Friday, 30 September 2016

'आसुर' मर्दन!

‘एलओसी’ओलांडून सर्जिकल स्ट्राइक; उरी हल्ल्याचा घेतला बदला

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमधील उरीच्या लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ११ दिवस संयम बाळगलेल्या भारताने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. लष्कराच्या विशेष जवानांनी काल मध्यरात्रीपासून आज पहाटेपर्यंत केलेल्या पाच तासांच्या लक्ष्यवेधी कारवाईत (सर्जिकल स्ट्राइक) नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवाद्यांचे सात तळ उद्‌ध्वस्त केले. या कारवाईत किमान ३५ ते ४० दहशतवादी आणि पाकिस्तानचे नऊ सैनिक ठार झाले.

पाकिस्ताव्याप्त काश्‍मीरमध्ये जमलेल्या दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानी नेतृत्वाला हा इशारा मानला जातो. काल (ता. २८) मध्यरात्री सुरू झालेली ही कारवाई आज पहाटे साडेचारच्या सुमारास समाप्त झाली. नियंत्रणरेषा ओलांडून भारताने प्रथमच अशी कारवाई केली आहे. या कारवाईत हवाई दलाचेही सहकार्य होते. उरीतील लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची मागणी जोरात होती. ‘उरीच्या हल्लेखोरांना शिक्षा दिली जाईल आणि १८ जवानांचे हौतात्म्य आम्ही विसरणार नाही,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते, तसेच हल्ल्याचे ठिकाण आणि वेळ लष्कर ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार लष्कराच्या विशेष जवानांनी ही कारवाई यशस्वी केली. उरीतील हल्ल्यानंतर व्याप्त काश्‍मीर व नियंत्रणरेषेपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील भागात एक आठवड्यापासून लक्ष केंद्रित करण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली, तर कुपवाडा आणि पूंचजवळच्या नियंत्रणरेषेजवळील पाच-सहा ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी सांगितले.

अर्थात लष्कराने कारवाईचा तपशील देण्याचे टाळले असले, तरी यात दहशतवाद्यांची आणि त्यांच्या पाठीराख्यांची लक्षणीय प्रमाणात हानी झाल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे ही मोहीम सुरू ठेवण्याची कोणतीही योजना नाही, असेही लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

लष्कराने काल मध्यरात्री नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवाद्यांचे तळ उद्‌ध्वस्त करण्यासाठी केलेली कारवाई यशस्वी झाल्यानंतर याची माहिती तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हे यावर लक्ष ठेवून होते, असे कळते. यानंतर पंतप्रधान मोदींनी आज सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन या कारवाईची माहिती दिली. तसेच सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनाही सरकारतर्फे याबाबत माहिती देण्यात आल्याचे समजते. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयातर्फे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या कारवाईची औपचारिकरीत्या घोषणा करण्यात आली. लष्करी कारवाई विभागाचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग आणि परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ही पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानी हद्दीमध्ये असलेल्या तळांवर मोठ्या प्रमाणात दहशतवादी जमा झाले असून, त्यांची घुसखोरी रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी निवेदनात स्पष्ट केले. अर्थात ही पत्रकार परिषद निवेदनापुरतीच मर्यादित राहिली.

लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी प्रारंभी उरी आणि पूंछमधील हल्ल्यांची पार्श्‍वभूमी विशद केली. नियंत्रण रेषेजवळील तळांवर मोठ्या संख्येने जमा झालेल्या दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा आणि जम्मू-काश्‍मीर व देशातील महानगरांमध्ये हल्ले घडवून आणण्याचा त्यांचा डाव आहे, अशी विश्‍वसनीय आणि अचूक माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने या तळांवर लक्ष्याधारीत हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) केले. या संभाव्य घुसखोरीमुळे भारतीय नागरिकांची जीवितहानी होऊ नये या उद्देशानेच लष्कराने ही कारवाई केली, असे त्यांनी सांगितले.

