Thursday, 30 April 2015

राहत मोहिमेचे यशस्वी सूत्रधार : जनरल व्ही. के. सिंग

     येमेनमधल्या युद्धाच्या वणव्यातून आपण ४६४0 भारतीय आणि ९६0 विदेशी नागरिकांची सहीसलामत सुटका केली. अमेरिका आणि ब्रिटनसह ४१ देशांनी येमेनमधील नागरिकांच्या स्थलांतरणासाठी भारताची मदत घेतली. या 'ऑपरेशन राहत' मोहिमेचं आंतरराष्ट्रीय समुदायानंही कौतुक केलं आहे. खरे तर परराष्ट्र खात्यानं जानेवारीतच येमेनमधील भारतीय नागरिकांना धोक्याची सूचना दिली होती आणि येमेनमधून बाहेर पडण्याचं आवाहन केलं होतं. पण तरीही मार्चअखेरीस सुमारे चार हजार भारतीय येमेनमध्येच अडकून पडले होते. हवाई हल्ले सुरू झाल्यावर परराष्ट्र खात्याचे अधिकारी आणि येमेनमधील भारतीय दूतावासातील कर्मचार्‍यांनी सुटकेचे प्रयत्न सुरू केले. याच मोहिमेचं ऑपरेशन राहत असं नामकरणही झालं. परराष्ट्र राज्यमंत्नी जनरल व्ही. के. सिंग यांनीही जातीनं ऑपरेशन राहतवर लक्ष केंद्रित केलं आणि सर्व भारतीयांना येमेनमधून बाहेर काढण्यात यश आलं आहे. जनरल व्ही. के. सिंह हे परराष्ट्र राज्यमंत्नी लष्करप्रमुख असल्यामुळे त्यांना युद्धजन्य परिस्थितीत कोणते निर्णय अचूक घ्यावेत याचा अनुभव आहे. तो यावेळी कामी आला. जनरल व्ही. के. सिंह हे परराष्ट्र राज्यमंत्नी असल्याने दिल्लीच्या पातळीवरून निर्णय घेण्यात मदत झाली. सिंह हे जिबुटीला रवाना झाले आणि मग सुरू झाले ऑपरेशन राहत. १ एप्रिलला सुरू झालेली ही बिकट मोहीम दहा दिवसात संपली. पहिले विमान जिबुटीहून उडाले तेव्हा विमानातील लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
     राहतच्या यशामुळे जनरल सिंहांच्या कामगिरीची आपण चर्चा करीत होतो त्याच वेळी प्रसारमाध्यमांच्या वरच्या त्यांच्या शेरेबाजीमुळे त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागत होते. मुळातच सिंहांना टीका नवी नाही. भारताचे लष्करप्रमुख म्हणून सेवानवृत्त होताना देखील त्यांच्या संदर्भात चर्चा झाली ती त्यांनी आपल्या जन्मतारखेच्या संदर्भात त्यांनी निर्माण केलेला वाद आणि त्यावरून त्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याचीच. जनरल सिंह हे एक नावाजलेले लष्करी अधिकारी आहेत. परमविशिष्ट सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्धसेवा मेडल असे लष्करी गौरव त्यांनी छातीवर धरण केलेले आहेत. हरियाणातल्या भिवानी जवळच्या बोपारा गावचे सिंह कुटुंब हे लष्करी बाण्याचे म्हणून ओळखले जाते.
