Thursday, 23 February 2023

मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

 मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री  डॉ. तात्याराव लहाने,

जगविख्यात ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ पी एस रामाणी

यांच्या हस्ते राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पुरस्कार वितरण

 

मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईदादर सार्वजनिक वाचनालय आणि धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन

दि २६ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी ५.३० वाजता दासावाधुरू हॉलपहिला मजलाछबिलदास लेनदादर-पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री  डॉ. तात्याराव लहानेजगविख्यात ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ पी एस रामाणीमनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळाचे प्रमुख विश्वस्त श्री प्रमोदभाई शिंदेमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख मा श्री मंगेश चिवटेउद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते  किशोर जाधव हे उपस्थित राहाणार आहेत असे संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी सांगितले आहे.

यावेळी संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या ४८ व्या राजस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा  पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. त्याचबरोब वाचन चळवळीतील योगदानाबद्दल प्रदीप कर्णिक यांना दत्ता कामथे स्मृती पुरस्कारमराठी भाषेत शिवकालीन इतिहासाचा आयुष्यभर धांडोळा घेत इतिहास प्रेमींचे ग्रंथदालन समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ इतिहास संशोधक अभ्यासक आप्पा परब यांना सेवाव्रती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत कामगार नेते वसंतराव होशिंग स्मृती 'मराठी कॅलिग्राफी शब्द स्पर्धाशाखाप्रमुख संजय भगत (प्रभादेवी) पुरस्कृत (१) मराठी भाषेचे भविष्य आज आणि उद्या (२) जागतिकीकरण आणि मराठी भाषा या विषयावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती खुली लेख स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी भाषेचे अभ्यासक सुरेश परांजपे मराठी रंगभूमीवर गाजलेल्या व्यक्तींची मिमिक्री तर कवयत्री अनघा तांबोळी यांचा तरल काव्यानुभव 'केवल प्रयोगीचे सादरीकरण सादर करणार आहेत. या कार्यक्रमास स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांनीमराठी भाषाप्रेमीअभ्यासकवाचक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे.

 


Monday, 20 February 2023

EPFO subscribers can opt for higher pension now; can ask for 8.33% deduction from total PF contribution

    Giving a chance to employees to opt for a higher pension just a fortnight before the end of the 4-month deadline by the Supreme Court, the Employees’ Provident Fund Organisation (EPFO) has issued a fresh set of instructions for employees who had not opted for pension contributions at a higher wage than wage ceiling and continued to be in service on or after September 1, 2014.

    In a circular dated February 20, the EPFO in a set of instructions to its field officers said joint option (by employees and employers) for higher pension contribution can be exercised by: one, the employees and employers who had contributed on salary exceeding the prevalent wage ceiling of Rs 5,000 or 6,500; two, did not exercise joint option under the proviso to Para 11(3) of the pre-amendment scheme (since deleted) while being members of EPS 95; and three, were members prior to 01.09.2014 and continued to be a member on or after 01.09.2014.

    EPF instructions for serving employees

    The instructions issued Monday stated that in compliance with the Supreme Court judgment, employees with their employers can exercise a joint option for higher pension contributions. An online facility will be provided for employees who continued to be a subscriber of EPS on or before 01.09.2014, details of which will be informed shortly. “Once received, the Regional PF Commissioner shall put up adequate notice on the notice board and banners for wider public information,” the circular said.

    In case of transfer of funds from exempted provident fund trust to the pension fund of EPFO, an undertaking of the trustee shall be submitted. “In case of employees of unexempted establishments, refund of requisite employer’s share of contribution, the same shall be deposited with interest at the rate declared under Para 60 of EPF Scheme. 1952, till the date of actual refund,” it said, adding that the method of deposit and that of computation of pension will follow through a subsequent circular.

    Earlier circulars issued by EPFO

    Last month, EPFO issued instructions for re-examination of cases of employees who drew higher pension based on actual wage and retired prior to September 2014 but had not opted for pension linked to higher wage with the retirement fund body.

    That circular had specified that “in order to stop over payment, if any, in respect of employees who had retired prior to 1st September 2014 without exercising any option under Para 11(3) or the pre-amended scheme, and have been granted pension on higher wages, their cases need to be re-examined to ensure that they are not given higher pension from the month of January 2023 onwards”. “Pension in such cases may be immediately restored to pension on wages up to the ceiling of Rs. 5000 or Rs 6500,” it said.

