"सुकन्या समृध्दी खाते" म्हणजे नेमके काय?
“बेटी बचाव बेटीव पढाव” मोहिमेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारीला हरियाणातल्या पानिपत येथे “सुकन्या समृध्दी खाते” योजना सुरु करण्यात आली.
मुलीच्या जन्मापासून 10 वर्षांपर्यंत मुलींच्या नावाने 1000 हजार रुपयांच्या किमान ठेवीसह कधीही सुकन्या समृध्दी खाते उघडता येईल. त्यानंतर 100 च्या पटीत रक्कम ठेवता येईल. एका वित्तीय वर्षात किमाल दीड लाख रुपये खात्यात जमा करता येऊ शकतील. ही योजना सुरु करण्याच्या एक वर्ष अगोदर ज्या मुली 10 वर्षांच्या झाल्या आहेत, त्याही या योजनेसाठी पात्र ठरतील.
खाते देशभरातल्या कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा वाणिज्य बँकांच्या अधिकृत शाखांमध्ये मुलीच्या जन्माचा दाखला घेऊन उघडता येईल.
खातेधारक मुलीला 10 व्या वर्षी स्वत:च्या खात्याचे व्यवहार स्वत: करता येतील.
खाते उघडल्याच्या तारखेपासून ते 21 वर्ष किंवा वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न यापैकी जे आधी घडेल तोवर खाते कार्यरत राहील.
खातेधारक मुलीच्या उच्च शिक्षणाच्या खर्चाची गरज पूर्ण करण्यासाठी 18 वर्षे पूर्ण झाल्यावर ठेवीचा काही भाग मुलीला खात्यातून काढता येईल. मुलींचे लवकर लग्न करण्याला आळा घालण्यासाठी 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलीच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत, अशी तरतूद या योजनेत करण्यात आली आहे.
मुलीच्या नावे खाते उघडण्यासाठी आणि तिच्या कल्याणाकरिता बचतीचा अधिकाधिक भाग तिच्या नावे जमा करण्यासाठी पालकांना प्रोत्साहन देण्याकरिता ठेवींवर चालू आर्थिक वर्षात प्राप्तिकर सवलत देण्याचे तसेच वार्षिक संयुक्त आधारे 9.1 टक्के व्याजदर देण्याचे प्रस्तावित आहे
No comments:
Post a Comment