Thursday 8 December 2016

खात्रीशीर माहिती हा एक मोठा साठा असून छायाचित्र माहितीला पाठबळ देते – व्यंकय्या नायडू

खात्रीशीर माहिती हा एक मोठा साठा असून छायाचित्र माहितीला पाठबळ देते – व्यंकय्या नायडू
माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी केले चौथ्या द्वैवार्षिक छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन   
नवी दिल्ली, 8-12-2016  :  माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज ललित कला अकादमी येथे ऑल इंडिया वर्किंग न्यूज कॅमेरामेन्स असोसिएशनने भरवलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले. खात्रीशीर माहिती हा मोठा साठा असून छायाचित्र माहितीला पाठबळ देते, असे नायडू यांनी यावेळी सांगितले.

एका छायाचित्रात हजार शब्दांचे सामर्थ्य असते. संवादासाठी शब्द आवश्यक असले तरी काही वेळेस छायाचित्र अधिक नेमके आणि समर्थपणे म्हणणे मांडू शकते, असे नायडू म्हणाले. वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणी वाहिन्या बातम्यांसाठी छायाचित्राचा उत्तम वापर करु शकतात, असे त्यांनी सांगितले.

“ मी जर माझ्या डोळ्यांनी पाहिले तर मी विश्वास ठेवेन” असे आपण म्हणतो. अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की, इतर इंद्रियांपेक्षा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास ठेवण्याकडे लोकांचा कल असतो असे नायडू म्हणाले. सत्याचे वार्तांकन करणे हे वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांचे कर्तव्य आहे. लोकांना शंका येऊ शकते अशा वक्तव्यांना पुष्टी द्यायला छायाचित्रांचा वापर करता येऊ शकेल, अशी सूचना नायडू यांनी यावेळी केली.

नायडू यांनी वृत्तछायाचित्रकारांचे कौतुक केले. कला आपल्या रक्तात असून ती आपल्या संस्कृतीचा भाग आहे, असे नायडू म्हणाले.

PIB Release/DL/1878   

No comments:

Post a Comment