Saturday 11 February 2023

`द मास्ट्री ऑफ हिंदुस्थान-ट्रम्पस अँन्ड ट्रॅव्हल ऑफ माधवराव पेशवा` चे प्रकाशन - लेखक उदय कुलकर्णी

 




फोटो ओळ- लेखक उदय कुलकर्णी यांच्या द मास्ट्री ऑफ हिंदुस्थान-ट्रम्पस अँन्ड ट्रॅव्हल ऑफ माधवराव पेशवा या पुस्तकाचे प्रकाशन करतांना व्हाईस अँडमिरल(निवृत्त) सोनिल भोकरे शेजारी संस्थेच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरवणे,खजिनदार शितल देशपांडे, डॉ. तेजस् गर्गे,अमित पेठे

---------------------------------

कसदार लेखनाबरोबरच दाखले,संदर्भ हिच ऐतिहासिक पुस्तकांची श्रीमंती

भोकरेः उदय कुलकर्णी यांच्या `द मास्ट्री ऑफ हिंदुस्थान-ट्रम्पस अँन्ड ट्रॅव्हल ऑफ माधवराव पेशवा` चे प्रकाशन

नाशिकः ऐतिहासिक लिखान हे एक आव्हान असते, लेखन करतांना लेखक आपल्या लेखनात किती संदर्भ,दाखले आणि पुरावे देतो यावर त्या इतिहासाची सत्यतता अवलंबून ठरते, अशापध्दतीचे कसदार उच्चतम लेखन हिच त्या पुस्तकांची खरी श्रीमंती असते, असे प्रतिपादन व्हाईस अँडमिरल(एव्हीएसएम,व्हीएसएम,एनएम(निवृत्त) सोनिल भोकरे यांनी केले. लेखक उदय कुलकर्णी यांच्या `द मिस्ट्री ऑफ हिंदुस्थान-ट्रम्पस अँन्ड ट्रॅव्हल ऑफ माधवराव पेशवा` हे ऐतिहासिक पुस्तकही असेच वेगळे आहे, ते वाचकांना नक्कीच भावेल असा विश्वास श्री.भोकरे यांनी व्यक्त केला.

     सेंट्रल हिंदु मिलीटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे आज डॉ.मुंजे इन्स्टीट्युटच्या सभागृहात उदय कुलकर्णी यांच्या `द मास्ट्री ऑफ हिंदुस्थान-ट्रम्पस अँन्ड ट्रॅव्हल ऑफ माधवराव पेशवा` या पुस्तकाचे प्रकाशन श्री.भोकरे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अर्कालॉजिकल अँन्ड म्युझियमचे संचालक डॉ.तेजस् गर्गे,संस्थेच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरवणे,कार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे, खजिनदार शितल देशपांडे,सहकार्यवाह नितीन गर्गे आदी उपस्थित होते. श्री.भोकरे यांनी कुलकर्णी यांच्या लेखनाचे कौतुक केले. ते म्हणाले, आजच्या डिजटलायजेशन आणि धावपळीच्या युगात वाचन कमी झाले. स्वयंअध्ययनासाठी कुणालाही वेळ नाही. काय आणि कसे वाचवे हे अनेकांना समजतच नाही. अशा काळात या इतिहासकालीन पुस्तकांची निर्मिती झाली आहे. वेगवेगळ्याप्रकारच्या इतिहासातील घटना,कार्यपध्दती दर्शवतांना श्री.कुलकर्णी यांनी भरपूर,संदर्भ,छायाचित्रे,पुरावे दिले आहे, त्यामुळे मराठ्याचा हा इतिहास समजून घेतांना निश्चीतच मदत होईल, लेखन,संपादन,वितरण अशा सर्व बाजूंनी हे उच्चतम दर्जाचे पुस्तक झाले असून विद्यार्थी,अभ्यासक,संशोधक,शिक्षक अशा सर्वांनाच त्याचा उपयोग होणार आहे. यावेळी त्यांनी बाजीराव मस्तांनी चित्रपटातील काही प्रसंग सांगितले.

    डॉ.गर्गे म्हणाले, या पुस्तकाची निर्मिती करतांना विविध सुक्ष्मबाबींच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. यातील घटनांबाबत डावे-उजवे न करता सत्यपरिस्थिती लेखकांनी मांडली आहे. वेगवेगळ्या काळातील व्यक्तीमत्वाचा वेध घेण्यात आल्याने पुस्तक निश्चित सर्वांसाठी मदतनीस ठरेल यात शंका नाही. लेखक कुलकर्णी यांनी प्रेझेन्टेशनद्वारे मराठा साम्राज्य,मुघल राजवट व पानिपतसह इतर युध्दजन्य परिस्थितीचे वर्णन ऐकवले. श्री.देशपांडे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. अमित पेठे यांनी सुत्रसंचालन केले.वंदेमातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.


No comments:

Post a Comment