पुणे : ''देशाच्या रक्षणार्थ लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबाकडे समाज फारसे लक्ष देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. देशातील खेड्यांमध्येही सैनिकांची कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यासाठी प्रत्येक गावात सैनिक कुटुंबीयांसाठी एक प्रतिनिधी असायला हवा, तरच सैनिकांच्या कुटुंबीयांची खरी परिस्थिती समाज व सरकारसमोर येऊ शकेल,'' असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सतीश नवाथे यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाउन आणि सैनिक मित्रपरिवार आयोजित भाऊबिजेनिमित्त शहीद व बेपत्ता जवानांच्या वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला.
हभप मकरंदबुवा औरंगाबादकर, अशोक मेहेंदळे, आनंद सराफ, अभिजित म्हसकर, सुरेश पवार, विष्णू ठाकूर, राजू पाटसकर, शिल्पा पुंडे, स्वाती ओतारी, कल्याणी सराफ, जयश्री देशपांडे उपस्थित होते. विश्वलीला ट्रस्ट, सेवा मित्रमंडळ, पूना गेस्टहाउस यांसह विविध संस्थांनी उपक्रमाला सहकार्य केले. अशोक मेहेंदळे यांनी स्वागत केले. गिरीश पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले.
No comments:
Post a Comment