Friday 4 September 2015

"लढा आणखी तीव्र करू'

नवी दिल्ली - पुढील आठवड्यात केंद्र सरकार "वन रॅंक वन पेन्शन‘ (ओआरओपी) लागू करण्यासंबंधीचा निर्णय सरकार जाहीर करण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत बोलताना माजी सैनिकांनी या निर्णयात आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. 
 
"ओआरओपी‘चा लाभ 1 जुलै 2014 पासून देण्याची सरकारची योजना आहे. म्हणजेच 1 जुलै 2014 पासून ओआरओपीचे सर्व लाभ मिळतील. पंतप्रधानांनी ओआरओपीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. परंतु आमच्या नियम व अटींनुसार हे विधेयक आल्यास त्याचे स्वागत केले जाईल; अन्यथा आम्ही आमचा लढा आणखी तीव्र करू, असे मत माजी मेजर जनरल सतबीर सिंह यांनी व्यक्त केले आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी एप्रिल 2014 पासून करावी, अशी मागणी ही करण्यात आली आहे.
 
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 - 03:09 PM IST

No comments:

Post a Comment