नवी दिल्ली - येथे काल (बुधवार) झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी लष्कराला राजकारणापासून बाजूला ठेवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
यावेळी त्यांनी जून्या दिवसांची आठवण काढत, महिला आणि राजकारण या दोन विषयांवर संरक्षण दलामध्ये चर्चा होऊ नये, असा नियम पूर्वी होता. परंतु काळाच्या ओघात या गोष्टींनी शिरकाव असून, हे टाळणे आवश्यक असल्याचे मत बोलताना व्यक्त केले.
मुंबईत एलफिस्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर लष्कराला पादचारी पूल बांधण्याची सूचना करण्यात आली होती. त्यावर बरीच टीका झाली. परंतु, पूर अथवा भूकंपासारख्या संघर्षाच्या परिस्थितीत नागरिकांना मदत करणे, याचा संरक्षण दलाच्या कामांमध्ये समावेश होतो, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
No comments:
Post a Comment