    November judgement on EPF pension by Supreme Court

    On November 4, the SC upheld the Employees’ Pension (Amendment) Scheme, 2014, allowing another opportunity to EPF members who have availed of the EPS, to opt for higher annuity over the next four months. Employees who were existing EPS members as on September 1, 2014 were given another chance to contribute up to 8.33 per cent of their ‘actual’ salaries — as against 8.33 per cent of the pensionable salary capped at Rs 15,000 every month — towards pension.

    The court agreed with the changes. It said, “We do not find any flaw in altering the basis of computation of pensionable salary.”

    The Employees’ Provident Funds and Miscellaneous Provisions Act, 1952 originally did not provide for any pension scheme. In 1995, through an amendment, a scheme was formulated for employees’ pension, wherein the pension fund was to comprise a deposit of 8.33 per cent of the employers’ contribution to be made towards the provident fund corpus. At that time, the maximum pensionable salary was Rs 5,000 per month, which was later raised to Rs 6,500.

    The EPS, which is administered by the EPFO, aims to provide employees with pension after the age of 58. Both the employee and the employer contribute 12 per cent of the employee’s basic salary and dearness allowance to the EPF. The employee’s entire part goes to EPF, while the 12 per cent contribution made by the employer is split as 3.67 per cent contribution to EPF and 8.33 per cent contribution to EPS. Apart from this, the Government of India contributes 1.16 per cent as well for an employee’s pension. Employees do not contribute to the pension scheme.

 

Indian Express : 20 Feb 2022

Saturday, 11 February 2023

४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक २०२२ स्पर्धेचा निकाल घोषित - मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

 मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक २०२२ स्पर्धेचा निकाल घोषित
मनोरंजनकारकार मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक - महाराष्ट्र टाइम्समुंबई

 

मुंबई : १९४९ पासून अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असलेल्या आणि वृत्तपत्र लेखक चळवळीचे अमृतमहोत्सव वर्ष साजरे करणाऱ्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक २०२२ स्पर्धेचा निकाल संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी घोषित केला आहे.

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईदादर सार्वजनिक वाचनालय -  धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान - गोरेगाव मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या  कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा गौरव या कार्यक्रमात रविवारदिनांक २६ फेब्रुवारी २०२३  रोजी संध्याकाळी ६.०० वाजता  धुरू सभागृहदादर सार्वजनिक वाचनालय येथे पारितोषिक वितरण होणार आहे.  ग्रंथालय चळवळीतील दिवंगत जेष्ठ कार्यकर्ते आणि दादर सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह दत्ता कामथे यांच्या स्मरणार्थ 'वाचन चळवळीतील सेवाभावी कार्यकर्ता पुरस्कारश्री प्रदीप कर्णिक यांना प्रदान करण्यात येणार आहे. जगविख्यात ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ सी रामाणीसुप्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहानेज्येष्ठ चित्रपट-नाट्य अभिनेत्री चिन्मयी सुमितउद्योजक शंकरशेठ माटे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत.

दिवाळी अंकाबरोबरच शाखाप्रमुख संजय भगत पुरस्कृत (१) मराठी भाषेचे भविष्य आज आणि उद्या (२) जागतिकीकरण आणि मराठी भाषाया विषयावरील राज्यस्तरीय लेख स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम यावेळी होणार आहे. असे प्रमुख कार्यवाह प्रशांत  घाडीगावकर आणि ऍड देवदत्त लाड यांनी सांगितले आहे.

दिवाळी अंक स्पर्धेचा संपूर्ण निकाल पुढीलप्रमाणे आहे -

मनोरंजनकारका र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक - महाराष्ट्र टाइम्समुंबई (संपादक - पराग करंदीकर )

चंद्रकांत पाटणकर पुरस्कृत जगन्नाथ शंकरशेठ स्मृती उत्कृष्ट अंक - सकाळ अवतरणमुंबई (संपादक -  राहुल गडपाले)पांडुरंग रा भाटकर स्मृती सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक - मुक्त आनंदघनमुंबई (संपादक डॉ देविदास पोटे )पास्कोल लोबो पुरस्कृत गणेश केळकर स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक अंक - गोवन वार्तागोवा (संपादक - पांडुरंग गावकर )पु ल देशपांडे स्मृती सर्वोत्कृष्ट अंक - कालनिर्णयमुंबई ( संपादक - जयराज साळगावकर),साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक - अधोरेखितपालघर (संपादक - डॉ पल्लवी परुळेकर बनसोडे )मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित उत्कृष्ट अंक - मनशक्तीलोणावळा  (संपादक - डॉ वर्षा तोडमल )कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट अंक - श्रमकल्याण युगमुंबई (संपादक - रविराज इळवे )

याशिवाय उत्कृष्ट अंक म्हणून शब्दमल्हार - नाशिक (स्वानंद बेदरकर)नवरंग रुपेरी - औरंगाबाद (अशोक उजंळबकर )कनक रंगवाचा - सिंधुदुर्ग ( वामन पंडित )पुरुष स्पंदनं - मुंबई ( हरीश सदानी )शब्दगांधार - पुणे ( डॉ अरविंद नेरकर )समदा - पुणे (मनस्विनी प्रभुणे नायक)सह्याचल - परभणी (अनघा काटकर)ठाणे नागरिक - ठाणे (सतिषकुमार भावे)

त्याचप्रमाणे  उल्लेखनीय अंक म्हणून - संस्कार भक्तिधारा - पुणे ( कांचन सातपुते )क्रीककथा - पुणे ( कौस्तुभ चाटे )कालतरंग - पालघर ( संदीप मुकणे )शैव प्रबोधन - मुंबई ( सौ संपदा गुरव )धगधगती मुंबई - मुंबई ( भिमराव धुळप )निशांत - अहमदनगर ( निशांत दातीर )सत्यवेध - सांगली ( राहुल कुलकर्णी )गावगाथा - सोलापूर ( धोंडप्पा नंदे )नवरंग रुपेरी (औरंगाबाद)

परीक्षक म्हणून  सुनील सुर्वे (ग्रंथालय प्रमुख - केळकर कॉलेज),  दत्ता मालप (प्रत्युष जाहिरात कंपनीचे प्रमुख) यांनी काम पाहिले.

`द मास्ट्री ऑफ हिंदुस्थान-ट्रम्पस अँन्ड ट्रॅव्हल ऑफ माधवराव पेशवा` चे प्रकाशन - लेखक उदय कुलकर्णी

 




फोटो ओळ- लेखक उदय कुलकर्णी यांच्या द मास्ट्री ऑफ हिंदुस्थान-ट्रम्पस अँन्ड ट्रॅव्हल ऑफ माधवराव पेशवा या पुस्तकाचे प्रकाशन करतांना व्हाईस अँडमिरल(निवृत्त) सोनिल भोकरे शेजारी संस्थेच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरवणे,खजिनदार शितल देशपांडे, डॉ. तेजस् गर्गे,अमित पेठे

---------------------------------

कसदार लेखनाबरोबरच दाखले,संदर्भ हिच ऐतिहासिक पुस्तकांची श्रीमंती

भोकरेः उदय कुलकर्णी यांच्या `द मास्ट्री ऑफ हिंदुस्थान-ट्रम्पस अँन्ड ट्रॅव्हल ऑफ माधवराव पेशवा` चे प्रकाशन

नाशिकः ऐतिहासिक लिखान हे एक आव्हान असते, लेखन करतांना लेखक आपल्या लेखनात किती संदर्भ,दाखले आणि पुरावे देतो यावर त्या इतिहासाची सत्यतता अवलंबून ठरते, अशापध्दतीचे कसदार उच्चतम लेखन हिच त्या पुस्तकांची खरी श्रीमंती असते, असे प्रतिपादन व्हाईस अँडमिरल(एव्हीएसएम,व्हीएसएम,एनएम(निवृत्त) सोनिल भोकरे यांनी केले. लेखक उदय कुलकर्णी यांच्या `द मिस्ट्री ऑफ हिंदुस्थान-ट्रम्पस अँन्ड ट्रॅव्हल ऑफ माधवराव पेशवा` हे ऐतिहासिक पुस्तकही असेच वेगळे आहे, ते वाचकांना नक्कीच भावेल असा विश्वास श्री.भोकरे यांनी व्यक्त केला.

