मिळकत कर : पुढील वर्षापासून मिळणार सवलत
पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) - महापालिकेच्या तिजोरीत "ऑनलाईन'व्दारे सुमारे 80 कोटी 36 लाख रुपयांचा कर शुक्रवारी सायंकाळपर्यंत जमा झाला आहे. त्यामुळे अजुनही करात निश्चित वाढ होणार आहे. गतवर्षी हे प्रमाण 80 कोटी 55 लाख होते. मात्र, पुढील आर्थिक वर्षात "ऑनलाईन' कर भरणाऱ्या नागरिकांना करात 2 टक्के सूट दिली जाणार आहे, अशी माहिती सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने 2009-10 या आर्थिक वर्षापासून "ऑनलाईन' कर भरण्यास सुरुवात केली. त्यानुसार पहिल्या आर्थिक वर्षात 3 हजार 835 कर धारकांनी 2 कोटी 11 लाख रुपयांचा कर भरला होता.
त्यानंतर 2010-11 मध्ये 9 हजार 338 कर धरकांनी 7 कोटी 29 लाखांचा कर भरला, 2011-12 मध्ये "ऑनलाईन' करसंकलन 13 कोटी 62 लाखांवर गेले. यावर्षी 15 हजार 783 नागरिकांनी "ऑनलाईन' पद्धतीने कर भरला होता. तर 2012-13 या आर्थिक वर्षात "ऑनलाईन'पद्धतीने कर भरणाऱ्यांची संख्या वाढून ती 28 हजार 966 वर पोहोचली. त्यावर्षी 26 कोटी 96 लाख रुपयांचा कर "ऑनलाईन' पद्धतीने भरला होता.
2013-14 या वर्षात 47 हजार 529 कर धारकांनी 46 कोटी 97 लाख रुपये "ऑनलाईन' पद्धतीने भरले गेले. तर 2014-15 मध्ये 61 हजार 913 कर धारकांनी 64 कोटी 68 लाखांचा कर भरला. तसेच, 2015-16 यामध्ये 76 हजार 390 कर धारकांनी 80 कोटी 55 लाखांचा कर "ऑनलाईन' पद्धतीने कर भरला. 2016-17 यामध्ये एकूण 84 हजार 271 कर धारकांनी 22 टक्के कर वसुली झाली असून, 80 कोटी 36 लाख रुपये रक्कम "ऑनलाईन' पद्धतीने भरली आहे.
त्यामुळे "ऑनलाईन' कर भरण्यासाठी नागरिकांनी जास्तीत-जास्त पुढाकार घ्यावा, असे आवाहन गावडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment