Sunday, 22 May 2022

अमृत जवान सन्मान अभियान 100% यशस्वी करणेसाठी महाराष्ट्रातील सर्व सैनिकांना विनंतीपूर्वक अव्हान

आपल्याला माहीती आहे की, महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 13.04.2022 च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ज्या माजी सैनिकांचे,शहीद जवानाचे विधवा भगिनींचे व सेवेत कार्यरत असलेल्या सैनिकांचे आणि त्यांच्या कुटूंबियाच्या ज्या प्रलंबित तक्रारी आहेत त्या तक्रारी कामांचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी शासनाने दिनांक 01 मे ते 15 जून 2022 पर्यंत “अमृत जवान अभियान” सुरु केलेले आहे.

त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व सैनिकांना दिनांक 14/05/2022 पासुन whatsapp मेसेज व्दारे अव्हान करण्यात आले होते त्यास अनुसरुन महाराष्ट्रातील अनेक सैनिकांचे फोन येऊ लागले आहेत तर शिरुर तालुक्यातील काही सैनिकांनी सोबत जोडलेल्या पत्राप्रमाणे त्यांच्या तक्रारी सुध्दा तहसिलदार कार्यालयाकडे दाखल केलेल्या आहेत. 

तरी महाराष्ट्रातील सर्व सैनिकांना विनम्र विनंती आहे की ज्या सैनिकांच्या वैक्तिक तक्रारी शासकीय कार्यालयाकडे प्रलंबित आहेत त्या सैनिकांनी सोबत जोडलेल्या पत्राच्या नमुन्यात आप आपल्या तालुक्यात तालुकास्तरावर स्थापन केलेल्या अमृत जवान सन्मान अभियान समन्वय समिती कडे म्हणजे मा.सदस्य सचिव तथा तहसीलदार साहेब तहसीलदार यांचे कार्यालय तालुका - जिल्हा - (महाराष्ट्र) या कार्यालयाकडे तातडीने लेखी स्वरुपात दाखल करण्यात याव्यात आणि दाखल केलेल्या तक्रारी पत्रावर त्या संबंधित तहसिलदार कार्यालयाची पोहोच घेण्यात यावी तसेच सदरची पोहोच ही आपल्या तालुक्यातील सैनिक संघटनेच्या तालुका अध्यक्षांकडे जमा करावी.जेणेकरुन संघटनेच्या कार्यालयाकडे जमा केलेल्या प्रलंबित प्रकरणांचे विषय निहाय एकत्रिकरण करण्यात येईल आणि त्या तक्रारी पत्रांच्या पुराव्याच्या आधारे दिनांक 15 जून 2022 नंतर त्या त्या तालुक्यातील संघटनेच्या माध्यामातुन संबंधित तहसिलदार साहेबांची समक्ष भेट आपल्या तक्रारीवर केलेल्या कार्यवाही संदर्भात विचारणा करण्यात येईल.

तेव्हा शासनाने महाराष्ट्रातील सर्व सैनिकांना त्यांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी या अभियाना व्दारे एक सुवर्ण संधी दिलेली आहे हे प्रथम लक्षात घ्यावे. तेव्हा “अभी नही तो फीर कभी नही” या उक्तीप्रमाणे जर सैनिकांनी आपल्या तक्रारी असताना ही वेळेत दाखल केल्या नाहीत तर अभियान कालावधीनंतर शासन व प्रशासनच असे जाहीर करेल की महाराष्ट्रात 01 मे ते 15 जून 2022 पर्यंत अमृत जवान सन्मान अभियान शासनाच्या वतीने राबविले होते. परंतु “संपुर्ण महाराष्ट्रात कोणत्याच सैनिकांच्या तक्रारी तालुका स्तरावर स्थापन केलेल्या अमृत जवान सन्मान अभियान समिती तथा तहसिलदार कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या नाहीत.त्यामुळे महाराष्ट्रात सैनिकांच्या तक्रारी प्रलंबित नाहीत” मंग बसा बोंबलंत कृपया अशी वेळ येऊन देऊ नका ही पुन्हा पुन्हा विनंती आहे.

तसेच महाराष्ट्रातील सर्व गाव व तालुका आणि जिल्हा तसेच राज्यस्तरीय सैनिक संघटनांना सुध्दा पुन्हा विनंती आहे की,महाराष्ट्रातील सैनिकांच्या प्रलंबित असलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी हे शासनाने अभियान सुरु केलेले आहे परंतु आप आपल्या गावातील,तालुक्यातील व जिल्हयातील आणि राज्यातील आपल्या सैनिकांच्या ज्या प्रलंबित तक्रारी आहे त्या संबंधित प्रशासनाने पुर्ण या अभियानात सोडविल्या गेलेल्या आहेत किंवा नाही? हे पहाणे महाराष्ट्रातील प्रत्येक  सक्रिय संघटनेची जबाबदारी आहे. त्यामुळे ही जबाबदारी प्रत्येक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्किारल्यास शासनाने सुरु केलेले अभियान 100% यशस्वी होईल आणि हे अभियान 100% यशस्वी करण्यासाठी म्हणजेच आपल्या सैनिकांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फक्त् दिनांक 15 जून 2022 पर्यंत प्रत्यक्षात ग्राऊंडवर काम करावे लागणार आहे. तरी या अभियानात सर्वांनी प्रत्यक्षात सहभागी होऊन हे अभियान आपल्या सैनिकांच्या प्रलंबित तक्रारीचे निरसन करण्यासाठी 100% यशस्वी करावे.

ही विनंती.

              जय हिंद  !!!

कॅप्टन स्मिता गायकवाड

 2004 ची गोष्ट आहे . 


भारतीय सैन्यात रुजू होणाऱ्या 75 महिला अधिकाऱ्यांच्या आमच्या कोर्स मध्ये महाराष्ट्रातून आम्ही दहा जणी होतो .


त्यापैकी तीन कुलकर्णी होत्या. तीन कुलकर्णी आणि मी एक गायकवाड  अशी आमची चौकडी होती . त्यामुळे आम्हाला  K3G  म्हटलं जायचं . सैन्यात जाण्यासाठी तयारी करत असताना जिच्याबरोबर मी Running Practice करायचे ती माझी जिवलग मैत्रीण  देशपांडे  होती जी नंतर भारतीय सैन्यात रुजू झाली . ज्याच्याबरोबर Group Discussion ची practice करायचे तो  उपासनी  होता . जे सध्या भारतीय सैन्यातील एका बटालियनचे Commanding Officer म्हणून नेतृत्व करत आहे . ज्यांनी मला सैन्यात जाण्यासाठी मार्गदर्शन केलं ते  कर्नल चितळे  होते . सैन्यात प्रशिक्षण घेवून सुट्टीवर आल्यावर घरी बोलावून कौतुक करणाऱ्या माझ्या शाळेतील वर्गशिक्षिका आणि त्यांचे पती  जनरल भट  होते . बाकी अनेक गोडबोले, रानडे, जोगळेकर ,जोशी , अभ्यंकर मी आर्मी मध्ये पाहिले आहेत .

सांगण्याचा उद्देश हा की  राजू शेट्टी  किंवा  Caravan सारख्या जातिवाद्यांनी  कितीही विष पेरायचं काम केलं तरी हा समाज स्वानुभवातून मतं बनवत असतो आणि बनवत राहील . आणि त्याही पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे _जेव्हा जोशी ,कुलकर्णी, गायकवाड, कांबळे , निंबाळकर किंवा अजून कोणीही सैन्यात भरती होतात तेव्हा ते जोशी , कुलकर्णी, गायकवाड, कांबळे,  निंबाळकर रहात नाहीत त्यांची ओळख फक्तं  "फौजी"  इतकीच असते.  फील्ड मार्शल करिअप्पा  ह्यांचा  मुलगा  म्हणजे  एअर मार्शल के सी नंदा  .भारत पाक युद्धाच्या वेळी  के सी नंदा Squadron Leader होते . त्यांचे विमान पाकिस्तानने पाडले आणि त्यांना बंदी बनवले . नंतर अयुब खान ह्यांना समजले की फिल्ड मार्शल करीअप्पा ह्यांचा मुलगा बंदी बनवला आहे ..अयुब खान आणि करिअप्पा हे दोघं ब्रिटिश आर्मी मध्ये एकत्र लढले होते . त्यामुळे अयुब खान ह्यांनी करिअप्पांना फोन करून त्यांच्या मुलाला सोडण्याची offer दिली .  करिअप्पा  तेव्हा म्हणाले की 'सगळेच POW (Prisoners of War) माझी मुलं आहेत सोडायचं असेल तर सगळ्यांना सोडा' .  जिथे रक्ताची नाती त्या युनिफॉर्म च्या नात्यापुढे दुय्यम ठरतात तिथे "जात" किस झाड की पत्ती  

राजकीय पोळ्या भाजण्यासाठी आणि फुटीरतावाद पसरवण्यासाठी  कोणी कितीही सैनिकांच्या जाती काढण्याचा प्रयत्न केलात तर त्यातून स्वतःच्या वैचारिक दारिद्र्याचं आणि संकुचित मानसिकतेचं प्रदर्शन मांडताय. ह्यापेक्षा जास्तं काही साध्य होणार नाही .कारण बुरसटलेल्या जातीवादी संकुचित मानसिकतेपेक्षा त्या  Olive Green  वर्दीतल्या  Camaradarie  ची  ताकद खूप जास्त आहे  . जी  तुमच्या संकुचित जातीवादी मानसिकतेला आणि तुमच्या फुटीरतावादी अजेंड्याला पुरून उरेल . हा केवळ विश्वास नाही तर अनुभव आहे .


-  कॅप्टन स्मिता गायकवाड