     सेंट्रल हिंदु मिलीटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे आज डॉ.मुंजे इन्स्टीट्युटच्या सभागृहात उदय कुलकर्णी यांच्या `द मास्ट्री ऑफ हिंदुस्थान-ट्रम्पस अँन्ड ट्रॅव्हल ऑफ माधवराव पेशवा` या पुस्तकाचे प्रकाशन श्री.भोकरे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अर्कालॉजिकल अँन्ड म्युझियमचे संचालक डॉ.तेजस् गर्गे,संस्थेच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरवणे,कार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे, खजिनदार शितल देशपांडे,सहकार्यवाह नितीन गर्गे आदी उपस्थित होते. श्री.भोकरे यांनी कुलकर्णी यांच्या लेखनाचे कौतुक केले. ते म्हणाले, आजच्या डिजटलायजेशन आणि धावपळीच्या युगात वाचन कमी झाले. स्वयंअध्ययनासाठी कुणालाही वेळ नाही. काय आणि कसे वाचवे हे अनेकांना समजतच नाही. अशा काळात या इतिहासकालीन पुस्तकांची निर्मिती झाली आहे. वेगवेगळ्याप्रकारच्या इतिहासातील घटना,कार्यपध्दती दर्शवतांना श्री.कुलकर्णी यांनी भरपूर,संदर्भ,छायाचित्रे,पुरावे दिले आहे, त्यामुळे मराठ्याचा हा इतिहास समजून घेतांना निश्चीतच मदत होईल, लेखन,संपादन,वितरण अशा सर्व बाजूंनी हे उच्चतम दर्जाचे पुस्तक झाले असून विद्यार्थी,अभ्यासक,संशोधक,शिक्षक अशा सर्वांनाच त्याचा उपयोग होणार आहे. यावेळी त्यांनी बाजीराव मस्तांनी चित्रपटातील काही प्रसंग सांगितले.

    डॉ.गर्गे म्हणाले, या पुस्तकाची निर्मिती करतांना विविध सुक्ष्मबाबींच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. यातील घटनांबाबत डावे-उजवे न करता सत्यपरिस्थिती लेखकांनी मांडली आहे. वेगवेगळ्या काळातील व्यक्तीमत्वाचा वेध घेण्यात आल्याने पुस्तक निश्चित सर्वांसाठी मदतनीस ठरेल यात शंका नाही. लेखक कुलकर्णी यांनी प्रेझेन्टेशनद्वारे मराठा साम्राज्य,मुघल राजवट व पानिपतसह इतर युध्दजन्य परिस्थितीचे वर्णन ऐकवले. श्री.देशपांडे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. अमित पेठे यांनी सुत्रसंचालन केले.वंदेमातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.


Wednesday, 1 February 2023

कश्मीर खोऱ्यामध्ये मध्ये काहीतरी अद्भुत घडते आहे - शेफाली वैद्य

 कश्मीर खोऱ्यामध्ये मध्ये काहीतरी अद्भुत घडते आहे 

वाग्देवीचे सोनपाऊल परत आपल्या मूलस्थानी पडते आहे... 


आज पुण्यातल्या धानोरी येथील काश्मीर भवनमध्ये माँ शारदेच्या सुंदर मूर्तीच्या दर्शनाचा योग जुळून आला. बरोबर  लेखिका श्वेता काजळे आणि लेखक अभिजीत जोग होते.  ही मूर्ती कर्नाटकमधल्या आदी शंकराचार्यांनी स्थापित केलेल्या शृंगेरीच्या शारदा पीठातून काश्मीर खोऱ्यातील टिटवाल ह्या गावी बांधण्यात आलेल्या नवीन मंदिरात आसनस्थ होण्यासाठी समारंभपूर्वक नेली जात आहे. 


टिटवाल हे गांव आहे काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात. ज्यांना काश्मीरचा रक्तरंजित इतिहास माहिती आहे त्यांना ठाऊकच असेल की कुपवाडा हा जिल्हा एकेकाळी इस्लामी दहशतवाद्यांच्या हल्ल्यांसाठी कुप्रसिद्ध होता. त्याच गावात आता एक नवीन हिंदू मंदिर बांधले गेले आहे. कित्येक शतकांच्या प्रतिक्षेनंतर काश्मीर खोऱ्यात एक नवीन हिंदू मंदिर बांधले गेलेय आणि हे शक्य झालेय केवळ आर्टिकल ३७० हटवल्यामुळे! 


