Sunday, 10 December 2017

ओझर येथील ‘एचएएल’ला चाळीस ‘सुखोई-३०’ची ऑर्डर

नाशिक  (रविवार, 10 डिसेंबर 2017)

- ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेड कारखान्यात सुखोई-३० या लढाऊ विमानांचे काम पुढील दीड वर्षे पुरेल इतकेच असल्याने त्यानंतर कामे कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे; परंतु केंद्र सरकार एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्‍चर वाया जाऊ देणार नाही. त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी पुढील ३० वर्षे पुरेल इतके सुखोई ओव्हर ऑइलिंगचे काम दिले जाणार आहे. त्याचबरोबर आणखी चाळीस सुखोई-३० विमाने तयार करण्याची ऑर्डरही ‘एचएएल’ला मिळेल, असे आश्‍वासन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज दिले.

ओझर टाउनशिपमधील किनो थिएटरमध्ये ‘मेक इन इंडिया’अंतर्गत राबविण्यात आलेल्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप समीट-२०१७ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डॉ. भामरे म्हणाले, की संरक्षण क्षेत्रात नाशिकच्या ओझर येथील ‘एचएएल’ने आतापर्यंत ६५ टक्के उत्पादनाचा वाटा उचलला आहे. सध्या सुखोई-३० ही लढाऊ विमाने तयार करण्याचा शेवटचा टप्पा सुरू आहे. २०१९ पर्यंत सुखोईची कामे राहतील. त्यानंतर मात्र कामे मिळणार नसल्याची भीती कामगार, अधिकारीवर्गात आहे. पण पुढील ३० वर्षे सुखोईचे ओव्हर ऑइलिंगचे काम ओझर ‘एचएएल’मध्ये केले जाणार असल्याने कर्मचाऱ्यांनी भीती न बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले.

आतापर्यंत आपण रशियाकडून तंत्रज्ञान घेऊन लढाऊ विमाने तयार करायचो; परंतु ‘मेक इन इंडिया’अंतर्गत नवउद्योजक तयार करण्यासाठी एचएएलने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपअंतर्गत उत्पादनाला सुरवात केली आहे.

आतापर्यंत संरक्षण क्षेत्रातील ४० टक्के कामे आउटसोर्सिंगने करून घेण्यात आली आहेत. देशांतर्गत कौशल्याला वाव देऊन रोजगारनिर्मिती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करून देशासाठी सहकार्य देण्याचे आवाहन त्यांनी उद्योजकांना केले. या वेळी एचएएलचे व्यवस्थापकीय संचालक टी. सुवर्णा राजू, सिमेलाचे सीईओ पी. जयपाल, एचएएलचे अतिरिक्त महासंचालक निर्मल थसय्याह आदी उपस्थित होते. ओझर मिग कॉम्प्लेक्‍सचे मुख्य कार्यकारी अधिकारी दलजित सिंग यांनी भविष्यात ‘पीपीटी’मधूनच कामे करताना उत्पादनाबरोबरच संशोधन व विकास क्षेत्रातही हाच फॉर्म्युला अमलात आणला जाणार असल्याचे सांगितले. या वेळी ‘सुखोई-३० एमकेआय’च्या बांधणीकरिता शंभरावा असेंब्ली पार्ट डायनामॅटिक टेक्‍नॉलॉजी लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदयंत मल्होत्रा यांच्याकडून स्वीकारण्यात आला. ‘एचएएल’मुळे संरक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याचे श्री. मल्होत्रा यांनी सांगितले.

या वेळी संघटनेचे खजिनदार अविनाश कुलकर्णी, संघटक सचिव बाळासाहेब थोरात, उपाध्यक्ष सचिन माळोदे, यजुवेंद्र बरके, सहचिटणीस श्रीकांत पगार, प्रवीण गाढे, कार्यकारिणी सदस्य राहुल कोळपकर, सुधीर राजगुरू, कमलेश बनकर, सोमनाथ जाधव, मुकुंद क्षीरसागर, किशोर जाधव, रमेश कदम, विजय न्याहारकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

खासगी कंपन्यांना हेलिकॉप्टर निर्मितीचा परवाना
‘एचएएल’चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक टी. सुवर्णा राजू यांनी भविष्यात भारतीय लष्कराला नागरी मोहिमांसाठी मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या ‘एएलएच ध्रुव’ या हेलिकॉप्टर निर्मितीचा परवाना देशातील काही खासगी कंपन्यांना देणार असल्याचे सांगितले. ‘एएलएच ध्रुव’ या हेलिकॉप्टरचा वापर प्रामुख्याने कमी अंतराची प्रवासी वाहतूक, व्हीआयपी प्रवास, नैसर्गिक आपत्तीत शोध आणि बचाव मोहीम, तातडीची वैद्यकीय मदत पुरविणे यांसाठी भारतीय लष्कराला करता येईल, असे त्यांनी सांगितले.