     आज पासष्टीच्या घरात असणार्‍या जनरल सिंहांच्या घरातल्या तीन पिढय़ा लष्करी सेवेत होत्या. त्यांचे वडील जगतसिंह हे कर्नल होते आणि आजोबा मुखराम हे रिसालदार मेजर होते. १९७0 मध्ये लष्करात कमिशन मिळवून विजयकुमार सिंह लष्करातल्या काली चंडी म्हणून ओळखल्या जाणार्‍या दुसर्‍या राजस्थान बटालियनमध्ये दाखल झाले. पुढे भारत पाकच्या सीमेवर प्रत्यक्ष ताबा रेषेवर काम करताना याच बटालियनचे प्रमुख म्हणून सूत्ने हातात घेण्याचे भाग्यही त्यांना लाभले होते. तामिळनाडूच्या प्रसिद्ध वेलिंग्डन कॅन्टोन्मेंटच्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये त्यांचे प्रशिक्षण झाले आहे. अमेरिकेतल्या युनायटेड स्टेट आर्मी इन्फन्ट्री स्कूल आणि यूएस स्टेट आर्मी वॉर कॉलेजमध्येही त्यांचे लष्करी शिक्षण झाले आहे. त्यात कॉम्बॅट ऑपरेशन्समध्ये ते सर्वोच्च स्थानावर आले होते. १९७१च्या बांगला देशच्या युद्धात त्यांनी अतुलनीय कामगिरी केलेली आहे. लष्कराच्या मुख्यालयात मिलिटरी ऑपरेशन्सचे संचालक म्हणूनही त्यांनी यशस्वीपणाने काम केलेले आहे. भूतानमधल्या भारतीय लष्कराच्या प्रशिक्षणाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. आपली जन्मतारीख चुकीची लागलेली आहे असा त्यांचा दावा होता आणि त्यावरून ते सरकारच्या विरोधात न्यायालयातही गेले होते अशी न्यायालयाची पायरी चढणारे ते पहिले लष्करप्रमुख ठरले होते आणि यावरून त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती. आदर्श सोसायटी आणि सुकुना जमीन हडपण्याचे प्रकरण अशा उघडउघड भ्रष्टाचाराच्या ठरलेल्या प्रकरणांमध्ये त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि कडक भूमिका घेतली होती.
     काश्मीरमधल्या अतिरेक्यांच्या नेत्यांना शासनच पैशाचा खुराक देते अशी सनसनाटी माहिती त्यांनी बिनिदक्कतपणाने जाहीर केली होती. आजही परिणामांची फारशी पर्वा न करता आपली मते अत्यंत परखडपणाने व्यक्त करण्यात त्यांचा नंबर बराच वरचा आहे. २0१२मध्ये सेवानवृत्ती घेतल्यावर ते स्वस्थ बसणार नाहीत असाच अंदाज होता. त्यानुसारच ते सामाजिक कामात आले. सुरुवातीला अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनाशी ते जोडले गेले आणि त्यातूनच ते काहीकाळ किरण बेदी आणि केजरीवाल यांच्या इंडिया अगेन्स्ट करप्शनशीदेखील जोडले गेले.
     स्वामी रामदेवांच्या काळ्या पैश्याचा विरोधातल्या आंदोलनाशीही हे जोडले गेले होते. शेवटी ते भाजपात दाखल झाले.  लोकसभा निवडणुकीतील प्रचाराच्या सुरुवातीचीच माजी सैनिकांची  सभा  हरियाणातल्या  भिवानी मध्ये   मोदिनी घेतली होती , तिचे सूत्र जनरल  व्ही. के. सिंग यांनी  सांभाळली होती.  निवडणुकीत ते निवडून आले आणि मोदींच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री झाले.  मंत्री मंडळातील मंत्री नक्की काय काम करतात हे जनतेसमोर कधी येताच नाही. तसेच जनरल सिंघ याचेही  झाले असते, ऑपरेशन राहत ने त्यांनी आपले नाणे खणखणीत पने  वाजवून आपले कर्तृत्व सिद्ध केले आणि राहत मोहिमेचे खरे सूत्रधार बनले.  

Op Rahat : Proud Indian Navy

Indian Navy Ships Mumbai And Tarkash Return to Hero’s Welcome 

INS Tarkash which participated in the Operation Rahat returned to Mumbai harbour this morning while INS Mumbai had entered on 16 April 15. The ships’ crew was greeted by senior officers of the command and the Chief of Naval Staff will be interacting with the crew on Monday, 20April 15.
 
Earlier this year, a raging civil war in Yemen has left thousands of people homeless and stranded. Military intervention by Saudi Arabia and other nations have further complicated the situation with aerial bombardments continuing relentlessly across the country. The airports and seaports of the country, with the exception of Al Hodeidah, have been thrown out of gear leaving very little room for movement of people from the strife-torn country.
Prior to commencement of operations, Indian diaspora in Yemen was estimated to be approximately 4000 people working in all walks of life. Some of them had been working and earning a living in Yemen for decades. Most of them were located in and around the capital city of Sanaa,which had seen much violence and had been under relentless attack. With the situation in the country deteriorating rapidly, the Indian Government had ordered evacuation of Indian nationals from Yemen on 30 Mar 15.
 
The Indian Navy was first off the starting block, with INS Sumitra, one of the newest Offshore Patrol Vessels of the Indian Navy, being diverted immediately from her operational tasking in the Gulf of Aden. She immediately entered the Port of Aden and evacuated the first wave of 349 Indians on 31 Mar 15 and transported them to Djibouti.During the evacuation operations at Aden, the ship reported bombing and gunfire and a general disorder, pandemonium and unrest. At Djibouti, the evacuated Indians were met by Gen (Retd) VK Singh, the Minister of State for External Affairs, before they were airlifted to India by the Indian Air Force.
 
After the first group of evacuees was disembarked at Djibouti without losing any time, INS Sumitra after a quick operational turn around dispatched for the Port of Hodeidah on 02 Apr 15, from where the ship evacuated another 317 people (mostly Indian nationals) amidst similar unsecure conditions with bombing in the distance. This second wave was transported to Djibouti on 03 Apr 15.
 
In the meanwhile, two major warships i.e. guided-missile destroyer INS Mumbai and the guided-missile frigate INS Tarkash were sailed from Mumbai to Yemen on evening of 30 Mar 15. Two Indian passenger ships, MV Kavaratti and MV Coral, which normally ply between Kochi and the Lakshadweep Islands, were also sailed out from Kochi towards Yemen. IN Ships Mumbai and Tarkash were tasked to escort these passenger ships till Djibouti as the waters of the Gulf of Aden have been piracy-infested since 2008.
 
As the days progressed, the Port ofAden was engulfed in shelling and firing and permission for entry of ships was not accorded by the local authorities as fighting raged in the port city. As more than 300 Indians were known to be awaiting evacuation from Aden, INSMumbai was relieved of escort duties and was dispatched to reach off Aden,where she arrived in the wee hours of 04 Apr 15, while INS Tarkash continued to escort the passenger ships, which reached Djibouti on 05 Apr 15afternoon. In a well coordinated operation, 441 people, including foreign nationals, women, elderly persons and children were evacuated using boats from the Port of Aden to INS Mumbai, which was just outside the port and were evacuated to safety in Djibouti by the morning of 05 Apr 15.
 
After all ships were in area the evacuation cycle continued with close cooperation between various government agencies participating in the area and the three ships. As very few countries were participating in evacuation, requests poured in from the international community to evacuate their citizens from the war zone also. Keeping safety of life as paramount requirement, these ships, provided assistance to many foreign nationals in escaping to safety. In all these ship undertook a total of nine missions to various ports to evacuate over 3,000persons form war torn Yemen. This included nearly 1,300 people from over 30 foreign countries. A table depicting details of evacuations undertaken is as follows:-
 
 
DATE
EVACUATION
PORT
SHIP
AT DJIBOUTI
NO OF PERSONS
INDIA
OTHERS
TOTAL
31 MAR
ADEN
SUMITRA
01 APR
349
--
349
02 APR
AL HODEIDAH
SUMITRA
03 APR
306
11
317
04 APR
ADEN
MUMBAI
04 APR
265
176
441
05 APR
ASH SHIHR
SUMITRA
05 APR
182
21
203
06 APR
AL HODEIDAH
MUMBAI
06 APR
463
11
474
07 APR
AL HODEIDAH
TARKASH
08 APR
54
20
74
09 APR
AL HODEIDAH
SUMITRA
10 APR
46
303
349
10 APR
ADEN
TARKASH
11 APR
42
422
464
15 APR
AL HODEIDAH
SUMITRA
16 APR
76
327
403
 
 
 
TOTAL
1783
1291
3074
 
With most Indian already evacuated,Indian Naval Ships Mumbai and Tarkash left Djibouti for Indian coast on PM 12April 2015, while INS Sumitra continued to remain in the area for the final evacuation mission conducted on 15 Apr 15 and for expeditious response to any contingency. INS Sumitra will also resume her Anti Piracy patrol duties and will thus be available in the area for quick response to any untoward development. INS Mumbai reached Mumbai Harbour on 16Apr 15 and INS Tarkash escorted the two MVs Kavaratti and Coral out of piracy ridden Gulf of Aden and returned Mumbai harbour on 18 Apr 15. The two MVs with evacuees on them entered Cochin on PM 18 April 15.
 
The operation was executed under the operational control of the Western Naval Command, headquartered at Mumbai under the directives and monitoring at Integrated Headquarters (Ministry of Defence) Navy. In an unprecedented show of synergy, the MEA and MoD (Inidan Navy and Indian Air Force) worked in absolute synchronisation and real-time information was exchanged with the ships on the scene through satellite communications.
 
 
 

Wednesday, 15 April 2015

Sainik Darpan Apr 2015


जीवन प्रमाण (Digital Life Certificate)

     केंद्र सरकारच्या कर्मचारी, सार्वजनिक गाऱ्हाणी व निवृत्ती वेतन या कामासाठी एक विशेष विभाग वर्ष 1985 पासून कार्यरत आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती लाभासंबंधी धोरणे ठरविणे व त्यातील लाभाबाबत समन्वय घडवून आणणे ही कामे या विभागातर्फे केली जातात.  आज निवृत्तीधारकांची संख्या 55 लाखापेक्षा जास्त आहे. ती कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येपेक्षा जास्त आहे. या विभागाने अलिकडेच काही नवे उपक्रम निवृत्ती वेतनधानकांसाठी सुरू केले. त्यातील मुख्य म्हणजे आधार कार्डाच्या आधारावर डिजिटल स्वरुपातील हयातीचा दाखला ही निवृत्ती वेतनधारकांसाठी एक भेट आहे.  

     सर्व निवृत्त वेतनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात ते हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. पंतप्रधानांनी 10 नोव्हेंबर 2014 रोजी निवृत्ती वेतनधानकांकरीता विशेष योजना सुरू केली. 'आधार बेस्ड लाईफ सर्टिफिकेट ऑथिंटिकेशन सिस्टिम फॉर पेंशनर्स' असे या कार्यपध्दतीचे नांव आहे. 'डिजिटल इंडिया' या स्वप्नपूर्तीकडे नेणारे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यासाठी केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाने आवश्यक ते तंत्रज्ञान पुरविले आहे. या सॉफ्टवेअरच्या वापरामुळे पेंशनरांचा आधार कार्ड नंबर आणि त्यांच्या देहाविषयी तपशील म्हणजे हाताचे ठसे, देहावरील ओळख पटविण्याचा खूणा इ. माहितीची नोंद केली जाते. शारीरिक माहितीची नोंद करणारी विशेष सोय या सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या ज्या पेंशनरांना या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी त्यांची नोंदणी 'जीवन प्रमाण' या अर्जावर करणे आवश्यक आहे. डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मिळविण्यासाठी  http://www.jeevanpraman.gov.in  या वेबसाईटवर संपर्क करावा. त्यांच्या पेंशन वितरणाच्या अर्जावर डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची माहिती नोंदण्यासाठी याच वेबसाईटचा उपयोग करावा.

     आतापर्यंत 17000 हून अधिक निवृत्ती वेतन धारकांनी त्यांचे हयातीचे प्रमाणपत्र ऑन लाईन सादर केले आहे. मागील महिन्याच्या अंकात मध्ये Digital Life Certificate  कसे करून घेत येईल या विषयी सूचना केल्या होत्या

अजूनही ज्यांनी Digital life certificate  बनविले नसेल त्यांनी लवकरात लवकर बनवून ध्यावे व त्याचही प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालात सदर करावी. 
आपण सर्वाना अक्षय तृतीयेचा शुभेच्छा
जय जवान ! जय भारत !! जयहिंद !!!