वृत्तसंस्था
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018
नवी दिल्ली - भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला फायटर पायलट अवनी चतुर्वेदी यांनी 'सुपरसॉनिक फायटर जेट' हे फायटर विमान उडवून नवा इतिहास रचला. 19 फेब्रुवारी रोजी गुजराथच्या जामनगर एअरबेस वरुन त्यांनी मिग- 21 हे विमान उडविले. मिग-21 विमान हवेत उडवण्याचे प्राथमिक प्रशिक्षण दिल्यानंतर हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतरच्या टप्प्यात चंद्रप्रकाशात आणि गडद काळोखातही विमान चालवण्याचे प्रशिक्षण वैमानिकांना देण्यात येते. हे प्रशिक्षण अत्यंत खडतर असते. अवनी जून 2016 पासून हे प्रशिक्षण घेतले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारे फाटर विमान उडविण्यासाठी एका वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी जवळपास 15 कोटी खर्च येतो. इतिहासात पहिल्यांदाच महिलेने मिग-२१ हे विमान उडविले. या प्रशिक्षणादरम्यान महिला आहेत म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचे झुकते माप देण्यात आले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment