आपल्याला माहीती आहे की, महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 13.04.2022 च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ज्या माजी सैनिकांचे,शहीद जवानाचे विधवा भगिनींचे व सेवेत कार्यरत असलेल्या सैनिकांचे आणि त्यांच्या कुटूंबियाच्या ज्या प्रलंबित तक्रारी आहेत त्या तक्रारी कामांचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी शासनाने दिनांक 01 मे ते 15 जून 2022 पर्यंत “अमृत जवान अभियान” सुरु केलेले आहे.
त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व सैनिकांना दिनांक 14/05/2022 पासुन whatsapp मेसेज व्दारे अव्हान करण्यात आले होते त्यास अनुसरुन महाराष्ट्रातील अनेक सैनिकांचे फोन येऊ लागले आहेत तर शिरुर तालुक्यातील काही सैनिकांनी सोबत जोडलेल्या पत्राप्रमाणे त्यांच्या तक्रारी सुध्दा तहसिलदार कार्यालयाकडे दाखल केलेल्या आहेत.
तरी महाराष्ट्रातील सर्व सैनिकांना विनम्र विनंती आहे की ज्या सैनिकांच्या वैक्तिक तक्रारी शासकीय कार्यालयाकडे प्रलंबित आहेत त्या सैनिकांनी सोबत जोडलेल्या पत्राच्या नमुन्यात आप आपल्या तालुक्यात तालुकास्तरावर स्थापन केलेल्या अमृत जवान सन्मान अभियान समन्वय समिती कडे म्हणजे मा.सदस्य सचिव तथा तहसीलदार साहेब तहसीलदार यांचे कार्यालय तालुका - जिल्हा - (महाराष्ट्र) या कार्यालयाकडे तातडीने लेखी स्वरुपात दाखल करण्यात याव्यात आणि दाखल केलेल्या तक्रारी पत्रावर त्या संबंधित तहसिलदार कार्यालयाची पोहोच घेण्यात यावी तसेच सदरची पोहोच ही आपल्या तालुक्यातील सैनिक संघटनेच्या तालुका अध्यक्षांकडे जमा करावी.जेणेकरुन संघटनेच्या कार्यालयाकडे जमा केलेल्या प्रलंबित प्रकरणांचे विषय निहाय एकत्रिकरण करण्यात येईल आणि त्या तक्रारी पत्रांच्या पुराव्याच्या आधारे दिनांक 15 जून 2022 नंतर त्या त्या तालुक्यातील संघटनेच्या माध्यामातुन संबंधित तहसिलदार साहेबांची समक्ष भेट आपल्या तक्रारीवर केलेल्या कार्यवाही संदर्भात विचारणा करण्यात येईल.
तेव्हा शासनाने महाराष्ट्रातील सर्व सैनिकांना त्यांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी या अभियाना व्दारे एक सुवर्ण संधी दिलेली आहे हे प्रथम लक्षात घ्यावे. तेव्हा “अभी नही तो फीर कभी नही” या उक्तीप्रमाणे जर सैनिकांनी आपल्या तक्रारी असताना ही वेळेत दाखल केल्या नाहीत तर अभियान कालावधीनंतर शासन व प्रशासनच असे जाहीर करेल की महाराष्ट्रात 01 मे ते 15 जून 2022 पर्यंत अमृत जवान सन्मान अभियान शासनाच्या वतीने राबविले होते. परंतु “संपुर्ण महाराष्ट्रात कोणत्याच सैनिकांच्या तक्रारी तालुका स्तरावर स्थापन केलेल्या अमृत जवान सन्मान अभियान समिती तथा तहसिलदार कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या नाहीत.त्यामुळे महाराष्ट्रात सैनिकांच्या तक्रारी प्रलंबित नाहीत” मंग बसा बोंबलंत कृपया अशी वेळ येऊन देऊ नका ही पुन्हा पुन्हा विनंती आहे.
तसेच महाराष्ट्रातील सर्व गाव व तालुका आणि जिल्हा तसेच राज्यस्तरीय सैनिक संघटनांना सुध्दा पुन्हा विनंती आहे की,महाराष्ट्रातील सैनिकांच्या प्रलंबित असलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी हे शासनाने अभियान सुरु केलेले आहे परंतु आप आपल्या गावातील,तालुक्यातील व जिल्हयातील आणि राज्यातील आपल्या सैनिकांच्या ज्या प्रलंबित तक्रारी आहे त्या संबंधित प्रशासनाने पुर्ण या अभियानात सोडविल्या गेलेल्या आहेत किंवा नाही? हे पहाणे महाराष्ट्रातील प्रत्येक सक्रिय संघटनेची जबाबदारी आहे. त्यामुळे ही जबाबदारी प्रत्येक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्किारल्यास शासनाने सुरु केलेले अभियान 100% यशस्वी होईल आणि हे अभियान 100% यशस्वी करण्यासाठी म्हणजेच आपल्या सैनिकांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फक्त् दिनांक 15 जून 2022 पर्यंत प्रत्यक्षात ग्राऊंडवर काम करावे लागणार आहे. तरी या अभियानात सर्वांनी प्रत्यक्षात सहभागी होऊन हे अभियान आपल्या सैनिकांच्या प्रलंबित तक्रारीचे निरसन करण्यासाठी 100% यशस्वी करावे.
ही विनंती.
जय हिंद !!!
No comments:
Post a Comment