टिटवाल हे गांव पाकव्याप्त काश्मीरमधल्या मूळ शारदा पीठ मंदिरापासून फक्त ४० किलोमीटर दूर आहे. नीलम, मधुमती आणि सरगुन हया तीन नद्यांच्या प्रवाहांच्या संगमाजवळ बांधलेले हे मंदिर आज भग्नावस्थेत आहे, पण एकेकाळी श्री शारदा पीठ, मार्तंड सूर्य मंदिर आणि अमरनाथ गुहा ही जम्मू आणि काश्मीरमधली तीन प्रमुख हिंदू तीर्थक्षेत्रे होती. 


काश्मिरी हिंदू दरवर्षी भाद्रपद महिन्यात श्री शारदा पीठाची पायी यात्रा करायचे आणि ती यात्रा टिटवालच्या मंदिरापासून निघायची. ही प्रथा फाळणीपर्यंत सुरु होती. पण फाळणीनंतर ह्या भागात मुसलमान टोळ्यांचे आक्रमण झाले आणि इथले मंदिर आणि गुरुद्वारा हे दोन्ही पाडले गेले आणि मूळ शारदा पीठ स्थान पाकव्याप्त काश्मीर मध्ये गेले. आज इतक्या वर्षांनंतर काश्मीरपूरवासिनी शारदा परत स्वगृही निघालीय. मूळ पीठ जरी आज भारतात नसले तरी तेही लवकरच भारतात परत येईल अशी आशा जागवणारी ही यात्रा आहे. 


शारदा पीठाचा इतिहास फार प्राचीन आहे. ह्याचे उल्लेख आपल्याला हजारो वर्षांपासून मिळतात. काही इतिहासकारांच्या मते शारदा पीठ सम्राट अशोकाच्या काळातही अस्तित्वात होते. सध्या आपल्याला ज्या भव्य मंदिराचे अवशेष दिसतात ते मंदिर काश्मीरवर राज्य करणाऱ्या कर्कोटा राजघराण्यातील एक शक्तिशाली हिंदू सम्राट ललितादित्य मुक्तपीड याने बांधले होते अशी मान्यता आहे. शारदा पीठ मंदिर आणि अनंतनागमधील मार्तंड सूर्य मंदिराच्या रचना आणि बांधकाम शैलीमध्ये बरेच साम्य आहे. ललितादित्य मुक्तपीड यानेच मार्तंड सूर्य मंदिरही बांधले होते. खास काश्मिरी शैलीत सर्वतोभद्र पद्धतीने बांधलेल्या ह्या भव्य मंदिराला चार दिशांना उघडणारे चार दरवाजे होते. 


एकेकाळी शारदा पीठ हे केवळ मंदिरच नव्हते तर ते उच्च शिक्षणाचे एक प्रमुख केंद्रही होते. शारदा पीठ मंदिर परिसरात असलेल्या शारदा विद्यापीठात देश-विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत. एकेकाळी येथे जगातील सर्वात मोठे ग्रंथालय होते असे म्हणतात. शारदा  विद्यापीठाची गणना नालंदा, तक्षशिला, वल्लभी, विक्रमशीला यासारख्या प्रसिद्ध भारतीय विद्यापीठांमध्ये  होत असे.


असे मानले जाते की या विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी द्वारपंडितांकडून प्रवेश परीक्षा घेतली जात असे. प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तरावर विद्यार्थी एक एक पायरी चढून वर जात असे. या विद्यापीठाचा दक्षिण दरवाजा मात्र कित्येक शतके बंद होता कारण दक्षिण भारतातील कोणीही श्रेष्ठ विद्वान तेथे गेला नव्हता. श्री आदी शंकराचार्यांनी काश्मीर पर्यंत पदयात्रा करून तेथील पंडितांचा वादविवादात पराभव केला. त्यानंतर आचार्य दक्षिण दरवाजाने मंदिरात प्रवेश करून शारदा पीठावर मुख्य पीठाधीपती म्हणून आरूढ झाले. 