या कारवाईमध्ये दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या पाठीराख्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर ही कारवाई थांबविण्यात आली आहे. पुन्हा अशी कारवाई करण्याची लष्कराची कोणतीही योजना नाही. परंतु, कोणत्याही प्रकारचा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सदैव सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कारवाईची माहिती पाकिस्तानी ‘डीजीएमओ’ यांना देण्यात आल्याचे सांगताना लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग म्हणाले, की शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. मात्र दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेपलीकडे राहून कारवाया कराव्यात आणि आपल्या नागरिकांवर हल्ले करत राहावे हे खपवून घेतले जाणार नाही. दहशतवाद्यांना भारताविरुद्ध कारवायांसाठी आपल्या भूप्रदेशाचा वापर करू दिला जाणार नाही, या २००४ मध्ये पाकिस्तानने दिलेल्या ग्वाहीची त्यांनी पाकिस्तानला आठवण करून दिली.

उरी येथे लष्कराच्या मुख्यालयावर १८ सप्टेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये १८ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. तसेच, पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी सरकारवर वाढत्या दबावानंतर काल मध्यरात्री लष्कराने दहशतवाद्यांना धडा शिकवला. गेल्या वर्षी भारतीय लष्कराने म्यानमारच्या हद्दीत शिरून नागा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली होती. त्यानंतर कालच्या कृतीने भारतीय लष्कराची सक्षमता पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. यामध्ये लष्कराच्या तुकड्या आणि हेलिकॉप्टरचा वापर झाल्याचे समजते.

पुन्हा अशी कारवाई करण्याची लष्कराची कोणतीही योजना नाही; परंतु, कोणत्याही प्रकारचा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सदैव सज्ज आहे.

- लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग, महासंचालक, लष्करी कारवाई

सर्जिकल स्ट्राइक म्हणजे काय?

नियोजनबद्ध आणि नेमकेपणाने केलेल्या लष्करी कारवाईला ‘सर्जिकल स्ट्राइक’ म्हटले जाते. या कारवाईमध्ये जे लक्ष्य असते, त्यावरच थेट हल्ला केला जातो. आजूबाजूच्या कोणालाही या हल्ल्यामुळे नुकसान पोचणार नाही, याची काळजी यामध्ये घेतली जाते. ‘सर्जिकल स्ट्राइक’मध्ये कायद्याअंतर्गत बसणाऱ्या गोष्टींचा विचार करूनच शत्रूच्या तळावर हल्ला केला जातो. यामध्ये कोणतीही वाहने, इमारती अथवा सार्वजनिक पायाभूत सुविधांची किंवा उपयुक्त गोष्टींची हानी होणार नाही याचीही खबरदारी घेतली जाते. ठरलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊन विमानातून बाँबहल्ला करणे हे ‘सर्जिकल स्ट्राइक’चे योग्य उदाहरण म्हणता येईल. जमिनीवरून बाँबहल्ला करण्याच्या हे अगदी विरुद्ध आहे.

अशी झाली कारवाई...

विशेष कृती दलाने बुधवारी (ता. २८) रात्री १२.३० ते पहाटे ४.३० या दरम्यान पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दोन किलोमीटर आतपर्यंत असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर ही कारवाई केली.

जवानांना उतरविण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत

व्याप्त काश्‍मीरमधील भिंबर, हॉटस्प्रिंग, केल आणि लिपा सेक्‍टरमध्ये ही कारवाई झाली.

किमान १५० जवानांना या ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे उतरविण्यात आले.

पर्रीकर, दोवाल यांचे कारवाईवर लक्ष

अत्यंत नियोजनबद्ध चाल करत जवानांनी सात दहशतवादी तळ नष्ट केले.

भारताची हानी नाही; मात्र किमान ३८ दहशतवादी ठार.

कारवाईनंतर...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेऊन मोदींनी दिली लष्करी कारवाईची माहिती.

उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांनाही दिली माहिती.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनाही याविषयी सांगितले.

गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोनिया गांधींसह सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना या कारवाईबाबत माहिती दिली.

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही केंद्रीय गृहमंत्र्यांनी लष्करी कारवाईबाबत कळविले.

राजनाथसिंह यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक.

पाककडून हल्ल्याची शक्‍यता लक्षात घेऊन पंजाब, राजस्थानमधील सीमेला लागून असलेल्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर.

जम्मू आणि काश्‍मीरमध्येही याच पद्धतीची दक्षता.

