Sunday, 8 January 2017

सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सरसावले माजी सैनिक - शिवाजी पालवे

जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनचे खा.गांधी यांच्या हस्ते शुभारंभ. पेन्शनमधील पैश्यातून राबविण्यात येणार सामाजिक उपक्रम

Jaihind Foundation

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सरसावलेल्या माजी सैनिकांनी स्थापन केलेल्या जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनचा शुभारंभ खा.दिलीप गांधी यांच्या हस्ते झाला. खा.गांधी यांच्या हस्ते संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी  उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुवेंद्र गांधी, फौंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, उपाध्यक्ष जालिंदर फुंदे, सचिव जगन्नाथ जावळे, निवृत्ती भाबड, भाऊसाहेब कर्पे, दिगंबर शेळके, शेरखान पठाण आदिंसह माजी सैनिक उपस्थित होते.

खा.दिलीप गांधी म्हणाले की, देश सेवेबरोबर सामाजिक सेवेसाठी पुढाकार घेणार्‍या माजी सैनिकांचा उपक्रम कौतुकास्पद आहे. आपल्या पेन्शनमधील ठराविक रक्कम समाजकार्यासाठी खर्च करण्याचा त्यांचा संकल्प प्रेरणादायी आहे. त्यांची शिस्त व कामाच्या नियोजनाने विविध सामाजिक उपक्रम यशस्वी होणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली. 

जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनच्या माध्यमातून एकत्र आलेले सर्व माजी सैनिक आपल्या पेन्शनमधील ठराविक रक्कम दरमहा जमा करुन विविध सामाजिक उपक्रम राबविणार आहे. यामध्ये वृक्षरोपण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्वच्छ भारत अभियान, मुलगी वाचवा, पाणी वाचवा जनजागृती यांचा समावेश असणार असल्याची माहिती अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिली.

No comments:

Post a Comment