शारदा पीठाचा उल्लेख सहाव्या ते आठव्या शतकात लिहिल्या गेलेल्या निलमत पुराणात आढळतो. नीलमत पुराण हे काश्मीरच्या इतिहासाचे सर्वात जुने पुस्तक मानले जाते. पुढे अकराव्या शतकात काश्मिरी कवी बिल्हण यांनी शारदा पीठाचे महत्त्व वर्णिले आहे. त्याच सुमारास भारतात आलेल्या अल-बेरूनी ह्या परदेशी प्रवाशाने आपल्या लेखनात मुलतान येथील सूर्य मंदिर, स्थानेश्वर महादेव मंदिर, सोमनाथ मंदिर तसेच शारदा पीठ यांचा भारतीय उपखंडातील सर्वात प्रसिद्ध मंदिरे म्हणून उल्लेख केला आहे. प्रसिद्ध काश्मिरी कवी कल्हण यांच्या राजतरंगिणी या पुस्तकातही शारदा पीठाचा उल्लेख आहे. 


अगदी अकबराच्या दरबारातील विद्वान अबुल फझलने देखील शारदा पीठाचा उल्लेख हिंदूंचे एक महान पूजास्थळ  म्हणून केला आहे. अगदी आजही काश्मिरी हिंदू शारदेची उपासना 


‘नमस्ते शारदे देवी काश्मीरापुरवासिनि

त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ॥’ 


ह्याच श्लोकाने करतात. दुर्दैवाने भारतावरच्या इस्लामी आक्रमणानंतर इतर हजारो हिंदू मंदिरांप्रमाणेच ह्याही मंदिराचा विध्वंस केला गेला. सध्या हे मंदिर भग्नावस्थेत असून आत कोणतीही मूर्ती नाही. केवळ दगडी भिंतींचे  अवशेष उरले आहेत. पाकव्याप्त काश्मिरात गेल्यापासून तर मंदिराची अजूनच दुर्दशा झालेली आहे. 


असे म्हणतात की भगवत्पाद श्री आदी शंकराचार्यांना त्यांच्या द्रष्टेपणामुळे ह्या मंदिराचा होऊ घातलेला विध्वंस कळला होता म्हणूनच त्यांनी इथलीच चंदन काष्ठातली श्री शारदेची मूर्ती तुंगभद्रेकाठी शृंगेरीला नेली आणि तिथे श्री शृंगेरी शारदा पीठाची स्थापना केली व वादविवादात ज्यांचा पराभव केला होता त्या पंडित मंडनमिश्र ह्यांना संन्यास देऊन सुरेशचार्य हे नाव देऊन त्यांचे शृंगेरीचे प्रथम पीठाधीश म्हणून आरोहण केले. तिथपासून शृंगेरीची गुरु परंपरा अखंडित आहे. 


म्हणूनच शृंगेरीहून तिथल्या सध्याच्या शंकराचार्यांनी विधिवत पूजन केलेली ही श्री शारदेची मूर्ती परत काश्मिरपूरवासिनी होणं ह्या घटनेला सर्व हिंदू समाजासाठी विशेष महत्व आहे. मूर्ती उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत पुण्यात असेल तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी मुद्दाम जाऊन दर्शन घ्यावे. 


शेफाली वैद्य


POLICY ON SPECIAL ID CARD FOR PRESIDENT’S GALLANTRY AWARD WINNERS

 

POLICY ON SPECIAL ID CARD FOR PRESIDENT’S GALLANTRY AWARD WINNERS

A Special Identity Card is issued by Air HQ (Air Cmde PP) to President’s gallantry award winners. Holders of the special identity card are entitled the benefits/ facilities as admissible by GoI/ State Govts. This card is not transferable. On defacement, Special Identity Card can be reissued on submission of defaced Special Identity Card. In case of a loss, the Special Identity Card can be re-issued on submission of a copy of FIR. The following documents need to be submitted by the Veterans for issue of Gallantry Award Special Identity Card:-

(a) Personal application mentioning date of birth, name and date of award along with Gazette number.

(b) 02 Stamp size photographs in civil dress.

Further, the personal application is required to be forwarded to following address for verification of photograph and uniformity and onward submission to Air HQ (VB) for necessary issuance.

Dte of Air Veteran

1st Floor, SMC Building

Subroto Park

New Delhi-110010


https://iafpensioners.gov.in/ords/dav_portal/r/dte_av/home