ओझर प्रकल्प बंद पडणार नाही, काळजी नको
ब्रह्मोस क्षेपणास्त्र वाहून यशस्वी चाचणी करण्यात सुखोई-३० हे लढाऊ विमान यशस्वी ठरले आहे. त्यामुळे देशाला आणखी चाळीस सुखोई विमानांची गरज असल्याने ती तयार करण्याची ऑर्डर ‘एचएएल’ला मिळेल. तेजस हेलिकॉप्टरचे काम बेंगळुरू येथील प्रकल्पातून चालते. ते  शेअरिंग बेसिसवर ओझर येथील प्रकल्पातून सुरू करण्याचे नियोजन आहे. बेंगळुरू येथून हेलिकॉप्टरचे पार्ट ओझर येथे आणून जोडणी करण्याचे काम दिले जाणार असल्याने ओझर प्लांट बंद पडणार नाही, याची काळजी सरकार घेत असल्याचे डॉ. भामरे म्हणाले. लढाऊ हेलिकॉप्टर व हलक्‍या लढाऊ विमानांच्या पाचव्या आधुनिक आवृत्तीचे कामदेखील ओझर प्रकल्पात तयार करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

Saturday, 9 December 2017

The WhatsApp number to register complaints

The army has set up a WhatsApp number for its soldiers to post their problems directly to Army Chief Gen Bipin Rawat instead of going to the social media directly.
The move came after a series of videos were posted online by personnel from the army, IAF and central police forces regarding various conditions that they work under.

The WhatsApp number to register complaints is -- +91 9643300008.
Officials said that that there is an existing system of grievance redressal within the army which is prompt. "But in case a soldier has exhausted all grievance redressal forums and is still not happy, he may contact the Army Chief's office through the new number," an official said.
However, many in the army are apprehensive about this move as they say that it will be impossible to keep out any unwarranted messages that can come on WhatsApp.
Since it is a common WhatsApp number, it will not be just the 1.3 million-strong Indian Army personnel who can send messages to the number but also anyone in the world.
And also, there will be no check on what kind of text, video or link will be sent to the number.

Friday, 8 December 2017

CBDT extends date till 31.3.18 for linking of Aadhaar with PAN

Under the provisions of recently introduced section 139AA of the Income-tax Act, 1961 (the Act), with effect from 01.07.2017, all taxpayers having Aadhaar Number or Enrolment Number are required to link the same with Permanent Account Number (PAN). In view of the difficulties faced by some of the taxpayers in the process, the date for linking of Aadhaar with PAN was initially extended till 31st August, 2017 which was further extended upto 31st December, 2017.

It has come to notice that some of the taxpayers have not yet completed the linking of PAN with Aadhaar. Therefore, to facilitate the process of linking, it has been decided to further extend the time for linking of Aadhaar with PAN till 31.03.2018.

*****

DSM/SBS

सीबीडीटी ने आधार लिंक कराने की अंतिम तिथि 31 मार्च 2018 तक बढ़ाई

हाल ही में लाए गए आयकर अधिनियम-1961 की धारा 139एए (01 जुलाई 2017 से प्रभावी) के तहत आयकरदाताओं को अपना आधार नंबर पैन नंबर (स्थायी खाता संख्या) से लिंक करना अनिवार्य है। कुछ आयकरदाताओं को अपना आधार नंबर पैन नंबर से लिंक करने में आ रही समस्याओं को ध्यान में रखते हुए लिंक कराने की अंतिम तिथि 31 अगस्त, 2017 तक बढ़ा दी गई थी। इसके बाद फिर से यह अंतिम तिथि 31 दिसंबर 2017 तक बढ़ाई गई।

लेकिन यह नोटिस किया गया है कि अभी भी कुछ करदाताओं ने अपना पैन नंबर, आधार नंबर से लिंक नहीं किया है। ऐसे में इन्हें लिंक करने की अंतिम तिथि अब 31 मार्च, 2018 तक बढ़ा दी गई है।

Thursday, 7 December 2017

लष्कराला राजकारणापसून दूर ठेवा - जनरल बिपिन रावत

नवी दिल्ली - येथे काल (बुधवार) झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी लष्कराला राजकारणापासून बाजूला ठेवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

यावेळी त्यांनी जून्या दिवसांची आठवण काढत, महिला आणि राजकारण या दोन विषयांवर संरक्षण दलामध्ये चर्चा होऊ नये, असा नियम पूर्वी होता. परंतु काळाच्या ओघात या गोष्टींनी शिरकाव असून, हे टाळणे आवश्यक असल्याचे मत बोलताना व्यक्त केले.

मुंबईत एलफिस्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर लष्कराला पादचारी पूल बांधण्याची सूचना करण्यात आली होती. त्यावर बरीच टीका झाली. परंतु, पूर अथवा भूकंपासारख्या संघर्षाच्या परिस्थितीत नागरिकांना मदत करणे, याचा संरक्षण दलाच्या कामांमध्ये समावेश होतो, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.