Sunday 12 March 2023

पद्मश्री कर्मवीर दादा इदाते सन्मान सोहळा व जागतिक महिला दिनानिमित्त कर्मयोगिणी सन्मान सोहळा संपन्न

रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित नाशिक आयोजित  पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांचा सन्मान सोहळा  व जागतिक महिला दिनानिमित्त मंजुळा मंगल कार्यालय जेल रोड, नाशिक रोड, नाशिक  11/03/2023 रोजी दुपारी 1.30वा. संपन्न झाला.





पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांचा सन्मान सोहळा
            
   देशभरातील भटक्या-विमुक्त समाजाकरिता कार्य करीत असलेल्या विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद(अखिल भारतीय) नाशिक विभागाच्या वतिने अनिकेत,असहाय,ज्याला कुणी वाली आणि वाणी(आवाज) नाही असा वंचित भटका विमुक्त समाज आपल्या पायावर उभं करण्यासाठी त्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नंदादीप पेटवण्याचे आणि त्यांच्या सर्वांगीण उत्थानासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं व त्यांच्या उत्थानासाठी अविरत करित असलेल्या कार्यासाठी भारत सरकारने  कर्मवीर दादा इदाते यांचा  पद्मश्री पुरस्कार  देऊन  सत्कार करण्यात आला. 

पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांचा रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित नाशिक यांच्या तर्फे  मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मान सोहळा संपन्न झाला.


                 -: सत्कारमुर्ती :-

पद्मश्री कर्मवीर भिकू रामजी इदाते(दादा)
मा.अध्यक्ष,विमुक्त भटके व अर्धभटक्या जमाती विकास व कल्याण बोर्ड,भारत सरकार
मा.अध्यक्ष,राष्ट्रीय विमुक्त भटके व अर्धभटक्या जमाती आयोग,भारत सरकार यांचा सत्कार करण्यात आला. 

तसेच जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील विविध स्तरांवरील सामाजिक कार्यात व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या  महिलांना कर्मयोगिणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले


                 महिला पुरस्कार्थी         

1) डॉ शाहिस्ता इनामदार, प्राचार्या, नवजीवन विधी महाविद्यालय,नाशिक              
2) सौ माया संग्राम परदेशी, महिला उद्योजिका, येवला        
3) सौ योगिता बच्छाव, उपक्रमशील शिक्षिका, महानगर पालिका शिक्षण मंडळ.                  


                यावेळी  उपस्थित पाहुणे

कार्यक्रमाचे अध्यक्ष    दिनकर अण्णा पाटील
                  
                प्रमुख उपस्थिती 

मा खासदार अमर भाऊ साबळे (पुणे शहर) , 

डॉ. गुटट्टे महाराज (प्रसिद्ध कथाकार व किर्तनकार)    

मा.आमदार बाळासाहेब सानप (पूर्व विधानसभा मतदार संघ), 

मा.देविदास राठोड-अध्यक्ष वसंतराव नाईक भटके आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष, 
अनिल फड राष्ट्रीय कार्यवाह विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद, 

संपदाताई पारकर राष्ट्रीय उपाध्यक्ष, 

मा. विजयजी साने प्रदेश उपाध्यक्ष, 

रावसाहेब घुगे, द बाप कंपनी, 

भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, 

मा. नगरसेवक विशाल संगमनेरे, 

मा. नगरसेवक शरद मोरे, 

मा. नगरसेवक दिनकर आढाव ,

जेष्ठ वामन काका बोराडे, 

भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते सुनील आडके, 

सचिन हांडगे  

हे मान्यवर उपस्थित होते.  तसेच सगळ्या समाजाच्या संस्थाही उपस्थित होत्या. 
 
माणिकराव देशमुख आध्यात्मिक आघाडी नाशिक,

नवनाथ पंथी सामाजिक बहुउद्देशीय संस्था पंचवटी ,

कुणाल अनिल गोसावी (सचिव) विश्वगुरू शंकराचार्य 

श्री दशमान गोसावी समाज,

हेमंत शिंदे महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ, 

नवनाथ ढगे धनगर समाज सेवा संस्था नाशिक,

योगेश बर्वे सचिव अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ महाराष्ट्र, 

माणिकराव देशमुख आध्यात्मिक आघाडी नाशिक, 

कडकलक्ष्मी भाऊसाहेब, 

यांच्यासहित विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. 

    
    या कार्यक्रमासाठी मुंबई,ठाणे, कल्याण, सिन्नर, नागपूर आणि नाशिक परिसरातील सर्व सक्रिय सामाजिक कार्यकर्ते व संघटनेचे पदाधिकारी या सन्मान सोहळ्यास उपस्थित राहिले. 

        तसेच विशेष करून नाशिक व ठाणे जिल्ह्यातील माजी सैनिकांनी पद्मश्री दादा यांना सॅल्यूट देऊन मानवंदना दिली व सगळ्यांनी पद्मश्री दादांचा सत्कार केला. त्यात माजी सैनिक सुनिल पवार, अजित न्यायनिर्गुणे, निलेश कांबळे, गणेश जाधव, आनंद गायकवाड, ज्ञानेश्वर पगार,  संजय बोरसे, विशाल सोनवणे, नंदकुमार मोरे, लक्ष्मण गुजर, विजय देठे, राहुल कडलग यांचा समावेश होता. 




    यावेळी परिसरातील महिला पदाधिकारी, सर्व संस्था व इतर मान्यवर यांची असंख्य संख्येने उपस्थिती लाभली.
    


    कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदाताई फड यांनी केले यांनी संस्थेची माहिती व कामकाज सांगितले. महिलांना जास्तीत जास्त न्याय देता येईल यावर बोलले. नामदार साबळे साहेब पद्मश्री दादा व जागतिक महिला दिन यावर मनोगत व्यक्त केलं.



    दिनकर अण्णा पाटील यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना केंद्र सरकारच्या चांगल्या योजना देता येईल असं बोलले. पद्मश्री कर्मवीर विकू दादा इदाते (दादा )यांनी पद्मश्री मिळाल्याचा सर्व प्रवास  प्रेक्षकांसमोर सादर केला. 



    डॉ शाहिस्ता इनामदार यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सत्काराला उत्तर देताना त्यांनी महिला सबलीकरणाबाबत आपले विचार मांडले. 



तसेच यावेळी त्यांनी स्वत: लिहिलेली कविता देखील म्हटली. 



यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त युनायटेड नेशनने डिजिटल ही थिम ठेवलेली होती त्या अनुषंगाने महिलांच्या अधिकारा बाबतचे पुस्तक कोड स्कॅन करून मोबाईल वर एका क्लिकवर उपलब्ध आहे हे त्यांनी सांगितले.





    यानंतर ट्रेनिंग झालेल्या महिलांना सर्टिफिकेट देण्यात आले. यावेळी गंगा ग्रुप, कावेरी महिला ग्रुप ,गोदावरी महिला ग्रुप ,नर्मदा महिला ग्रुप, असंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खुडे सर व मोहन माळी सर यांनी केले.

    
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील पवार ,स्नेहा पवार, राजेश आंधळे, अशोक गवळी, ऋषिकेश फड, प्रकाश फड , संध्या केदारे, चैताली सानप, शंकर सानप, गणपत घुगे , शिंदू घुगे यांनी मेहनत घेतली.

कार्यक्रमाचे आयोजन रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित नाशिक , एन. एस. के. सॉफ्ट टॉईज अँड गारमेंट क्लस्टर  यांनी केले होते. 




No comments:

Post a Comment