists are the ones who should have been given highest priority for OROP. The list of anomalies is too long.

(d) TSEWA projected 42 anomalies in OROP – 2013 to Justice L Narasimha Reddy when he visited AF Station, Hakimpet, Secunderabad on 19 Sep 2016.

(b) Pension of senior is fixed same as junior if senior did not retire in 2013.

(c) Pension of junior was reduced by 3% of senior if no junior was found to retire in 2013.

3. DAD will adopt the same criterion in OROP – 2018 unless another committee goes over the recommendation of committee of Joint Secretaries on OROP - 2013. It will take inordinate time to rectify all anomalies.

4. Modified Assured Career Progression w.e.f. Jan 2006 helped JCOs / OR to get higher pay. But Min of Def has not extended the benefit to Pre – 2006 JCOs / OR.. The result is none of the Post – 2006 Sepoys retire in the rank of Sepoy and Naik. Therefore in 2018 you will find Pre – 2006 Sepoys and Naiks will be excluded from benefit of OROP - 2018. So is Majors. Their pensions in all likelihood will be revised only in 8th CPC i.e. 2026.

5. TSEWA is burdened with 30 cases filed / to be filed in AFT Delhi and other regional benches. In the interest of welfare of JCOs / OR, I suggest some officers should take a lead and file cases in all regional benches of AFTs and also principal bench in Delhi to fight for justice to Majors and JCOs / OR. Most of the AFTs are discouraging class action suits. Therefore, individual OAs need to be filed..

6. Few Pre – 2006 Sepoys and Naiks and their equivalents also should file cases in all regional benches and also in Principal bench Delhi for not availing benefit of OROP.

7. I have no faith in Min of Def to ever help faujis. It is veteran community only has to help themselves if they want justice. If you want to suffer in silence, choice then is yours. I have done my bit by enlightening you what injustice some of you are suffering. Rest is upto you take a call to follow my suggestion to approach AFTs or just enjoy your evening drink.

8. If you want to correspond with me then do send me a mail on my given e-mail id..

e-mail id: csvidyasagar@gmail..com

Warm Regards,

Brig CS Vidyasagar (Rtd)

TSEWA- 140

040-48540895
9493191380 (Mobile connectivity is very poor in my residential complex. Use Land line please)

Pl See T SEWA Blog for regular updates at https:// www.tsewa.org

Monday, 4 March 2019

जवानांच्या हाती आता 'एके-203'; रशियासोबत करार


वृत्तसंस्था

अमेठी ः उत्तर प्रदेशातील अमेठी येथील कलाश्‍निकोव्ह रायफल निर्मिती युनिटमध्ये तयार झालेल्या 'एके-203' रायफली आता आमच्या सैनिकांच्या हाती येणार असून, या माध्यमातून ते दहशतवादी आणि नक्षलवाद्यांशी दोन हात करू शकतील. बंदूक निर्मितीचा कारखाना ही अमेठीची नवी ओळख असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे सभेत बोलताना केले. पंतप्रधानांच्या हस्ते या वेळी रायफल निर्मिती कारखान्याचा शुभारंभही झाला.

'एके-203' ही जगातील अत्याधुनिक बंदूक असून, भारत आणि रशियाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या कोरवा दारूगोळा कारखान्यात ती तयार होणार आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या सहकार्यामुळे कमी वेळेत हा कारखाना उभा राहू शकला असे सांगत त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही कठोर शब्दांत टीका केली. राहुल यांनी 2007 मध्ये या कारखान्याची पायाभरणी केली होती, तेव्हा त्यांनी येथील काम 2010 मध्ये सुरू होईल असे जाहीर केले होते. पण त्यांचे सरकार या कारखान्यामध्ये नेमके कोणत्या प्रकारची शस्त्रे निर्मिती होणार हे निश्‍चित करू शकले नाही.

काही मंडळी मते मिळाल्यानंतर लोकांना विसरून जातात, लोकांना गरिबीतच ठेवण्यात त्यांना रस असतो, कारण त्यांच्या प्रत्येक पिढीला "गरिबी हटाओ'ची घोषणा देता येते. आता भविष्यामध्ये अमेठी ही येथे येणाऱ्या नेते मंडळींसाठी नाही, तर विकासकामांसाठी ओळखली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

जम्मू काश्‍मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा


श्रीनगर: जम्मू काश्‍मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तब्बल 56 तास चाललेल्या चकमकीमध्ये सुरक्षा जवानांनी या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्तर काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातल्या बाबागुंड भागात दहशतवादी असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात शोधमोहिम सुरु केली होती.

शुक्रवारी सकाळी सुरु झालेल्या त्या शोधमोहिमेदरम्यानच ही चकमक सुरु झाली होती. हे दहशतवादी संबंधित असलेली संघटना आणि त्यांची ओळख पटवली जात आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र या दहशतवाद्यांसंदर्भात अधिक तपशील अधिकाऱ्यांनी दिला नाही.

या चकमकीदरम्यान 2 पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे दोघेजण शहिद झाले होते. यामध्ये 'सीआरपीएफ'च्या एका निरीक्षकाचाही समावेश होता. या चकमकीमध्ये एक नागरिकही मरण पावला होता. यासंदर्भातील अधिक तपशील उपलब्ध होणे बाकी आहे.

सीमेवर लढण्याची परवानगी द्या ! 75 वर्षीय माजी सैनिकाची पत्राद्वारे मागणी


1971च्या भारत पाक युद्धात होते सहभागी

कोल्हापूर: भारत-पाकिस्तानमध्ये काही दिवसांपासून सुरू असलेल्या तनावपूर्ण वातावरणामुळे आम्हाला इथे झोप लागत नाही. जगाच्या नकाशातून पाकिस्तानचे नाव मिटवले पाहिजे. जोपर्यंत त्यांना धडा शिकवणार नाही तोपर्यंत समाधान मिळणार नाही. त्यामुळे मला सीमेवर लढण्याची परवानगी द्या, अशा मागणीच्या उल्लेखाने पत्र लिहिले आहे 75 वर्षीय माजी सैनिकांचे ..!

होय हे खरे आहे. या 75 वर्षीय माजी सैनिकांचे नाव आहे गजानन दत्तात्रय पाटील. कागल तालुक्‍यातील यमगे गावचे ते रहिवासी. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली आहे. भारताने या भ्याड हल्ल्याचा बदला घेतला. पण, पाकिस्तानचा नामोनिशाणच जगाच्या नकाशातून मिटवला पाहिजे, अशा संतप्त भावना गजानन पाटील या माजी सैनिकाने लिहिलेल्या पत्रातून उमटल्या आहेत.

पाटील हे एवड्यावरच थांबले नाहीत तर आम्हाला सीमेवर लढण्याची परवानगी द्या, माझ्यासोबत कागल तालुक्‍यातील शेंदुर गावचे माजी सैनिक तुकाराम शेवाळे हे सुद्धा यायला तयार आहेत, अशी सुद्धा मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. जिल्हा सैनिक कल्याण मंडळाकडे त्यांनी हे मागणीचे पत्र पाठवले आहे. विशेष म्हणजे या पत्रच्या शेवटी आम्ही आपल्या ऑर्डरची वाट पाहत बसलो आहोत, असाही उल्लेख केला आहे. या वयातसुद्धा त्यांचा पाकिस्तान विरोधातील त्वेष आणि राष्ट्रा प्रती असलेले प्रेम यातून प्रकट होते.

'काश्‍मीर भारताचा अविभाज्य घटक'


पीटीआय

नवी दिल्ली : काश्‍मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनच्या (ओआयसी) ठरावावर भारताने आज परखड प्रतिक्रिया व्यक्त केली. जम्मू आणि काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून, येथील समस्या ही पूर्णपणे देशांतर्गत बाब असल्याचे भारताने ठणकावून सांगितले.

"ओआयसी' या इस्लामिक देशांच्या संघटनेची बैठक नुकतीच अबुधाबी येथे पार पडली. या बैठकीचा समारोप काश्‍मीरप्रश्नी पाकिस्तानला पाठिंबा दर्शविणाऱ्या ठरावाने झाला. काश्‍मीरमध्ये भारताकडून मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवत दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी या समस्येचे निराकरण महत्त्वाचे असल्याचे "ओआयसी'ने ठरावात म्हटले आहे; तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची आठवण आंतरराष्ट्रीय समुदायाला करून देण्याचा उल्लेखही यात असल्याचा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया व्यक्त करत काश्‍मीर भारताचा अविभाज्य घटक असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, या बैठकीला प्रथमच भारताला निमंत्रित करण्यात आले होते. ही बाब न रुचल्याने पाकिस्तानने या बैठकीकडे पाठ फिरवली होती.

Sunday, 3 March 2019

भारत आता 'चून-चून के बदला लेता है' : पंतप्रधान


वृत्तसंस्था

पटणा : देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांसाठी भारत आता गप्प बसत नाही. तर 'चून-चून के बदला लेता है', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच हवाई दलाकडून करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत विरोधकांकडून पुरावे मागितले जात आहेत, त्यावरही मोदींनी टीकास्त्र सोडले.

पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र, आता विरोधकांकडून या कारवाईचे पुरावे मागितले जात आहेत. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून भारतीय लष्कराचे खच्चीकरण का केले जात आहे? तसेच ज्या विधानांमुळे आपल्या शत्रूला फायदा होतो, अशी विधाने त्यांच्याकडून का केली जात आहेत, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकबाबत शंका नाही. पण अमेरिकेने लादेनचा खात्मा केल्यानंतर त्याचे पुरावे जगासमोर सादर केले होते. त्याचप्रमाणे भारतानेही एअर स्ट्राइकचे भक्कम पुरावे सादर करावेत, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर पंतप्रधान मोदींनी टीकास्त्र सोडले.

सैनिकांसाठी युवकाची सायकलने भारत भ्रमंती

आर्णी (जि. यवतमाळ) - जीवनाचे सार्थक करण्यासाठी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ध्येय निश्‍चित करून त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यास यश हमखास मिळतेच. देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करणाऱ्या लढाऊ सैनिकांच्या सन्मानासाठी दिल्ली येथील २३ वर्षीय तरुण संपूर्ण भारतभर सायकलने भ्रमंती करीत आहे. आफताब फरेदी असे त्याचे नाव आहे. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसूनही केवळ भारतीय सैनिकांना सन्मान मिळावा म्हणून तो भारतभ्रमण करीत आहे.

देश भ्रमंतीसाठी निघालेला सायकलपटू आफताब.

आर्णी (जि. यवतमाळ) - जीवनाचे सार्थक करण्यासाठी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ध्येय निश्‍चित करून त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यास यश हमखास मिळतेच. देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करणाऱ्या लढाऊ सैनिकांच्या सन्मानासाठी दिल्ली येथील २३ वर्षीय तरुण संपूर्ण भारतभर सायकलने भ्रमंती करीत आहे. आफताब फरेदी असे त्याचे नाव आहे. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसूनही केवळ भारतीय सैनिकांना सन्मान मिळावा म्हणून तो भारतभ्रमण करीत आहे.

दिल्ली येथील इंडिया गेटजवळून २६ ऑगस्ट २०१८ रोजी भारत भ्रमणासाठी आफताब सायकलने निघाला. मागील सहा महिन्यांत १८ राज्यांमधून १७ हजार ९०० किलोमीटर प्रवास त्याचा झाला आहे. रोज शंभर ते दीडशे किलोमीटर तो प्रवास करीत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही केवळ सैनिक सन्मानासाठी तो सायकलने प्रवास करीत आहे. प्रत्येक शहरात जाऊन सैनिकांचे मनोबल व त्यांच्या सन्मानासाठी सायकलस्वारी करीत आहे. १५ जून रोजी ही सायकलयात्रा पूर्ण होणार आहे. यामध्ये तो ३० हजार किलोमीटर अंतर पूर्ण करणार असून, त्याला त्याचे नाव ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवायचे आहे.

हा प्रवास अतिशय खडतर आणि आव्हानात्मक आहे. रोजच्या या धकाधकीच्या जीवनात आपले अस्तित्व टिकवणे कठीण असताना आफताब फरेदी सैनिकांचा सन्मान आणि देशाचे नाव सायकलस्वारीत मोठे करण्यासाठी निघाला आहे. यवतमाळहून नांदेडला जात असताना शुक्रवारी (ता. एक) सकाळी सहाला तो आर्णी शहरात पोहोचला. आर्णी सायकलिंग क्‍लबच्या सदस्यांना भेटून त्याने मार्गदर्शनही केले.

ध्येयाने झपाटलेला माणूस काहीही करू शकतो. म्हणून मी माझे ध्येय निश्‍चित केले आणि ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. रस्त्यावर गवत खाऊन राहिलो, कधी कधी उपाशीच प्रवास केला, स्मशानभूमीत झोपलो. लोकांच्या सहकार्याने हा प्रवास चालू आहे. शेवटी सैनिकांचा आत्मसन्मान आणि देशाचे नाव मोठे करण्यासाठी माझी लढाई सुरू आहे.
- आफताब फरेदी सायकलस्वार, दिल्ली.

https://www.esakal.com/vidarbha/aaftab-faredi-cycler-journey-army-soldier-174269

प्रहारामागची वज्रमूठ - एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक (निवृत्त)

हवाई दलाचा वापर म्हणजे युद्धाचं शेवटचं टोक हा पारंपरिक युद्धपद्धतीचा दृष्टिकोन आधुनिक काळात मोडीत निघाला आहे. अत्यंत कमी वेळेत पाकिस्तानला नेमका झटका देऊन भारताची सामरिक शक्ती आणि त्याला थेट संदेश देण्यासाठी भारतानं वीस वर्षांनंतर प्रथमच हवाई दलाच्या क्षमतेचा अचूक वापर केला. हा वज्रप्रहार नेमका कसा झाला, त्यासाठी काय काळजी घेण्यात आली, या मोहिमेची वैशिष्ट्यं काय आदी गोष्टींचा वेध.

retired air chief marshal p v naik

हवाई दलाचा वापर म्हणजे युद्धाचं शेवटचं टोक हा पारंपरिक युद्धपद्धतीचा दृष्टिकोन आधुनिक काळात मोडीत निघाला आहे. अत्यंत कमी वेळेत पाकिस्तानला नेमका झटका देऊन भारताची सामरिक शक्ती आणि त्याला थेट संदेश देण्यासाठी भारतानं वीस वर्षांनंतर प्रथमच हवाई दलाच्या क्षमतेचा अचूक वापर केला. हा वज्रप्रहार नेमका कसा झाला, त्यासाठी काय काळजी घेण्यात आली, या मोहिमेची वैशिष्ट्यं काय आदी गोष्टींचा वेध.

काश्‍मीरमधल्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं कुरघोडी करायचा. आपणही तेवढ्यापुरतं प्रत्युत्तर देत होतो. दहशतवाद्यांच्या माध्यमातून छुपं युद्ध करून भारताच्या खोड्या काढण्याचा उद्योग पाकिस्ताननं सातत्यानं सुरूच ठेवला आहे. काश्‍मीर खोऱ्यातल्या उरीच्या लष्करी तळावर झालेला दहशतवादी हल्ला हादेखील याच शृंखलेचा एक भाग होता. उरी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या विरोधातली कारवाईची व्याप्ती वाढवण्यासाठी "सर्जिकल स्ट्राईक' केला; पण त्यातून पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी कोणता धडा घेतल्याचं दिसत नाही, तसंच तिथलं लष्कर आणि "इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स' (आयएसआय) यांनाही सर्जिकल स्ट्राईकमधून भारतानं दिलेल्या संदेशाचा अर्थ उलगडल्याचं दिसलं नाही. उलट त्यानंतरही जैशे महंमद या दहशतवादी संघटनेनं ता. 14 फेब्रुवारीला केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर पुलवामा इथं आत्मघातकी हल्ला केला. त्यामुळं "पाकिस्तानच्या या कुरघोडींना आपण करत असलेला प्रतिकार निश्‍चितच पुरेसा नाही. तो अगदीच तोटका पडत आहे. पाकिस्तानच्या दीर्घकाळ लक्षात राहील असा धडा त्यांना शिकविला पाहिजे,' असं राज्यकर्त्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांनाच असं वाटत होतं. पुढचा कोणताही हल्ला करताना पन्नास वेळा विचार करतील, अशा प्रकारे पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देणं आवश्‍यक झालं होतं. त्यातून पाकिस्तानातल्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर हवाई हल्ला करण्याचा निर्णय भारताला घ्यावा लागला.
भारतीय लष्करानं गेल्या वर्षी सर्जिकल स्ट्राईक करून प्रत्यक्ष नियंत्रणरेषेच्या खूप जवळ असलेलं दहशतवाद्यांचे लॉंचिंग पॅड उद्‌ध्वस्त केलं होतं. याच लॉंचिंग पॅडवरून दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करतात. अशा नेमक्‍या ठिकाणी लष्करानं सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं. त्यात आपले सर्व जवान सुखरूप भारतात परतले. लष्कराला अशा प्रकारची कारवाई फक्त नियंत्रणरेषेच्या जवळच करता येते- कारण त्यांना दहशतवादी तळ उद्‌ध्वस्त करून पुन्हा पटकन आपल्या हद्दीत येणं आवश्‍यक असतं. मात्र, या वेळी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपण हवाई हल्ल्याचं अस्त्र बाहेर काढलं. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेच्या जवळचे दहशतवाद्यांचे लॉंचिंग पॅड उद्‌ध्वस्त करण्यासाठी यापूर्वीच सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यामुळं पुलवामा हल्ल्यानंतर भारत तशाच प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक करेल, अशी एक शक्‍यता त्यांना वाटत होती. या शक्‍यतेच्या पुढं जाणारं लक्ष्य निश्‍चित करणं यावेळी आवश्‍यक होतं.

का निवडला हवाई हल्ल्याचा पर्याय?
हवाई दलाची खास वैशिष्ट्यं आहेत. ती लष्कर आणि नौदलाकडे नाहीत. त्यांना त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोचण्यासाठी वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला मारत पुढं जावे लागते. देशाच्या सीमेपासून आतमध्ये असणाऱ्या "लीडरशिप' आणि "स्ट्रॅटेजिक' लक्ष्यापर्यंत ही दलं थेट पोचू शकत नाहीत. हे काम फक्त हवाई दल करू शकतं. उड्डाण केल्यानंतर त्याच दिवशी थेट निश्‍चित केलेल्या लक्ष्यापर्यंत पोचण्याची क्षमता हवाई दलाकडे असते. पुलवामा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना लक्ष्य करण्याचा निर्णय झाला. मात्र, लॉंचिंग पॅडप्रमाणं ही केंद्रं नियंत्रणरेषेच्या जवळ नव्हती, तर नियंत्रणरेषेपासून खूप आतमध्ये घनदाट जंगलांमध्ये होती. तिथं लष्कराला पाठवून हल्ला करण्यापेक्षा निश्‍चित केलेलं लक्ष्य वेधण्यासाठी हवाई हल्ल्याचा वापर करण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला.

हवाई दल अत्यंत चपळ असतं. निश्‍चित केलेलं लक्ष्य उडवून क्षणार्धात ही लढाऊ विमानं गिरकी घेऊन आकाशात दिसेनाशीही होतात; तसंच त्यांचा वेगवेगळ्या कारणांसाठी वापर केला जातो. जमीन, जंगल, उंच पर्वतशिखरं अशा कोणत्याही भूप्रदेशात युद्ध करण्याची क्षमता हवाई दलाकडे असते.
रणगाडे असोत, की युद्धनौका- त्यांच्या मारक क्षमतांना काही मर्यादा असतात. त्यांना ठराविक वजनापेक्षा जास्त स्फोटकांचा मारा करणं तांत्रिकदृष्ट्या शक्‍य नसतं; पण एअर स्ट्राईकमध्ये वापरलेल्या "मिराज 2000'मधून आपण दोन हजार पौंडांचा बॉंबगोळा अवघ्या दहा सेकंदांमध्ये आपल्या लक्ष्यावर अचूकपणे टाकला. यातून शत्रूला मोठा झटका बसला. हा "शॉक इफेक्‍ट' फक्त हवाई दल देऊ शकतं. शिवाय, हवाई दलाचा वापर केल्यानं पुलवामा हल्ल्याची आपण किती गांभीर्यानं नोंद घेतली आहे, याचा थेट संदेश पाकिस्तानाला यातून आपण दिला आहे.

वीस वर्षांनंतर हवाई दलाचा वापर
भारतानं सन 1971 च्या युद्धात हवाई दलाचा वापर केला होता. पूर्व पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा करताना पूर्वेकडच्या; तसंच त्यानंतर पश्‍चिम आघाडीवरही हवाई दलाचा प्रभावी वापर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केला होता. त्यानंतर सन 1999 मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानविरुद्ध पुन्हा हवाई दल वापरण्यात आलं. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नियंत्रणरेषा न ओलांडण्याची सूचना केली होती. त्यावेळी उत्तुंग हिमशिखरांवर पाकिस्ताननं केलेली घुसखोरी परतवण्यासाठी हवाई दलानं आकाशात भराऱ्या घेतल्या होत्या. त्यामुळं सन 1971 नंतर म्हणजे 48 वर्षांनंतर प्रथमच भारतीय हवाई दलानं नियंत्रणरेषा ओलांडून पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला केला.

असा होता तीनही दलांचा समन्वय
युद्धकाळात किंवा एअर स्ट्राईकसारख्या मोहिमांमध्ये तीनही दलांमधील समन्वय महत्त्वाचा असतो. या मोहिमेध्येही निश्‍चितपणे तो होता. पाकिस्तानातल्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करण्यासाठी उड्डाण केलेली "मिराज 2000' ही लढाऊ विमानं आणि हवाई दल हे सतत एकमेकांशी संपर्कात होतेच; पण त्याच वेळी लष्कर आणि नौदल हेदेखील सतर्क होते. मिराज ज्या मार्गावरून उड्डाण करणार होती, त्या मार्गावरच्या लष्कराच्या सर्व तळांना सज्ज करण्यात आलं होतं. जमिनीवरून आकाशात मारा करणारी आयुधं काही अंशांमध्ये जमिनीकडं झुकवण्यात आली होती. आपलंच विमान पडू नये, ही काळजी त्यातून घेतलेली होती. लष्करी गुप्तचर संस्थांकडून; तसंच नागरी गुप्तचर यंत्रणांकडून वेळोवेळी मिळालेली माहिती तीनही दलांना पाठवली जाते.

असं केलं लक्ष्य निश्‍चित
दहशतवादी तळांवर हल्ला करताना तो नेमका कुठं करायचा, याची अचूक माहिती मिळवण्याचं काम गुप्तचर यंत्रणा करत असतात- कारण हल्ला करण्याच्या ठिकाणी दहशतवादी असले पाहिजेत, तरच त्याचं महत्त्व आहे. हे काम माणसाशिवाय होऊ शकत नाही. बालाकोट, मुज्जफराबाद आणि चाकोटी या तीनही ठिकाणचं लक्ष्य या पद्धतीनं निश्‍चित करण्यात आलं होतं. हे लक्ष्य निश्‍चित केल्यानंतर मानवी गुप्तचर यंत्रणांबरोबरच "इलेक्‍ट्रॉनिक इंटेलिजन्स'चा वापर केला जातो. त्यासाठी आधुनिक काळात अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. त्यात उपग्रहांतून घेतलेली छायाचित्रं उपयुक्त ठरतात. हल्ला करण्याच्या ठिकाणी काही हालचाली होत आहेत का, तिथं वाहनं आहेत का या गोष्टींतून त्या भागात काहीतरी हालचाली सुरू आहेत, याचा अंदाज आपल्याला येतो. ही सगळी माहिती घेतल्यानंतर त्या भागात शत्रूनं कोणती रडार लावली आहेत, शत्रू कोणत्या प्रकारे पाळत ठेवतो, तो किती सतर्क आहे, रडारची फ्रिक्वेंन्सी काय आहे, त्यांना कोणत्या माध्यमातून निष्क्रिय (जॅम) करता येईल, तिथलं हवामान कसं आहे, दृश्‍यमानता कशी असेल याची खडान्‌खडा माहिती घेतली जाते.

हल्ला रात्री करणार असल्यानं त्या भागातले डोंगर कसे आहेत, ते रात्री कसे दिसतात, हल्ल्याच्या आजूबाजूला नागरी वस्ती आहे का, हे सर्व तपशीलवार पाहिलं जातं. जेणेकरून या हल्ल्याची झळ इतरांना बसणार नाही, याची काळजी यात घेण्यात येते. त्याच वेळी या लक्ष्याच्या शेजारी शत्रूच्या हवाई दलाचे कोणते विमानतळ आहेत का, हेही पाहिलं जातं. हल्ला सुरू असताना ते पटकन्‌ उड्डाण करून प्रतिहल्ला करू शकतील, त्यासाठी किती वेळ लागेल, तिथं कोणत्या प्रकारची लढाऊ विमानं आहेत, त्यांची सज्जता किती आहे अशी माहिती गोळा करण्यात येते. त्यामुळं लक्ष्य निश्‍चित करण्यापूर्वी त्याची आणि तिथल्या पर्यावरणाची सविस्तर माहिती मिळणं आवश्‍यक असतं. या माहितीवरून दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना लक्ष्य करण्यात आलं.

हल्ल्याची पूर्वतयारी
दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र हे लक्ष्य निश्‍चित झाल्यावर त्यावर नेमका हल्ला कसा करायचा, याची तयारी करणं आवश्‍यक असतं. प्रशिक्षण केंद्राचं बांधकाम कसं केलं आहे, ते कितपत मजबूत आहे, त्यानुसार त्यावर कोणता बॉंब परिणामकारक होईल, हे ठरवलं जातं. काही बॉंब हे पृष्ठभागावर पडून फुटतात, काही बॉंब हवेतच फुटून जमिनीवर लांबपर्यंत पडतात. त्यामुळं ट्रूप्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान करता येतं. विमानातून टाकलेला बॉंब आधी जमिनीत जातो आणि मग फुटतो, अशा प्रकारचे बॉंब हे शत्रूचे बंकर उद्‌ध्वस्त करण्यासाठी वापरतात. त्यामुळं दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र टिपण्यासाठी नेमका कुठला बॉंब वापरायचा, यावरही चर्चा झाली असेल. त्यातून लेझर गाइडेड बॉंम्ब वापरण्याचा निर्णय झाला असणार. "मिराज 2000' आणि "सुखोई 30' या लढाऊ विमानांमध्ये हे एक हजार किलो वजनाचे बॉंब वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यापैकी त्यांनी "मिराज 2000' हे हल्ला करण्यासाठी निवडलं, तर "सुखोई' हल्ल्याच्या वेळी हवाई संरक्षणासाठी वापरण्यात आले.

या हल्ला करण्यासाठी जाणाऱ्या विमानांना हवेतल्या हवेत इंधन भरता येईल, अशी सुविधा आवश्‍यक असते. विशेषत: शत्रूच्या प्रदेशात आतमध्ये जाऊन हल्ला करताना याची गरज जास्त असते. "ए व्हॅक' (एअरबॉन वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम) आवश्‍यक असते. या हल्ल्याच्या वेळी "ऍडव्हान्स अर्ली वॉर्निंग' ही प्रणाली वापरण्यात आली होती. त्याच वेळी शत्रूची रडार, इमेजिंग यंत्रणा जॅम करण्यासाठी काही विशिष्ट विमानं ताफ्यात समाविष्ट केली जातात. त्यातून हल्ला करणाऱ्या विमानांचा मार्ग सुकर होते. इतकी काळजी घेऊनही शत्रूनं विमानांवर प्रतिहल्ला करण्यासाठी उड्डाण केलंच, तर "एअर डिफेंन्स एस्कॉर्ट' हे त्याला परतवून लावते. याशिवाय शत्रूची दिशाभूल करण्यासाठी शत्रूच्या वेगवेगळ्या लक्ष्यांच्या दिशेनं उड्डाण करणारी वेगवेगळी विमानं असतात. त्यामुळं नेमका कुठं हल्ला होत आहे, हे शत्रूला नेमकेपणानं कळत नाही. अशी दिशाभूल करणाऱ्या विमानांचं वेगळं पथक असतं.

हल्ल्याचा सराव
लक्ष्य निश्‍चित केलं, त्यासाठी आवश्‍यक यंत्रणा ठरली, त्यापुढचा टप्पा असतो तो सरावाचा. हल्ला करायच्या ठिकाणचं प्रारूप उभं केलं जातं. लक्ष्याचं छायाचित्र, "थ्री डी इमेज', उपग्रहांकडून आलेली छायाचित्रं, माणसांनी केलेली निरीक्षणं यांच्या मदतीनं हल्ला करायच्या लक्ष्याचं प्रारूप उभं केलं जातं. त्यावर वैमानिक सराव करतात. कारण, हे लक्ष्य नेमकेपणानं हेरून, त्यावर बॉंब टाकून, तितक्‍यात वेगानं परत फिरण्यासाठी वैमानिकांकडं फक्त वीस सेकंद असतात. त्यातही डोंगर आहेत. शत्रूच्या रडार यंत्रणेत दिसू नये यासाठी या डोंगराचा कसा वापर करावयाचा आणि हे सगळं रात्रीच्या गर्द काळोखात करायचं, यासाठी सराव अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यानंतर एअर स्ट्राईक केला जातो.

असा केला हल्ला
प्रत्यक्ष हल्ला करताना चार "सुखोई' सर्वांत आघाडीवर होती. त्यांनी पुढं जाऊन बॉंबहल्ला करणाऱ्या "मिराज 2000' विमानांचा मार्ग मोकळा केला. लेझर गाइडेड बॉंबचा वापर करून दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र उडवण्यात आलं.

लेझर गाइडेड बॉंबच का वापरला?
लढाऊ विमान स्वत: लक्ष्यावर लेझर किरण टाकतं. त्या लक्ष्यावर पडून ते लेझर किरण परततात. त्यानुसार त्यावर बॉंब टाकला जातो. काही वेळा दुसरं विमान लक्ष्यावर लेझर टाकतं आणि मग हल्ला करणाऱ्या विमानातून त्यानुसार बॉंब टाकला जातो. आपल्याला फक्त दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र उडवायचं होतं. नागरी वस्ती किंवा लष्करी तळावर हल्ला करायचा नव्हता. त्यामुळं अचूकता आवश्‍यक होती. ती साधण्यासाठी लेझर गाइडेड बॉंबचा वापर करण्यात आला.

बॉंब हल्ल्यानंतर काय केलं?
सर्जिकल स्ट्राईकमध्ये लष्करानं दहशतवाद्यांना मारलं, हे आपण दाखवू शकतो; पण एअर स्ट्राईकमध्ये उंचावरून केलेल्या हल्ल्यामुळं जमिनीवर नेमकं काय झालं, याबाबत उत्सुकता असते. त्यामुळं बॉंब टाकल्यानंतर नेमकं काय घडलं, हे टिपण्यासाठी विमानाचा स्वत:चा कॅमेरा असतो. पहिलं विमान गेल्यानंतर त्या जागी येणारं दुसरं विमान छायाचित्र टिपतं. "अनमॅंड एरियल व्हेईकल'च्या माध्यमातूनही काळोख्या रात्रीही वीस-तीस हजार फुटांवरून जमिनीवरचं छायाचित्र काढता येतं.

(शब्दांकन : योगीराज प्रभुणे)


https://www.esakal.com/saptarang/retired-air-chief-marshal-p-v-naik-write-indian-air-strike-article-saptarang-174223

हवाई धक्का, लक्ष्मणरेषा बदलणारा (श्रीराम पवार)

पाकिस्तानी नागरिक अथवा लष्करावर हल्ले न करता दहशतवाद्यांविरोधात, मात्र प्रसंगी पाकच्या भूमीत हल्ले करू हा थेट इशारा भारतानं बालाकोटमधल्या कारवाईनं दिला. या हवाई हल्ल्यानं भविष्यातल्या कारवाईसाठी कायमची पूर्वपरंपरा तयार केली. व्यूहात्मकदृष्ट्या हा सर्वांत मोठा बदल आहे. हवाई दलाच्या यशानंतर युद्धात रूपांतर न होता पाकची कोंडी कायम ठेवणं ही पुढची कसोटी असेल. यासाठी आपल्याकडंही रोज युद्धज्वर पेटवण्याचे उद्योग थांबवायला हवेत. दहशतवाद्यांवर कारवाईचा अधिकार कायम ठेवून पाकशी तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करण्यात चॅनेल्स आणि समाजमाध्यमांवरच्या युद्धवीरांचा अडथळा मानायचंही कारण नाही.


shriram pawar


पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर "बदला घ्या' ही सार्वत्रिक भावना होती. हवाई दलानं पाकिस्तानमधल्या बालाकोट इथं जैशच्या तळांवर केलेल्या हल्ल्यानं या भावनेला प्रतिसाद दिला आहे. भारत-पाक संबंधात या हल्ल्यानं नवं वळण आणलं आहे. अनेक अर्थांनी तो नवा संदर्भबिंदू बनला आहे. अशा कारवाईनंतर कणखरपणाचे ढोल बडवत राजकारण होईल. ते आपल्याकडं खासकरून निवडणुका तोंडावर असताना अनिवार्यच. हल्ला कळजीपूर्वक होता, तशीच त्यानंतर जगासमोर भारतानं घेतलेली भूमिकाही. पाकवर कारवाई करताना धक्का तर द्यावा; पण युद्धात रूपांतर होऊ नये यासाठीची एक लक्ष्मणरेषा नेहमीच पाळली जाते. या हल्ल्यानं उद्देश कायम ठेवून ती काहीशी बदलली. पाकच्या आगळिकीला उत्तर देताना भारतानं सर्जिकल स्ट्राईकसारखी कारवाई अनेकदा केली- तिचा जाहीर उच्चार उरीमधल्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच केला. यापूर्वी पाकवरच्या कोणत्याही कारवाईत ताबारेषा न ओलांडण्याचं पथ्य पाळलं होतं- अगदी कारगिलच्या युद्धातही हवाई दलाला ताबारेषा ओलांडून पलीकडं मारा करू नये, असं स्पष्टपणे पंतप्रधानांनीच सांगितलं होतं. अर्थातच त्याचं कारण सर्वंकष युद्ध छेडलं जाऊ नये हेच होतं. बालाकोटमधल्या हल्ल्यानं आतापर्यंत भारतानं पाळलेली ही मर्यादा ओलांडली. ताबारेषेलगत का असेना; पण पाकच्या भूप्रदेशात बॉम्बहल्ला झाला. हे पाकसोबतच्या संघर्षातला प्रतिसाद कसा द्यावा याविषयीची आजवरची धारणा कायमची बदलणारं धाडसी पाऊल आहे. मात्र, त्याचबरोबर भारताच्या मिराज लढाऊ विमानांनी पाकमधील लक्ष्य भेदताना व्याप्त काश्‍मीरपलीकडं प्रत्यक्ष उड्डाण न करण्याची खबरदारीही घेतली. ही अत्यंत सुज्ञ रणनीती होती. पाकव्याप्त काश्‍मीरला भारतानं कधीच मान्यता दिलेली नाही, त्यामुळं कायदेशीररित्या भारतीय विमानांनी हवाई हद्द ओलांडलीच नाही, असं म्हणायची सोय आहे. हीच मुत्सद्देगिरी आहे. ती पाकसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरही कोंडी करणारी होती. त्यामुळंच पाकनं एका बाजूला देशातल्या जनमताचा विचार करून प्रतिहल्ल्याचा प्रसत्न केला, तरी प्रत्यक्षात चर्चा करू अशीच सामोपचाराची भाषा त्यांना करावी लागली. पाकिस्तानी नागरिक अथवा लष्करावर हल्ले न करता दहशतवाद्यांविरोधात, मात्र प्रसंगी पाकच्या भूमीत हल्ले करू हा थेट इशारा भारताच्या या कारवाईनं दिला. त्यानंतरही आंतरराष्ट्रीय समुदायानं सबुरीच्या नेहमीच्या सल्ल्यापलीकडं काही केलं नाही. दाखवण्यापुरत्या आक्रमक पवित्र्याखेरीज पाकनं आता इशारे आणि दर्पोक्तीपलीकडं काही केलं नाही, तर या हवाई हल्ल्यानं भविष्यातल्या कारवाईसाठी कायमची पूर्वपरंपरा तयार केली. व्यूहात्मकदृष्ट्या हा सर्वांत मोठा बदल आहे. हवाई दलाच्या यशानंतर युद्धात रूपांतर न होता पाकची कोंडी कायम ठेवणं ही पुढची कसोटी असेल. यासाठी आपल्याकडंही रोज युद्धज्वर पेटवण्याचे उद्योग थांबवायला हवेत. दहशतवाद्यांवर कारवाईचा अधिकार कायम ठेवून पाकशी तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करण्यात चॅनेल्स आणि समाजमाध्यमांवरच्या युद्धवीरांचा अडथळा मानायचंही कारण नाही.

बालाकोट या पाकव्याप्त काश्‍मिरातल्या जैशे महंमदच्या तळावर भारतीय हवाई दलानं केलेली कामगिरी अनेक अर्थांनी एतिहासिक आहे. एकतर पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएएफच्या 40 जवानांचा पुलवामाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर पाकला धडा शिकवा, ही भारतातली सार्वत्रिक भावना होती. तिला प्रतिसाद देणं ही सरकारी गरज बनली होती. या पार्श्‍वभूमीवर भारताकडून पाकमध्ये कारवाई होईल हे उघड होतं. त्याचं स्वरूप काय एवढाच मुद्दा होता. उरीमधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना पाकव्याप्त काश्‍मिरात सर्जिकल स्ट्राईक करून जनभावनेला प्रतिसाद दिला होता. यावेळी हा दबाव आणखीच मोठा होता. त्याची दखल हवाई दलानं अत्यंत काळजीपूर्वक पाकच्या नियंत्रणात असलेल्या भागात घुसून कारवाईनं घेतली. सन 1971 नंतर पहिल्यांदाच भारतीय हवाई दलाची विमानं प्रत्यक्ष नियंत्रणरेषा ओलांडून हल्ल्यासाठी गेली. कोणतंही नुकसान न होता दहशतवादी तळ उद्‌ध्वस्त करून परतली, हे मोठंच यश आहे. भारतीय हवाई दलाचं सामर्थ्य या निमित्तानं दाखवून दिलं आहे. "या हल्ल्यात काहीच नुकसान झालं नाही आणि पाकिस्ताननं प्रतिकार केल्यानंतर भारतीय विमानं तत्काळ मागं फिरली,' असा कितीही दावा पाकनं केला आणि तरी भारतानं हल्ला केला तो पाकिस्तान थांबवू शकला नाही हे वास्तव लपत नाही. हल्ला करताना निवडलेली ठिकाणं महत्त्वाची आहेत. एकतर हल्ला दहशतवादी तळांवर करण्यात आला आहे. ही ठिकाणं नागरी वस्त्यांपासून दूर आहेत. दुसरीकडं अधिकृतपणे भारत याला "पाकविरोधातील लष्करी कारवाई' म्हणत नाही, तर "गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार भारताविरोधात कारवाईसाठी जमलेल्या दहशतवाद्यांना संपवणारी बिगरलष्करी कारवाई' आहे, असं संगितलं जातं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही भूमिका पाकिस्तानाला कांगावा करण्यापासून रोखणारी असल्यानं महत्त्वाची आहे.
"पाकिस्तानात घुसून मारा' ही आपल्याकडची लोकप्रिय भावना होती. त्याला हवाई दलाच्या बालाकोटमधल्या कारवाईनं प्रतिसाद दिला आहे. पाकव्याप्त काश्‍मीरला आपण कधीच पाकिस्तानचा भाग मानलेला नाही. पाकिस्ताननं तो बळानं त्यांच्या ताब्यात ठेवला आहे आणि तो जम्मू आणि काश्‍मीर राज्याचा पर्यायानं भारताचा भाग असल्याचं आपलं अधिकृत म्हणणं आहे. त्यामुळं या भागात भारतानं केलेली कारवाई ही भारताच्या संरक्षणासाठीची ठरवता येते. ते पाकवरचं आक्रमण नाही असं सांगता येतं. पाकनं ताब्यात ठेवलेल्या या भागात, तसंच खुद्द पाकमध्येही दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारी केंद्रं चालवली जातात हे उघड गुपित आहे. अशी केंद्रं हा भारताच्या सुरक्षेसाठीचा धोका आहे- म्हणून ती नष्ट करण्याचा अधिकार आहे ही भारताची रास्त भूमिका आहे. हल्ल्यानंतर यावेळी संरक्षण मंत्रालय अथवा लष्कराकडून कोणतंही निवेदन न देता ते परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यातही अशीच मुत्सद्देगिरी दाखवली गेली. "बिगरलष्करी प्रतिबंधात्मक कारवाई' असं हल्ल्याचं वर्णन जाणीवपूर्वक केलं गेलं. तांत्रिकदृष्ट्या याचा अर्थ कोणत्याही नागरी वस्तीला किंवा पाकिस्तानच्या लष्करी तळावर हल्ला केलेला नाही- कारवाई फक्त दहशतवादी तळांपुरती मर्यादित आहे. पाकिस्तानवर हल्ला केला, तर पुलवामातल्या हल्ल्यानंतर सांत्वन करणारे जगातले बहुतेक देश भारतालाच सबुरीचा सल्ला देतील हे उघड आहे; मात्र आमच्यावरचा दहशतवादी हल्ला टाळण्यासाठी कारवाई केल्याची भूमिका घतल्यानंतर जगाचीही प्रतिक्रिया बदलते. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार प्रत्येक देशाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. याचा अर्थ कोणी हल्ला केला, तर प्रत्युत्तराचा अधिकार असं मानलं जातं. मात्र, अमेरिका आणि इस्राईलनं अनेकवेळा खबरदारीचा उपाय म्हणून केलेले हल्ले "स्वसंरक्षणाचा भाग' असल्याचं समर्थन केलं होतं. साहजिकच हाच तर्क भारतानं दिल्यानंतर आता कोणत्या तोंडानं त्याला विरोध करणार? लोकप्रिय भाषेत "घुसके मारा' असं एका बाजूला सांगता येतं, तसंच भारतानं आक्रमण केल्याचा कांगावा जागतिक स्तरावर करण्याचा लाभ पाकला घेता येऊ नये अशीही सोय यात आहे. देशांतर्गत अब्रू राखण्यासाठी काहीतरी करणं ही पाक लष्कराची गरज बनली. त्यातूनच मग भारतीय हद्दीत पाकनं एफ 16 विमानं आणली. त्यातलं एक भारतानं पाडलं. भारतालाही एक मिग 21 विमान गमवावं लागलं. यात एक भारतीय विंग कमांडर पाकच्या हाती लागला. हल्ला- प्रतिहल्ल्यात या प्रकारचे धोके असतातच; मात्र यानंतर पाकनं "आम्ही काश्‍मीरमध्ये कारवाई केली ती प्रत्युत्तर देऊ शकतो हे दाखवण्यासाठी- नागरी वस्ती अथवा भारताच्या लष्करी तळांवर हल्ला नाही,' असं सांगायला सुरवात केली. याचा अर्थ इतकाच, की भारतीय कारवाईनंतर "काहीतरी केलं' हे देशात दाखवणं ही गरज पाकला पुरी करायची आहे. सगळ्या बाजूंनी अडचणीत आलेल्या आणि चीन वगळता मित्र न उरलेल्या पाकला युद्धाकडं नेणारी कोणतीही कृती परवडणारी नाही. दुसरीकडं अमेरिकेसारख्या शक्ती तणाव कमी करण्यासाठीच्या कामाला लागल्या. व्हिएतनाममध्ये अमेरिकेचे अध्यक्ष भारत- पाकसंबंधात "गुड न्यूज' येईल असं सांगतात आणि काही तासांत पाक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्याचं जाहीर करतो, याचा अर्थ स्पष्ट आहे. अफगाण कोंडीतून बाहेर पडताना भारत-पाक दरम्यान युद्ध सुरू राहणं अमेरिकेच्या गणितात बसणारं नाही.
खरंतर बालाकोटमध्ये हल्ला झाला हे जगाला समजलं ते पाकिस्तानच्या एका मेजर जनरलनं केलेल्या ट्‌विटमुळंच. असा हल्ला झाल्यानंतर कोणत्याही सरकारला आणि तिथल्या लष्कराला लोकांसमोर काय घेऊन जायचं हा पेचच असतो. पाकसमोर दोन पर्याय होते ः एकतर हा पाकवरचा हल्ला म्हणून गवगवा करायचा आणि प्रतिकाराची कारवाई करायची किंवा हल्ल्यानं काही नुकसान झालं नाही, तो फार मोठा हल्लाच नव्हता अशा प्रकारची भूमिका घेत दुर्लक्ष करायचं. उरीनंतरच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकनं दुसरी भूमिका स्वीकारली होती. सर्वंकष युद्ध दोन्ही देशांना परवडणारं नसलं, तरी पाकची आर्थिक अवस्था कमालीची खालावलेली आहे. त्यात युद्ध हा पर्याय असू शकत नाही. बालाकोटमधल्या हवाई हल्ल्यानंतर पाकनं सुरवातीला भारतीय हल्ल्याला फारसं महत्त्व नसल्याची भूमिका घेतली ती याच पार्श्‍वभूमीवर. दहशतवाद्यांच्या आडानं कुरापती काढत राहणं हा कमी खर्चिक आणि कमी धोक्‍याचा मार्ग पाक अवलंबतो. यात अण्वस्त्रसज्जतेमुळं भारत एका मर्यादेपलीकडं आक्रमक होणार नाही असं पाकनं गृहीत धरलं आहे. बालाकोटमधल्या हल्ल्यानं ही मर्यादाही बदलली आहे.

या कारवाईविषयी भारत आणि पाककडून दावे-प्रतिदावे होत राहतील, मात्र पुलवामानंतर काहीतरी लक्षणीय कारवाईची गरज पूर्ण झाली आहे. पाकिस्ताननं सतत कुरापती काढाव्यात आणि आपण निषेध किंवा गृहमंत्र्यांनी लोकप्रिय केलेली "कडी निंदा' करत राहावं, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकला एकाकी पाडण्याची भाषा करावी, काही काळानं सारं "जैसे थे' व्हावं हे आवर्तन अनेकदा झालं आहे. त्याला छेद देणारी मोठी कारवाई होती ती सर्जिकल स्ट्राईकची. त्यामुळं पकिस्तानला धडा मिळेल असं सांगितलं जात होतं; मात्र पाकच्या वर्तनात कोणातही फरक पडला नाही. काश्‍मीर धगधगतं राहील असंच पाक वागत राहिला. सर्जिकल स्ट्राईकचा गाजावाजा भारतात राजकीय लाभासाठी उपयोगाचा ठरू शकतो; मात्र त्यातून कोणतंही व्यूहात्मक उद्दिष्ट साध्य होत नाही. या मर्यादा काही काळातच उघड झाल्या. भारताकडून आंतरराष्ट्रीय सीमा किंवा प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडणं नेहमीच अधिकृतपणे टाळलं गेलं आहे. कारगिलच्या युद्धात किंवा ऑपरेशन पराक्रमध्येही भारतानं हे पथ्य पाळलं होतं. पुलवामानंतरच्या हवाई हल्ल्यात पहिल्यांदाच भारतीय हवाई दलानं प्रत्यक्ष पाकमध्ये कारवाई केली आहे. अशी कारवाई करणं आणि "होय, आम्ही ती केली' असं जगाला सांगणं हा भारतीय धेरणातला मोठा बदल आहे. एका अर्थानं भारत-पाक सामरिक संबंधात नवी लक्ष्मणरेषा आखण्याचा हा प्रयत्न आहे. "भारताला धोका आहे अशी खात्री पटली तर ताबारेषेपलीकडं आम्ही अधिकृतपणे कारवाई करू- ती आमची संरक्षणाची गरज आहे; मात्र याचा अर्थ भारताला युद्ध करायचं आहे असा नाही,' असं या बदलत्या पवित्र्याचं सार आहे.

बालाकोट हे टार्गेट काळजीपूर्वक निवडलेलं आहे. हा दहशतवादी प्रशिक्षणाचा गड आहे. हजारो तरुणांना दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण देणं आणि त्यांच्यात कट्टरतावाद भिनवणं याचं हे प्रमुख केंद्र आहे. जैशे महंमदचा एक मोठा अड्डा इथं आहे. अझहर मसूद आणि हाफिज सईदसारखे दहशतवादी म्होरके तिथं सतत येत असतात. तिथल्या मदरशांचा वापर कट्टरतावाद फैलावण्यासाठी होतो. आतापर्यंत दहशतवादी कारवायांच्या तपास अहवालात अनेकदा बालाकोटचं नाव आलं आहे. सन 2001 पूर्वी जैशची प्रशिक्षण केंद्रं प्रामुख्यानं अफगाणिस्तानात होती. अफगाण युद्धानंतर जैशनं आपला तळ बालाकोटमध्ये हलवला. सन 2005 च्या भूकंपानंतर पुनर्वसनाच्या नावाखाली हाफिज सईदच्या जमात उद्‌ दावानं इथं हातपाय पसरले. त्याला सौदीतून आर्थिक मदत मिळत होती. बालाकोट हे वहाबी विचारांच्या प्रसाराचं पाकिस्तानमधलं प्रमुख केंद्र बनलं. बालाकोट प्रत्यक्ष ताबारेषेच्या लगत; मात्र पाकच्या खैबर पख्तुनवा प्रांतात आहे. साहजिकच म्हटलं तर हा हल्ला पाकच्या हद्दीत झाला आहे. पाकला "प्रत्युत्तर द्यायचं ठरवलं तर मोठ्या संघर्षाला निमंत्रण मिळेल. अगदी ताबारेषेलगत असला तरी बॉम्ब पाकमध्ये पडल्यानं गप्पही राहता येत नाही,' अशी कोंडी अनुभवावी लागते आहे. त्यातच हल्ला पुलवामानंतर असल्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकला चीन वगळता कोणी सहानुभूती दाखवण्याची शक्‍यता नाही. बालाकोटला लक्ष्य करणं हे अशा अनेक कारणांनी महत्त्वाचं ठरतं आहे. दहशतवाद्यांच्या आडानं पाक छुपं युद्ध लढतो. त्याला उत्तर देताना भारतीय लष्कर अनेकदा ताबारेषेपलीकडं कारवाई करतं. मात्र, ते गोपनीय ठेवल्यानं सामान्यांपर्यंत पोचत नसल्यानं त्याचा दबाव तयार होत नाही आणि एक प्रकारचं संतुलन राहतं. युद्धापर्यंत प्रकरण जात नाही. ही स्थिती आता बदलली आहे. पाकमध्ये हल्ला केल्यानंतर प्रतिसाद काय देणार याला महत्त्व होतं. सीमेवरचा मर्यादित हवाई संघर्ष आणि पाठोपाठ सुरू झालेली शांततेची भाषा यामुळं पुढच्या संघर्षाच्या वाटचालीत एक संदर्भबिंदू ठरून गेला आहे. बालाकोटमधल्या हवाई हल्ल्याचं हेही एक वैशिष्ट्य आहे.

आंतरराष्ट्रीय समुदायाची पाकविषयक बदलती भूमिका हेही नवं वळण आहे. याची मुळं अर्थातच बड्या शक्तींची भूराजकीय उद्दिष्ट बदलण्यात शोधता येतील. साधारणतः भारतानं पाकविरोधात आक्रमक भमिका घेतली, की जगभरातून समजूत काढण्याचाच अनुभव येत असे. संसदेवर जैशच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा अमेरिकेसह अनेक देशांच्या नेत्यांनी भारताला युद्धापासून परावृत्त करण्यावरच भर दिला. त्या बदल्यात पाकिस्ताननं दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवावं यासाठी दबाव आणण्याचं आश्‍वासन मिळालं. बहुतेक हल्ल्यांनंतर हेच होत राहिलं. आता बालाकोटनंतर अपेक्षेप्रमाणं सारेजण सबुरीनं घ्यायचा सल्ला देत असले, तरी भारताच्या कारवाईला कोणी आक्षेप घेतलेला नाही. हल्ल्याआधी अमेरिकेच्या अध्यक्षांनी भारत मोठी कारवाई करेल याचे संकेत दिले होते. संयुक्त राष्ट्रांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध करताना जैशचा स्पष्ट उल्लेख केला होता. या बाबी भारतासाठी पूरक ठरल्या आहेत. अमेरिकेला पाकची गरज अजूनही आहेच; मात्र पाक पोसत असलेल्या दहशतवाद्यांचा मुद्दाही गंभीर असल्याचं अमेरिकेच्या लक्षात येतं आहे. भारतानं पाकच्या हद्दीत हल्ला केल्यानंतरही कोणी भारताच्या विरोधात सूर लावलेला नाही. फारतर दोन्ही देशांनी शांतता ठेवावी इथपर्यंतच सल्ल्यांची मजल आहे. पाक लष्कराविरोधात नाही; मात्र दहशतवाद्यांविरोधात भारत सीमेपलीकडे हल्ला करू शकतो, हे जगानं मान्य केल्याचं हे निदर्शक आहे. आता ही पुलवामाच्या भीषणतेनंतरची तात्पुरती प्रतिक्रिया आहे, की कायमचा धोरणबदल हे समजायला काही काळ जावा लागेल. तसंच याचा अर्थ जग उभय देशांना युद्धापर्यंत जाऊ देईल असाही नाही.

या कारवाईवर राजकारण माजवलं जाईल, यात शंका नाही. पुन्हा एकदा छप्पन इंची प्रचारमोहीम सुरू होईल. मात्र, सरकार म्हणून एक आवश्‍यक तरीही अत्यंत व्यवहार्य भूमिका घेतली गेली आहे. ही कारवाई पाकचे उद्योग थांबवेल का यावर शंका कायम आहे. ती जैशला संपवणारीही नाही. मात्र, पाकमध्ये सुरक्षित राहून भारताला घायाळ कराल, तर किंमत मोजावी लागेल याची जाणीव करून देणं हे या कारवाईचं यश आहे. "युद्ध करा', "पाकिस्तान संपवा' हे चॅनेलच्या स्टुडिओत युद्ध लढणाऱ्यांसाठी ठीक आहे; मात्र सध्याच्या स्थितीत भारत प्रसंगी सीमा ओलांडून दहशतवाद्यांचा खात्मा करू शकतो, अशी भीती शत्रूच्या मनात तयार करणं, हेच खूप मोठं काम आहे. ते भारतीय संरक्षण दलानं चोख केलं आणि त्यासाठी आवश्‍यक ती निर्णयक्षमता आणि हो आवश्‍यक तिथं संयमही राजकीय नेतृत्वानं दाखवला. आता कायम तणावाच्या आणि युद्धजन्य स्थितीत राहायचं कारण नाही. पाकला आवश्‍यक इशारा मिळाला आहे. जागतिक समुदायाकडूनही बऱ्याच अंशी योग्य संदेश गेला आहे. आता तणाव कमी करण्यावर भर द्यायला हवा.

अखेरीस ही लढाई काश्‍मीरशी संबंधित आहेच आणि तिथं शांततेसाठी आवश्‍यक ती पावलं उचलताना संवादाची दारं खुली ठेवण्याला कमकुवतपणा मानायचं कारणच नाही. शेवटी लढाया आणि युद्धंही शांततेसाठीच असतात. लष्करी कारवाईची उद्दिष्टं पूर्ण झाली, की मुद्दा असतो तो राजकीय प्रक्रियेचा. इथं प्रगल्भ राज्यकर्ते आणि मतांसाठी मैदानात उतरणारे राजकारणी यांच्यातलं द्वंद्व सुरू होतं

https://www.esakal.com/saptarang/indian-air-strike-shriram-pawar-write-balakot-attack-and-terrorist-article-saptarang



अभिनंदन या शब्दाचा अर्थच बदलला आहे

PM Modi: अभिनंदन या शब्दाचा अर्थच बदलला आहे: मोदी

'भारतीयांमध्ये इतकी क्षमता आहे की ते कोणत्याही शब्दाचा अर्थ बदलू शकतात. 'अभिनंदन' या शब्दाचा अर्थ आतापर्यंत 'काँग्रॅच्युलेशन्स' असा होता. आता या शब्दाचा अर्थच बदलून जाईल,' असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Mar 2, 2019, 02:06PM IST

PM Modi: अभिनंदन या शब्दाचा अर्थच बदलला आहे: मोदी

'भारतीयांमध्ये इतकी क्षमता आहे की ते कोणत्याही शब्दाचा अर्थ बदलू शकतात. 'अभिनंदन' या शब्दाचा अर्थ आतापर्यंत 'काँग्रॅच्युलेशन्स' असा होता. आता या शब्दाचा अर्थच बदलून जाईल,' असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
दिल्लीतील विज्ञान भवनात ते एका सभेला संबोधित करत होते. यावेळी बोलताना त्यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचं कौतुक केलं. 'अभिनंदन वर्तमानचं धैर्य अभिमानास्पद आहे. संपूर्ण देश त्याचं कौतुक करतो आहे. ६० तास पाकिस्तानच्या तावडीत राहून आलेल्या अभिनंदनने हे सिद्ध केलं आहे की एखाद्या शब्दाचा अर्थ बदलण्याची ताकद भारतीयांमध्ये आहे. कालपर्यंत अभिनंदन या शब्दाचा अर्थ काँग्रॅच्युलेशन्स होता. आता या शब्दाला नवा अर्थ येईल,' असं मोदी म्हणाले.

शहिदांचे स्मारक उभारा


म टा प्रतिनिधी, नाशिक सैन्यामध्ये जाणारा प्रत्येक तरुण देशरक्षणासाठी जिवाची बाजी लावण्याची तयारी ठेवतो मात्र, वीरमरण प्रत्येकाच्या नशिबी नसते...

30 | Updated:Mar 2, 2019, 04:00AM IST

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सैन्यामध्ये जाणारा प्रत्येक तरुण देशरक्षणासाठी जिवाची बाजी लावण्याची तयारी ठेवतो. मात्र, वीरमरण प्रत्येकाच्या नशिबी नसते. असे मरण एखाद्यालाच येते, असे सांगत भारतीय माजी सैनिक संघटनेने शहीद जवान निनाद मांडवगणे यांना शुक्रवारी श्रद्धांजली अर्पण केली. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांच्या स्मृती जपण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहीद स्मारक उभारायला हवे, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली.

शहीद निनाद यांना अखेरचा निरोप देण्यासाठी डीजीपीनगर येथील बँक ऑफ इंडिया कॉलनीत नाशिककरांनी मोठी गर्दी केली. आपल्या शहरातील एक जवान देशाच्या कामी आला, या भावनेने प्रत्येक जण या वीरपुत्राच्या कर्तृत्वाला वंदन करण्यासाठी येथे पोहोचत होता. त्यामुळे या परिसरात नजर जाईल तेथे निनाद यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्यांची गर्दी होती. प्रत्येक जण भावूक झाला. भारतीय माजी सैनिक संघटना, वीरपत्नी/माता संघटनेचे पदाधिकारी, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीयदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष फुलचंद पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सैन्यदलात भरती होणारा प्रत्येक जण देशासाठी प्राणांची आहुती देण्याची तयारी ठेवतो. मात्र, असे वीरमरण प्रत्येकाच्या नशिबी नसते. या शहीद जवानांच्या स्मृतींचे जतन व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधान्याने शहीद स्मारकाच्या उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली.

'राफेल आणा राफेल'

देशाच्या संरक्षणासारख्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी वर्षानुवर्षे आपण जुनीच विमाने आणि हेलिकॉप्टर वापरतो हे दुर्दैव असल्याची भावना या वेळी माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष विजय पवार यांनी व्यक्त केली. आपली विमाने म्हातारी झाली आहेत, तरीही ती जवानांना चालवावी लागतात, याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. पंधरा वर्षांपासून आम्ही राफेलबद्दल ऐकतो आहोत. ते केव्हा येणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राफेलबाबत वादावादी करण्याऐवजी ते लवकरात लवकर आणून सैन्यदलाला अधिक सशक्त करावे, अशी मागणी पवार यांनी केली.



Saturday, 2 March 2019

अमर रहे, अमर रहे, निनाद अमर रहे


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'भारत माता की जय...', 'वंदे मातरम...', 'अमर रहे, अमर रहे, निनाद अमर रहे...' या घोषणांनी आणि अतिशय भावपूर्ण वातावरणात स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. डीजीपीनगरमधील घरापासून ते गोदातिरावरील अमरधामपर्यंत सर्वत्र निनाद यांना सॅल्यूट केला जात होता. प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने आणि हवाई दलाच्या मानवंदनेने निनाद यांच्या पार्थिवाला अग्निडाग देण्यात आला.

काही दिवसांपूर्वीच निनाद यांचा काश्मिरमध्ये हेलिकॉप्टर कोसळून मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पार्थिव नाशिकला आणण्यात आले. डीजीपीनगर परिसरातील घरी सकाळी ९ वाजता निनाद यांचे पार्थिव आणण्यात आले. सर्वप्रथम मांडवगणे कुटुंबीय आणि त्यांच्या आप्तेष्टांसाठी वेळ देण्यात आली होती. त्यानंतर काही वेळाने घरासमोरील मोकळ्या मैदानात पार्थिव ठेवण्यात आले. तेथील वातावरण हेलावून टाकणारे होते. नागरिकांसह मान्यवरांनी निनाद यांना तेथे श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर लष्कराच्या वाहनातून निनाद यांच्या अंत्ययात्रेस प्रारंभ झाला. चहूबाजूंनी नागरिकांची गर्दी असलेल्या रस्त्यावरुन निनाद यांची अंत्ययात्रा मार्गस्थ झाली. पार्थिवाचे पंचवटी अमरधाममध्ये आगमन होताच विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. याठिकाणी पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, ओझर हवाई दल केंद्राचे प्रमुख समीर बोराडे आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर हवाई दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या २१ फैरी झाडून मानवंदना दिली. बँड पथकाने धून सादर करीत अभिवादन केले. याप्रसंगी निनाद यांच्या पत्नी विजेता, दोन वर्षांची कन्या निया, भाऊ नीरव, वडील अनिल, आई सुषमा आणि अन्य कुटुंबीय उपस्थित होते. निनादच्या वडिलांनी यावेळी मुखाग्नी दिला. त्याचवेळी 'भारत माता की जय' आणि 'निनाद अमर रहे' या घोषणांनी अमरधामचा परिसर निनादून गेला. शहरातील अनेक लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. गोदावरीचा संपूर्ण तीर, पूल आणि अमरधामचा परिसर नागरिकांनी गच्च भरला होता. विशेष म्हणजे, काही शाळांचे विद्यार्थी गणवेशातच निनाद यांना निरोप देण्यासाठी आले होते. माजी सैनिक संघटना, वीर माता आणि पत्नी संघटना यांच्यासह अनेक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.

निनाद हे अतिशय हुशार आणि धाडसी होते. त्यांनी देशसेवा करतानाच आपले प्राण अर्पण केले. त्यांचे योगदान कुणीही विसरू शकत नाही. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत.

- गिरीश महाजन, पालकमंत्री

अभिनंदनानंतरचे आव्हान (अग्रलेख)


सकाळ वृत्तसेवा

शनिवार, 2 मार्च 2019

पाकिस्तानवरील सर्व प्रकारचा दबाव कायम ठेवणे आणि त्याचवेळी संघर्ष चिघळू नये, यासाठी प्रयत्न करणे, हे आता भारतापुढचे आव्हान असेल. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका ही त्यादृष्टीने महत्त्वाची घटना आहे.

Abhinandan Varthaman

पाकिस्तानवरील सर्व प्रकारचा दबाव कायम ठेवणे आणि त्याचवेळी संघर्ष चिघळू नये, यासाठी प्रयत्न करणे, हे आता भारतापुढचे आव्हान असेल. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका ही त्यादृष्टीने महत्त्वाची घटना आहे.

पा किस्तानी लष्कराच्या ताब्यातून आपला लढाऊ वैमानिक भारतात सुखरूप परतणे, ही निश्‍चितच आनंददायी घटना असून हे भारताचे मोठे राजनैतिक यश आहे. भारतीय हवाई दलामार्फत पाकिस्तानात घुसून जी कारवाई करण्यात आली, ती फक्त बिनलष्करी आणि प्रतिबंधात्मक कारवाई होती आणि तिचे लक्ष्य नागरी वसतीचे ठिकाण नव्हे, तर फक्त दहशतवादी तळ एवढेच होते, ही भूमिका घेऊन त्यात भारताने सातत्य ठेवले. आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळविण्यात ती बाब सहाय्यभूत ठरली. पाकिस्तानवरील सर्व प्रकारचा दबाव कायम ठेवणे आणि त्याचवेळी संघर्ष चिघळू नये, यासाठी प्रयत्न करणे, हे आता भारतापुढचे आव्हान असेल. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका ही त्यादृष्टीने महत्त्वाची घटना आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेचेही आवाहन केले होतेच. पण या सकारात्मक घटना असल्या तरी सरहद्दीवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन सुरूच आहे आणि मसूद अजहर याच्यावर काय कारवाई करणार, याविषयी पाकिस्तानने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. एफ-१६ विमाने पाकिस्तानने अमेरिकेकडून घेतली ती अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाईचे कारण सांगून; प्रत्यक्षात ती भारताच्या विरोधात कशी वापरली गेली, हे पाकिस्तानच्या विमानाचे जे अवशेष मिळाले, त्यावरून उघडच झाले. भारतीय लष्कराने प्रसारमाध्यमांना ते दाखवून पाकिस्तानचा खोटेपणा जगासमोर आणला. वास्तविक अमेरिकेकडून जी आर्थिक-लष्करी मदत मिळते, तिचा वापर दहशतवाद्यांच्या निर्मूलनासाठी नव्हे, तर त्यांना पोसण्यासाठी होतो, हे भारत सातत्याने ओरडून सांगत होता. पण यात खंड पडला नाही. पाकिस्तानने दहशतवादाला आपली भूमी मुक्तहस्ते वापरू दिली. सध्याच्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक रसद थांबवली असली तरी वातावरण निवळल्यावर ती पुन्हा सुरू होणे घातक ठरेल.

ज्या इस्लामिक राष्ट्र संघटनेच्या (ओआयसी) स्थापनेच्या वेळी मोरोक्कोमध्ये पाकिस्तानने भारताच्या प्रवेशाला विरोध केला, त्याच संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमाच्या वेळी भारताला आमंत्रित केल्याने पाकिस्तानला पोटशूळ उठलाय. या परिषदेवर या वेळी पाकिस्तानने चक्क बहिष्कार टाकला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ‘ओआयसी’ची भारताची दहशतवादविरोधी भूमिका आक्रमकपणे मांडली, हे बरे झाले. ही संघटना पाकिस्तानच्या हट्टापुढे झुकली नाही, याचा सांगावा पाकिस्तानने लक्षात घ्यावा. उठसूट भारताविरोधात गरळ ओकणे थांबवले पाहिजे.
भारताने केलेली कारवाई आणि त्यानंतर पाकिस्तानवर जगभरातून आलेला दबाव या घटनांमधून थोडे जरी आत्मपरीक्षण पाकिस्तानात सुरू झाले, तरी त्यांना देशउभारणीसाठी बाह्य नव्हे तर अंतर्गत अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची नितांत गरज आहे, हे कळेल. दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला समस्यांनी घेरले आहे. आर्थिक संकट घोंगावत आहे. कधी अमेरिकेच्या तर कधी चीनच्या दावणीला देश बांधल्याने त्यांच्या मांडलिकासारखे राहावे लगत आहे. आज पाकिस्तानातील करमणूक उद्योगात बॉलिवूडचा वाटा काही कोटींचा आहे. आता भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनाला, प्रसारणाला, एवढेच नव्हे तर भारतात चित्रीत जाहिरातींच्या प्रसारणावरही पाकिस्तानने बंदी घातली आहे. खऱ्या अर्थाने संवाद सुरू व्हावा, ही त्या देशाची भूमिका प्रामाणिक आहे किंवा नाही, असा प्रश्‍न निर्माण होतो. भारत आणि पाकिस्तान या दोन्हीही देशातील जनतेत सांस्कृतिक, कला, व्यापार, उद्योग अशा अनेक पातळ्यांवर सहकार्य वाढवून सौहार्द, शांतता वाढवावी, असे सांगणारा एक वर्ग आहे. ती भूमिका रास्तही आहे; परंतु टाळी एका हाताने वाजत नाही, हाच अनुभव भारताला पुन्हा पुन्हा आला.

या सगळ्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानच्या पुलवामातील आगळीकीस आपण दिलेले ठोस उत्तर अनेकार्थांनी महत्त्वाचे आणि आवश्‍यक असेच होते. जागतिक नेतृत्वाला पाकिस्तानचा मुखवट्यामागचा चेहेरा किती विद्रूप आणि द्वेष, मत्सर यांनी भेसूर झालाय, हे लक्षात आले आहे. हीच वेळ आहे दहशतवादाविरोधाची लढाई अधिक तीव्र करण्याची. सध्या वाढलेला दबाव कायम ठेऊन पाकिस्तानला दहशतवाद गाडण्यास भाग पाडण्यासाठी राजनैतिक पातळीवर मोहीम हाती घेतली पाहिजे. मात्र ती दीर्घकाळ चालणारी आहे, याची जाणीव सर्वांनीच ठेवायला हवी. तो संयम बाळगला आणि मुत्सद्देगिरीच्या आघाडीवर सातत्याने प्रयत्न केले तरच सध्या मिळालेल्या यशाला टिकाऊ आणि ठोस रूप मिळेल.

Web Title: Indian Air Strike: Wing Commander Abhinandan Varthaman and india Challenge pakistan in editorial