हल्ला झाल्याचा पाकिस्तानकडून इन्कार; नऊ सैनिक ठार झाल्याचा दावा

संकेत धुडकावून भारताने आक्रमण केल्याचा नवाझ शरीफ यांचा कांगावा

पुढच्या वेळी आम्ही उत्तर देऊ - ख्वाजा असिफ यांची धमकी

- - सकाळ न्यूज नेटवर्क

तोफेच्या तावडीत सापडूनही जिवंत - कर्नल सुरेश डी. पाटील

युद्धाचे कथानक अथवा कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी उत्सुकता जगभर सर्वत्र आढळते. युद्धाचे अनुभव रम्य असतात, तसेच तितकेच भयानकही असतात. माझे अनुभव मी काही माझा अहंकार म्हणून सांगत नाही, तर ते माझे अलंकार म्हणून सांगत आहे. अलंकार अशा अर्थाने, की माझ्या उभ्या आयुष्यात देशासाठी केलेली ती छोटीशी पण प्रामाणिक सेवा आहे.

भारतीय सेनेमध्ये माझा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून 1969 ला राजौरी येथे 14 ग्रेनेडियर रेजिमेंटमध्ये रुजू झालो. सैनिकी जीवनामधील प्रामुख्याने तीन लहान-मोठ्या घटना माझ्या मनावर कधीही न विसरण्यासाठी कोरल्या गेल्या आहेत.

पहिली घटना म्हणजे माझ्या कमांडिंग ऑफिसरने केलेला उपदेश. ‘माणसांच्या जीवनामध्ये काहीना काही महत्त्वाकांक्षा, लक्ष्य, उद्दिष्टे असावीत.‘ ज्या वेळी माझे प्रशिक्षण सुरू होते, त्या वेळी आमच्या कमांडिंग ऑफिसरनी वरील आशयाचा कानमंत्र आम्हाला दिला. तो कानमंत्र असा की, प्रत्येक सैनिकाने उराशी दोन महत्त्वाकांक्षा बाळगाव्यात. एक म्हणजे प्रत्येक सैनिकाने ‘जनरल‘ व्हावयाचे व दुसरी महत्त्वाकांक्षा म्हणजे प्रत्येक सैनिकाने आपल्या सैनिकी जीवनामध्ये एकदा तरी युद्धाला सामोरे जायचे. अर्थात, प्रत्येक सैनिक काही ‘जनरल‘ होऊ शकणार नाही; परंतु केव्हा ना केव्हा आपल्या देशासाठी त्याला युद्धाचा अनुभव घेता येतो आणि मीसुद्धा माझ्या सैनिकी जीवनामध्ये युद्धाचा अनुभव घेतलेला आहे व माझी दोन्हीपैकी एक महत्त्वाकांक्षा पुरी केली आहे.

दुसरी घटना 1971 मध्ये भारत-पाक युद्धाला तोंड फुटले तेव्हाची. 14 जून 1971 रोजी बंगालमधील ‘तुरा‘ या ठिकाणी युद्ध आघाडीवरील ‘मुक्ती वाहिनी‘ नामक सैनिकी तुकडीमध्ये माझी पी.ओ.डब्ल्यू. (प्रिझनर ऑफ वॉर) कॅम्प ऑफिसर इन्चार्ज म्हणून जबाबदारीच्या पदावर बदली करण्यात आली. त्या वेळी युद्धात बरेच पाकिस्तानी युद्धकैदी मिळाले होते. त्यापैकी माझा पहिला युद्धकैदी होता पाकिस्तानी ब्रिगेडिअर! त्याला घेऊन मला कोलकत्याला जावे लागले. त्या विमानप्रवासात त्याच्याशी बरीच चर्चा करता आली व महत्त्वाची माहितीही घेता आली. पुढे ते विमान गुवाहाटी विमानतळावर उतरले. पुढील बदली विमान मिळण्यासाठी आम्हाला आठ तास अवकाश होता. या आठ तासांत तो नजरकैदी म्हणून त्याच्यावर मला बारकाईने लक्ष ठेवावे लागले होते. याच आठ तासांत त्याने आपल्या बऱ्याच आठवणी मला कथन केल्या. पाकिस्तान व भारतीय सैन्यात तसा काही बराचसा फरक नाही व त्या ब्रिगेडिअरचा मी आमच्या ब्रिगेडिअरसारखा सन्मान व आदर केला. त्याच्या मनात सर्व भारतीयांबद्दल खरेच प्रेम राहील असेच वागलो आणि त्याने तसे म्हणून दाखविले. अर्थात तो युद्धकैदी! आणि म्हणून त्याच्याशी केलेली चर्चा व त्याने माझ्याशी केलेली चर्चा हा प्रसंग तसा दुर्मिळच म्हणावा लागेल.

