Thursday 12 October 2017

विरजवान तुझेसलामभावपूर्ण श्रद्धांजली

वीजमंडळ तथा महापारेषण कंपनीतील 132 के व्ही विज उपकेंद्र साक्री येथील निवृत्त वरिष्ट उपकेंद्र चालक श्री किशोर सदाशीव खैरनार रा रणाळा ता नंदुरबार हल्ली मुक्काम नाशिक यांचे द्वितीय सुपुत्र विरजवान श्री मिलींद किशोर खैरनार हे सन 2004/05 मधे भारतीय सौरक्षण दलात वायुसेनेत जवान म्हणून सेवेत दाखल झाले होते.ते सद्या काश्मीर येथे कार्यरत असतांना आज कर्तव्यपूर्ती बजवित असतांना
आज दि 11 ऑक्टोबर 2017 बुधवार रोजी त्यांना सकाळी 9 वाजता विरमरण आले. वीरत्व प्राप्त झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभों ही भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या पच्छ्यात आई सुनंदा, वडील किशोरजी खैरनार, मोठे भाऊ मनोज खैरनार( मुंबई पोलीस) , भावजाई धनश्री,    धर्मपत्नी हर्षदा, मुलगी वेदिका 5 वर्ष, मुलगा कृष्णा 2 वर्ष असा परिवार शहीद जवान मिलिंद किशोर खैरनार यांच्या पाठीमाघे आहे. या खैरनार परिवारास हे दुःख पेलण्याचे बळ दयाघन ईश्वर देवो. अशी प्रार्थना. शहीदजवान मिलिंद हे परिवारासह गेली 20 वर्ष साक्री जि धुळे येथे वास्तव्यास होते. साक्री करांशी त्यांचे एक स्नेहपूर्ण असे नाते जोपासलेले आहे, त्यामुळे साक्रीकरांतर्फे मोठा शोक व्यक्त केला जात आहे. विरजवान मिलिंद खैरनार यांचे पूर्ण शिक्षण साक्री येथे झाले आहे. पहिली पासून ते बारावी पर्यंत न्यू इंग्लिश स्कूल साक्री येथे त्यांनी एक आदर्श विद्यार्थी म्हणून लौकिक मिळविलेला आहे. या वीरपुत्र शहीदजवान दिवंगत मिलिंद किशोर खैरनार यांना मानाचा मुजरा व सलाम
खैरनार परिवाराच्या दुःखात विज उद्द्योगातील महावितरण, महापारेशन,महानिर्मिती कंपन्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार , अभियंते , सर्व संघटना , पतसंस्था व् त्यातील पदाधिकारी ,साक्री तालुक्यातील सर्व जनता जनार्दन सहभागी आहोत

विरजवान तुझे सलाम
भारतमाता कि जय

शहीद मिलिंद खैरनार अमर रहे, अमर रहे

अनिल पवार व परिवार साक्री

No comments:

Post a Comment