दुरिताचे तिमीर जावो | विश्वस्वधर्मसूर्ये पाहो | जो जे वांछिल तो ते लाहो ! प्राणीजत |
नूतन वर्षात आपल्या मधील दुराव्याचे तिमीर (असल्यास) प्रेमाच्या सोयरीक रूपी सूर्य किरणांनी दूर होवो ! या मंगल प्रसंगी आपण सर्व समाजजन आपापसातील हेवे-दावे (असल्यास) विसरून बन्धुत्वाच्या भावनेने प्रेमपूर्वक आपल्या स्वधर्माचे आचरण करण्यास प्रवृत्त होऊया आणि भगवंताला शुद्ध अंत:करणाने प्रार्थना करुया की सर्वांच्या सर्व ईच्छा पूर्ण होवोत, प्रत्येकाला हवे असलेले सर्व काही त्यास प्राप्त होवो !
आम्हांस वरिष्ठ जनांचा आशीर्वाद , त्यांचे अनुभवाचे बोलणे सतत लाभो तसेच पुढील पिढीचे सहकार्य देखील लाभों ! आम्हास मिळालेले सर्व काही निरीच्छ भावनेने पुढच्या पिढीस हस्तांतरीत करताना आमच्या मनास यत् किञ्चित ही स्वार्थ-स्पर्श न होवोआणि सर्वात महत्वाचे म्हणजे "नाना सुकृताचे फळ" म्हणून जो नरदेह लाभला आहे तो व्यर्थ भू-भार न होता चंदना प्रमाणे झिजून त्याच्या द्वारे झालेल्या सत्कर्मांचा सुगंध सर्वत्र दरवळो आणि देह सत्कारणी लागण्याची पावती समाजरूपी परमेश्वराकडून प्राप्त होवो !
सैनिक दर्पण तर्फे नूतन वर्षा निमित्त मंगल कामना !
सैनिक दर्पण तर्फे नूतन वर्षा निमित्त मंगल कामना !
No comments:
Post a Comment