माझ्या मनावर कोरली गेलेली तिसरी घटना 1971 च्या युद्धाची. अर्थात माझ्या पुनर्जन्माचीच! परमेश्‍वराने मला त्या मृत्यूच्या भयानक तांडव नृत्यातून बाजूला खेचले होते. त्याचे असे झाले - ‘14 ग्रेनेडियर रेजिमेंट‘ येथील 6 अधिकारी युद्धात मारले गेले. फारच भयानक घटना घडली होती ती. माझी तातडीने ‘तुरा‘हून राजौरी येथे बदली करण्यात आली. मला हे एक आव्हानच होते. कारण, माझी नेमणूक सैनिकी मोर्चावर झाली होती. आम्ही जी शस्त्रे, अस्त्रे वापरत होतो, तशाच प्रकारचा शस्त्रांचा व अस्त्रांचा वापर शत्रू पक्षाकडून होत होता. आपल्यासारखाच उखळी तोफांचा वापर शत्रू पक्षाकडून सर्रास होत होता. रात्र वर चढत होती. सर्वत्र काळोख दाटला होता. रात्री अकराच्या सुमारास आमचा होरा चुकला व आम्ही शत्रूच्या उखळी तोफेचे लक्ष्य बनलो. शत्रूच्या उखळी तोफेतून सुटलेला एक गोळा अचानक माझ्यासमोर एक मीटर अंतरावर येऊन आदळला. मला काही समजायच्या आतच त्याचा महाभयंकर असा स्फोट झाला. त्याच्या ठिकऱ्या, त्याचे कण माझ्या शरीरात सर्वत्र घुसले. एक तुकडा छातीमध्ये. माझ्याबरोबर पाठीवर वायरलेस सेट घेतलेला साथीदार जवान फार मोठ्या प्रमाणावर जखमी झाला.

आम्ही जखमी होऊन बेशुद्धावस्थेत कोसळलो. शुद्धीवर होतो त्या क्षणापर्यंत मातृभूमीचे व परमेश्‍वराचे चिंतन मनामध्ये करीत होतो. पहाटे-पहाटेच आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेशुद्धावस्थेतच आम्हाला मेडिकल पॉइंटला हलविले. काही तासांच्या उपचारानंतर आम्ही शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शत्रूने वापरलेल्या बॉंबगोळ्यांची माहिती मला दिली. 81 मिलिमीटर मॉर्टर (उखळी तोफ) मधून सोडण्यात आलेला बॉंब इतका प्रभावी असतो, की त्याच्या स्फोट झालेल्या ठिकाणापासून 9 मीटर परिघातील अंतरावरील काहीही शिल्लक अथवा जिवंत राहत नाही; पण मी? मी वाचलो. माझा साथीदारही वाचला. कारण, त्याच्या पाठीवरील वायरलेस सेटने चिलखताची भूमिका बजावली होती; पण मी वाचलो केवळ परमेश्‍वराची कृपा व पुढे माझ्या हातून यापेक्षाही चांगली देशसेवा घडावी म्हणून असेच माझ्या मनाला वाटते.

मला माझ्या कामगिरीबद्दल ‘पर्पल हार्ट मेडल‘ मिळाले व महाराष्ट्र सरकारने या कारवाईबद्दल गौरव व मानधन देऊन सत्कार केला. सैन्यातील सेवा 10 वर्षांची होणे व युद्धातील पराक्रमाचा एक दिवस सममूल्याचा मानला जातो. म्हणून मला नेहमी शहीद भगतसिंगांच्या मातोश्रींचे उद्‌गार आठवतात, ‘देशासाठी एक वेळ मरणे म्हणजे शंभर वेळा जन्म घेण्यासारखे आहे.‘

- कर्नल सुरेश डी. पाटील

Thursday, 29 September 2016

Pakistan summons Indian envoy to protest over surgical strikes

Islamabad: Pakistan today summoned Indian High Commissioner Gautam Bambawale over "surgical strikes" by India in which two Pakistani soldiers were killed.

Indian High Commissioner to Pakistan, Gautam Bambawale

Indian High Commissioner to Pakistan, Gautam Bambawale

Foreign Secretary Aizaz Chaudhry "condemned the unprovoked firing by" Indian forces on the surgical strikes in which two Pakistani soldiers were killed, Pakistan Foreign Office said in a statement.

"These incidents are a continuation of a pattern of ceasefire violations committed by India. He (Chaudhry) conveyed that the Armed Forces of Pakistan will continue to give a befitting response to any act of aggression," the statement said.

Earlier, Pakistan rejected as "baseless" the Indian Army's claim that it had carried out "surgical strikes" inside the country.

India carried out surgical strikes on seven terror launch pads across the LoC with the Army inflicting "significant casualties" on terrorists preparing to infiltrate from PoK.

While summoning Bambawale at the Foreign Office, the Foreign Secretary claimed that India has "deliberately escalated tensions" at the LoC in order to "divert the attention of the international community from the grave situation" in Kashmir.

"The Foreign Secretary condemned India's baseless accusation against Pakistan for the Uri attack, within a few hours after the incident. He recalled that it has been a practice in India to blame Pakistan for every such incident but later investigations prove otherwise," the Foreign Office said.

Chaudhry claimed that Pakistan remains a "victim of interference" and "state sponsored terrorism".

In this regard, he referred to the "confession statement of serving Indian Naval Officer, Kulbushan Jadhav", whom Pakistan has accused of "carrying out terrorist and subversive activities, especially in Balochistan and Karachi".

The Foreign Secretary also expressed Pakistan's deep disappointment at India's decision not to participate in the SAARC Summit.

For its part, Pakistan is committed to the objective of regional cooperation, envisaged in the SAARC charter, he said.

Chaudhry also conveyed to Bambawale, Pakistan's deep concerns over "life threats to Pakistan's High Commissioner in New Delhi" and urged the Indian government to ensure his safety and security and that of other officials and their families, in accordance with the Vienna Convention.

Inputs with PTI

Jobs and Career

Indian Government Jobs - www.indgovtjobs.in

Link to Indian Government Jobs - Today Employment News


Fresher Jobs 2016 (75,000 Govt Vacancies Opening)

Posted: 29 Sep 2016 05:38 AM PDT

Fresher and Final Year Graduate / Diploma / ITI Students get latest Indian Government Jobs vacancy openings in this post. IndGovtJobs Blog everyday updating New Govt Jobs for Fresh Graduates, Fresh...

SPSC Sikkim Recruitment 2016 Fireman, SIA (15 Vacancies)

Posted: 29 Sep 2016 05:35 AM PDT

Sikkim Public Service Commission (SPSC) invites applications from the eligible local candidates for filling up of 10 Vacancy posts of Firemen on temporary regular basis under Fire and Emergency...

CGPSC Recruitment 2016-17 Apply Online (92 Vacancies Opening)

Posted: 29 Sep 2016 05:08 AM PDT

Chhattisgarh Public Service Commission (CGPSC) invites Online applications for recruitment of Industry Assistant Director / Manager for filling up 52 Vacancies. The Online registration start from 3rd...

NIEPMD Recruitment 2016 Faculty and Non-Teaching Posts (24 Vacancies)

Posted: 29 Sep 2016 04:30 AM PDT

National Institute for Empowerment of Persons with Multiple Disabilities (NIEPMD) invites applications from the Indian Nationals eligible for appointment to the following temporary posts to be filled...

SAS Bihar Recruitment 2016 Apply Online (District Resource Person - 62 Vacancies)

Posted: 29 Sep 2016 03:59 AM PDT

Social Audit Society (SAS), Rural Development Department, Patna (Bihar State) invites Online applications for the post of District Resource Person for filling up 62 Vacancies. The last date for...

Kurukshetra University Recruitment 2016 Assistant Professors (64 Vacancies)

Posted: 29 Sep 2016 03:46 AM PDT

Kurukshetra University Kurukshetra (Established by the State Legislature Act XII of 1956) Walk in Interview for faculty post of Assistant Professors on contract basis in different disciplines for the...

UPSC ESE 2017 Apply Online for Engineering Services (440 Vacancies)

Posted: 29 Sep 2016 02:28 AM PDT

Union Public Service Commission (UPSC) will hold a Engineering Services Examination, 2017 (ESE 2017) for recruitment to the Group A and B services of various engineering posts in Civil, Mechanical...

UPSC Recruitment 2016-17, UPSC Exam 2016 (572 Vacancies Opening)

Posted: 29 Sep 2016 02:25 AM PDT

The Union Public Service Commission (UPSC) latest recruitment notification and current examination details listed in the page. UPSC is India's central agency conducting recruitment to various...

Ludhiana District Court Recruitment 2016 Stenographer (10 Vacancies)

Posted: 29 Sep 2016 01:29 AM PDT

Office of the District and Sessions Judge, Ludhiana invites applications for the post of Stenographer Grade-III for filling 10 Vacancies on Adhoc Basis. The last date for submission of applications...

Railway Board Recruitment 2016 Directors (04 Vacancies)

Posted: 29 Sep 2016 01:23 AM PDT

Government of India, Ministry of Railways (Railway Board) invites applications from eligible persons for the post of Managing Director and Directors on Deputation / Absorption basis in National High...

Ministry of Corporate Affairs Recruitment 2016 Deputation Posts (08 Vacancies)

Posted: 28 Sep 2016 11:48 PM PDT

Government of India, Ministry of Corporate Affairs, Competition Appellate Tribunal, New Delhi invites applications for filling up following positions purely on deputation basis, initially for a...

Employment News Paper 24th to 30th September 2016 Job Highlights

Posted: 28 Sep 2016 11:34 PM PDT

Employment News (English) / Rozgar Samachar (Hindi & Urdu) Paper every week issue Job Highlights available in the post. IndGovtJobs Blog every week updating Employment News weekly Issue Job...

IBPS RRB Recruitment 2016, IBPS RRB V Exam 2016-17 Apply Online (16560 Vacancies)

Posted: 28 Sep 2016 11:30 PM PDT

Institute of Banking Personnel Selection (IBPS) has published Recruitment exam notification of next Common Recruitment Process for IBPS CWE RRBs V (RRB 5 2016).  The Online examination of IBPS...

IIM Kashipur Recruitment 2016 Accounts Officer, Accounts Clerk

Posted: 28 Sep 2016 11:21 PM PDT

Indian Institute of Management (IIM), Kashipur invites applications for recruitment of following Non-Teaching positions on Regular Basis. The last date for submission of online applications is 17th...

10th 12th Pass Govt Jobs 2016 (15770 Vacancies Opening)

Posted: 28 Sep 2016 11:12 PM PDT

Indian National candidates / Students, who have holding 10th and 12th Qualification get Government Jobs recent recruitment notification. 10th 12th Pass candidates called for various posts in Govt...

Faculty Jobs 2016 (306 Govt Vacancies Opening)

Posted: 28 Sep 2016 08:47 AM PDT

Fresh and Experienced Teaching Professionals to get Faculty Govt Jobs in Central / State Government Universities / Institutes on this post. IndGovtJobs.in Blog every week updating / listing recent...

Teacher Jobs 2016, Govt Teaching Jobs 2016-17 (10,000 Vacancies)

Posted: 28 Sep 2016 08:34 AM PDT

Teachers Jobs for Primary / Secondary / High Secondary Government Schools Recruitment Vacancies listed in this page. Most of the State Government Education Board conducting mandatory entrance...

UPPSC Recruitment 2016-17 Apply Online (361 Vacancies Opening)

Posted: 28 Sep 2016 08:31 AM PDT

Uttar Pradesh Public Service Commission (UPPSC), Allahabad issued recruitment advertisement of Review Officer / Assistant Review Officer etc. General Recruitment Examination-2016 and Review Officer /...

BHEL Recruitment 2016 Part Time Medical Officer

Posted: 28 Sep 2016 08:00 AM PDT

Bharat Heavy Electricals Limited (BHEL), Power Sector Western Region, Nagpur invites applications from Medical Professionals for engagement of Part Time Medical Officer (PTMO) to meet requirement of...

BHEL ET Recruitment through GATE 2017 Apply Online (50 Vacancies)

Posted: 28 Sep 2016 07:51 AM PDT

Bharat Heavy Electricals Limited (BHEL) (A Govt. of India Enterprise) offers a challenging and rewarding career to young and dynamic Graduates for recruitment  post of Engineer Trainees in the...

Railway Recruitment 2016, Railway Jobs 2016-17 (3625 Vacancies Opening)

Posted: 28 Sep 2016 07:40 AM PDT

Railway Recruitment Boards (RRBs) offers Railway Jobs 2016 List published in this page. RRBs calls eligible Indian Citizens through Employment News for recruitment of various Technical, Non-Technical...