Saturday, 24 February 2018

अंदमान समुद्रात २२ देशांच्या नौसेनांचा एकत्र सराव

 

येत्या ६ मार्च ते १३ मार्च या काळात अंदमान निकोबार समुद्रात सर्वात मोठा नौसेना युद्धाभ्यास होणार असून यात भारताबरोबर अन्य १७ देशांच्या नौसेना सामील होणार आहेत. पोर्टब्लेअर येथे होत असलेला हा युद्धाभ्यास इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे सांगितले जात आहे. हिंद महासागराला लागून सीमा असलेले २२ देश या सरावात त्यांच्या युद्धपोतांसह सामील होत असून यात पाकिस्तानचा समावेश नाही.

या सरावात नौसैनिक युद्ध, नैसर्गिक आपदा या विरोधात एकत्र येण्यासाठी आपसातील ताळमेळ वाढविण्याचे काम करणार आहेत. समुद्री क्षेत्रात बेकायदा होणाऱ्या हालचाली थांबविणे हाही या सरावामागचा उद्देश आहे असे समजते.

No comments:

Post a Comment