प्रेरणादायी वीरगाथा : लान्स नाईक गोस्वामी यांचा देशासाठी पराक्रम :श्रीनगर : 'जिंकू किंवा मरू' या दृढनिश्चयासह देशाच्या शत्रूवर तुटून पडणार्या आणि प्रसंगी प्राणांची आहुती देणार्या शूरवीरांच्या परंपरेत भारतीय लष्कराच्या विशेष कमांडो पथकाचे लान्स नाईक मोहननाथ गोस्वामी यांनी मानाचे स्थान पटकाविले आहे. भावी पिढय़ांसाठी शौर्य आणि पराक्रमाची प्रेरणादायी वीरगाथा मागे सोडून हौतात्म्य पत्करण्यापूर्वी लान्स नाईक गोस्वामी यांनी तब्बल १0 दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि एकाला जिवंत पकडले. | ||
वयाची जेमतेम तिशी उलटलेल्या या शूरवीराला काश्मीरच्या हंदवारामध्ये गुरुवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या तुंबळ चकमकीत वीरमरण आले. गेल्या ११ दिवसांच्या अत्यंत कमी कालावधीत दहशतवादाविरुद्ध लढय़ात त्यांनी १0 दहशतवाद्यांचा खात्मा करून अत्युच्च शौर्याची प्रचिती दिली आणि मातृभूमीच्या रक्षणार्थ प्राणांची आहुती दिली.
उधमपूरमधील संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल एस.डी. गोस्वामी यांनी सांगितले की, लान्स नायक मोहननाथ गोस्वामी यांनी मागील ११ दिवसांत काश्मीर खोर्यात तीन दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये सक्रिय सहभागी होत १0 दहशतवाद्यांना यमसदनी धाडले तर एकाला जिवंत पकडले होते. ते इ.स. २00२ पासून लष्कराच्या पॅराकमांडों दलात सहभागी होते. तेव्हापासूनच त्यांनी आपल्या तुकडीच्या सर्व मोहिमांमध्ये हिरीरीने भाग घेतला होता आणि त्यापैकी अनेक मोहिमा यशस्वीही ठरल्या.
लान्स नाईक गोस्वामी लष्कराच्या दहशतवादी विरोधी कमांडो दलात स्वत:हून दाखल झाले. जगातील सवरेत्तम अशी ख्याती असलेल्या या दलातही गोस्वामी यांनी असीम निडरपणा आणि पराकोटीच्या कर्तव्यदक्षतेने स्वत:चे नाव कमावले. त्यांच्या तुकडीस कोणत्याही कामगिरीचा हुकूम झाला की त्यात सहभागी होण्यासाठी गोस्वामी नेहमी अतूर असायचे. लान्स नायक गोस्वामी हे नैनीतालच्या हल्दवानी तालुक्यातील इंदिरानगरचे रहिवासी होते. त्यांच्यापश्चात पत्नी आणि सात वर्षांची चिमुकली आहे. त्यांचे पार्थिव हवाई दलाच्या विमानाने बरेलीस धाडण्यात आले. तेथून ते पुढे हेलिकॉप्टरने त्यांच्या गावी नेले जाईल व तेथेच संपूर्ण लष्करी इतमामाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. (वृत्तसंस्था) १ ऑगस्ट २३: खुरमूर, हंदवारा.पाकिस्तान समर्थीत लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान.
२ऑगस्ट २६ व २७ : लष्करच्या आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा. याच मोहिमेत पाकिस्तानच्या मुजफ्फरगड येथे राहणारा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी सज्जाद अहमद ऊर्फ अबू उबैदुल्ला जिवंत हाती लागला.
३सप्टेंबर ३ : कूपवाडाजवळील हफरुद येथील घनदाट जंगल. चार दहश्तवाद्यांना यमसदनी धाडून हौतात्म्य पत्करले.
[Lokmat] Nashik 06 Sep 2015 Page 6
|
Sunday, 6 September 2015
१0 दहशतवाद्यांचा खात्मा करून बलिदान!
Labels:
2015,
Indian Army,
News,
वीरगाथा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment