मोदींच्या खुलाश्याने माजी सैनिकांचे उपोषण मागे
नवी दिल्ली - "समान हुद्दा, समान निवृत्तिवेतन" (वन रॅंक, वन पेन्शन-ओआरओपी) योजनेतील स्वेच्छानिवृत्तीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा केला असून त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे माजी सैनिकांचे सुरु असलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे.
माजी सैनिकांचे नेतृत्व करणारे निवृत्त मेजर जनरल सतबीर सिंह यांनी याबाबत सांगितले की, "स्वेच्छानिवृत्तीबाबतच्या खुलाश्यानंतर आम्ही आमच्या लोकांना उपोषण मागे घेण्यास सांगत आहोत‘ मात्र मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे म्हटले आहे. "ओआरओपी‘बाबत भ्रम पसरविले जात असून पंधरा वर्षे सेवा करणाऱ्या प्रत्येक जवानाला तसेच स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या जवानालाही या योजनेचा लाभ होणार आहे‘ असा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) फरीदाबाद येथे केला आहे. मोदींच्या खुलाश्यानंतर उपोषण करत असलेल्या माजी सैनिकांमध्ये आनंद पसरला आणि त्यांनी पेढे वाटले.
वृत्तसंस्था
रविवार, 6 सप्टेंबर 2015 - 04:12 PM IST
No comments:
Post a Comment