Thursday, 19 November 2015

शहिद संतोष मधुकर घोरपडे - वेटेरन दिलीप हिरे


मुळ नाव संतोष मधुकर घोरपडे
जन्म पोगरवाडी ता सातारा
शेजारील आरेदरे गावात माऊशी रहाते
माऊशीने दत्तक घेतले तेव्हा पासुन त्याचे नाव
संतोष महाडिक
संतोषचे वडीलांचे दुकान पोवई नाका येथील विजय टेलर
त्यांच्या वडीलांचे गेल्या वर्षी निधन झाले
त्याचा भाऊ दुध व्यवसाय करतो
साताऱ्यातल्या पोगरवाडीत आज कमालीची शांतता आणि शोककळा आहे. पोगरवाडीनं आणखी एक सुपुत्र गमावलाय. कर्नल संतोष महाडिक दहशतवाद्यांविरोधात लढताना धारातीर्थी पडलेत. कर्नल संतोष महाडिक यांना श्रीनगर इथं लष्कराच्या जवानांची मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी नेण्यात आलंय.
साताऱ्यातलं पोगरवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे. काल दुपारपासूनचं गावात अनामिक शांतता  पसरलीय. कर्नल महाडिकांचे मित्र, आप्तेष्टांचं ऊर त्यांच्या आठवणी सांगताना भरून येतोय. संध्याकाळी याच गावात कर्नल महाडिकांवर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंत्कार होणार आहेत. 
संपुर्ण जगाच्या नजरा या सीरियावर आहेत. याच दरम्यान काश्मीरमध्ये देशाचा एक जवान दहशतवाद्यांच्या गोळ्यांचा शिकार बनला. लष्कर-ए-तोयबाच्या चार ते पाच अतिरेक्यांनी १२ दिवसांपूर्वी घुसखोरी केल्याची पक्की खबर लष्कराला मिळाली होती.
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ मनीगाहमध्ये हे अतिरेकी दडून बसले होते. त्यांना कंठस्नान घालण्यासाठी कर्नल संतोष महाडिक निघाले होते. 
तब्बल १२ दिवस चाललेल्या या ऑपरेशनमध्ये जाँबाज सैनिकांनी दहशतवाद्यांना तीन वेळा कोंडित पकडलं. मात्र, तिन्ही वेळा ते पळून गेले. अखेर लष्करानं कर्नल संतोष महाडिक यांच्याकडे या ऑपरेशनचं नेतृत्व दिलं. यानंतर सुरु झाली अतिरेकी आणि जवानांमधली चकमक. १६०-टीए बटालियनचे जवान मजलूम अहमद यांच्यासह तीन जवान जखमी झाले. 
एकीकडे जवान जखमी होत असताना कर्नल महाडिकांनी झुंज सुरूच ठेवली. दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी आपल्या जवानांसह अतिरेक्यांच्या दिशेनं कूच करायला सुरूवात केली... पण... मात्र एका बेसावध क्षणी अतिरेक्यांच्या गोळीनं हा जाँबाज लढवय्या टिपला. त्यांच्या डोक्यात आणि पोटाला गोळ्या लागल्या. त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेचच त्यांना रुग्णालयात हलवलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
 
वेटेरन दिलीप हीरे
मालेगाव् तालुका जय जवान संघ

No comments:

Post a Comment