नवी दिल्ली : पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी निळ्या रंगाचे बाल आधारकार्ड युआयडीआयने जारी केले आहे. हे विशेष आधारकार्ड काढण्यासाठी आई किंवा वडिलांपैकी एकाचा आधार क्रमांक आणि जन्मदाखल्याची आवश्यकता भासणार आहे. लहान मुलांसाठीचे हे विशेष आधारकार्ड काढण्यासाठी बायोमेट्रिक तपशीलांची आवश्यकता भासणार आहे.
A child below 5 years of age gets a blue in coloured Aadhaar known as Baal Aadhaar. When the child becomes 5 yr old, a mandatory biometric update is required. #AadhaarForMyChild pic.twitter.com/5IBZRuo7Tr
- Aadhaar (@UIDAI) February 23, 2018
सर्व प्रकारच्या सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी आता हा दस्तावेज महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची माहिती युआयडीआयने ट्विटरद्वारे दिली आहे. दरम्यान संबंधित मुलाने वयाची पाच वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याचे बायोमेट्रीक तपशील अपडेट करावे लागणार आहे. मूल सात वर्षांचे होईपर्यंत जर बायोमेट्रिक अपडेट न केल्यास निळ्या रंगाचे आधारकार्ड आपोआप रद्द होईल.
Dailyhunt
No comments:
Post a Comment