सैनिक दर्पण, भारतीय माजी सैनिक संघ नाशिक
अन्नदान , श्रमदान ( स्वच्छ भारत अभियान ) आणि वारकऱ्यांसाठी विसावा
आज ०२ अक्टोम्बर २०१४, एक ऐतहासिक दिवस. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे द्वितीय पंतप्रधान श्री लाल बहादुर शास्त्री यांची जयन्ति. श्री लाल बहादुर शास्त्री यांनी "जय जवान, जय किसान" हा नारा दिला. त्यावेळी सर्व शेतकऱ्यांनी अन्नाची कोठारे भरली आणि देशाला समृद्ध केले. महात्मा गांधीजीं (बापू) नी "भारत छोडो" ची घोषणा दिली आणि सर्व देश स्वतंत्र्यासाठी एकत्र आला. बापूंना आजून एक गोष्ट आवडत होती. ती म्हणजे स्वच्छता . त्यांच्या स्वच्छ भारत स्वपनास साकार करण्यासाठी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज पासून "स्वच्छ भारत" (एक कदम स्वच्छता की और ) या अभियानाची सुरुवात केली .
भारतीय माजी सैनिक संघ नाशिक आणि तालुका समिति सद्स्यानी या कमची सुरुवात आधाराश्रम येथे जावुन श्रमदान करून केली. आधारतीर्थ आधाराश्रम नाशिक हे महाराष्ट्रातील त्र्यम्बकेश्वर येथे आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची जवळपास १५० मुले मूली या आश्रमात सध्या राहतात असे आधाराश्रमाचे संचालक श्री त्र्यम्बकराव गायकवाड़ यांनी माहिती दिली .
सुरवतीला आधारश्रमात अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला. या अन्नदानाचा संपूर्ण खर्च भारतीय माजी सैनिक संघटनेचे सदस्य श्री हिरामन काळे (रा. सातपुर जिल्हा नाशिक ) यांनी केला .
अन्नदान नंतर स्वच्छ भारत या अभियानाची सुरुवात झाली . प्रथमत: भारतीय माजी सैनिक संघटनेचे सचिव श्री पि यु चौधरी यांनी सर्व मुला मुलींना स्वच्छ भारत अभियानाची शपथ दिली.
आणि संघटनेचे प्रसिद्धि प्रमुख, संपादक सैनिक दर्पण श्री महेंद्र सोनवणे यांनी स्वच्छ भारत आणि श्रमदानाचे महत्व सर्व मुला मुलींना समजावून सांगितले.

त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला या कार्यक्रमात आश्रमातील विद्यार्थ्यांनी विविध गुण दर्शन करीत गाणी, नाटक, नाच, कव्वाली सादर केली.
त्यानंतर श्रमदानाचा कार्यक्रम राबवण्यात आला. सर्वानी त्यात हिरिरिने भाग घेवून परिसर स्वच्छ केला.
भारतीय माजी सैनिक संघटना नाशिक तर्फे, त्र्यम्बकेश्वर येथे येणाऱ्या श्रद्धालु माजी सैनिक आणि परिवार यांची विसाव्याची सोय व्ह्यावी या उद्देशानी "वारकऱ्यांसाठी विसावा" समर्पित करण्यात आले.
जीवनात आपणास आनेक गोष्टीची अपेक्षा असते, आवशकता असते. ती पूर्ण होण्यासाठी आपण नेहमी धडपडत असतो. "जय जवान, जय किसान" या ब्रीदवाक्यास संकल्प सिद्धिःस नेतांना भारतीय जवान सीमेवर अहोरात्र कड़क पहरा देवून देशाची सेवा करतात. त्यामुळे आपण भारतीय नागरिक सुखाने आणि गुण्या गोविंदाने आपल्या परिवारासोबत राहु शकतो. बळिराजा (शेतकरी) संपूर्ण जीवन शेतामधे राबुन अन्न धन्य पिकवून आपल्या देशवसियांची भूक भगवतो आणि देशसेवेत योगदान करतो. दुष्काळ असो, साहूकारी कर्ज असो किंवा इतर कोणतेही कारण आसो या देशात शेतकरी आत्महत्या करतात हा एक चिंतेचा विषय आहे. कुटुंबाचा कर्ता पुरुष नहीं म्हटल्यावर त्या कुटुंबाची काय अवस्था होते हे आपणास माहिती असेलच. शेतकरी आत्महत्या केल्यावार त्या परिवरतील बालकांनी कुठे जावे? कोण त्यांना आधार देईन? हा यक्ष प्रश्न उभा रहातो. अश्या बालकांना आधारतीर्थ आधाराश्रम (ता. त्र्यम्बकेश्वर जिल्हा नाशिक ) यांनी आधार देवून संगोपनाचे सत्कार्य सतत सुरु ठेवलेले आहे. समाज सेवा करायची म्हणजे पैसा हावाच. येथे आल्यावर प्रत्यक्ष्य डोळ्यांनी पाहिले की या सर्व बालकांच्या संगोपनासाठी लागणारा पुरेसा निधि आश्रमकाडे उपलब्ध नाही.
भारतीय माजी सैनिक संघ नाशिक चे अध्यक्ष श्री फूलचंद पाटिल यांनी आधारतीर्थ आधाराश्रमाचे संचालक श्री त्र्यम्बकराव गायकवाड़ यांच्याशी वार्तालाप करताना आधारतीर्थ आधाराश्रमास सर्वतोपरी यथायोग्य मदत केली जाईल असे आश्वासन दीले. सर्व सेवा भावी सामाजिक संस्था, समिति आणि नागरिकांनी एकत्र येवून आधारतीर्थ आधाराश्रमास भेट देवून यथाशक्ति बहुमूल्य योगदान द्यावे हे आवाहन देखील केले.
या कार्यक्रमासाठी भारतीय माजी सैनिक संघ नाशिक व सैनिक दर्पण चे पदाधिकारी आणि संघटनेच्या परिवरतील बालक कुमार नमन सुरेन्द्र सोनवणे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या पूर्ततेसाठी श्री फूलचंद पाटिल, श्री गोविन्द बस्ते, श्री विजय पवार, श्री मेघश्याम सोनवणे, श्री पि यु चौधरी, श्री श्रीराम आढाव , श्री साहेबराव कसाव, श्री महेंद्र सोनवणे, श्री उदय तेली, श्री प्रभाकर बडगूजर, श्री चंद्रशेखर काम्बले, श्री नरेंद्र तेलरांधे, श्री आर के सिंह , श्री हिरामन काळे, श्री सोपान मुसले , श्री मुरलीधर वाघ, श्री प्रकाश मेधने, श्रीमती रेखा खैरनार, श्रीमती अपर्णा तकवाले, श्री पंडित एल्मामे, श्री शिवजी शिवर, एडवोकेट सारिका चव्हाण, श्री त्र्यम्बकराव गायकवाड़ आणि श्री कपड़निस यांनी परिश्रम घेतले व मोलाचे मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment