Monday 8 July 2019

Budget 2019 : अर्थसंकल्पातील घोषणेनंतर होम लोनच्या व्याजदरावर ३.५० लाख रुपयाचा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रत्येकाचं स्वप्न असत की आपलं स्वतःच एक घर असावं. परंतु पैशाअभावी अनेकांचं हे स्वप्न अधुरं राहतं. अशा वेळी होम लोनची मदत घेतली जाते. अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांना होम लोनवरील व्याजदरात मोठा दिलासा मिळाला आहे.

काय आहे घोषणा?
अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी होम लोनच्या व्याजदरावर १.५ लाख रुपये अतिरिक्त कर सवलत देण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत ही सवलत २ लाख रुपये इतकी होती. आता या घोषणेनंतर होम लोनच्या व्याजदरात ३.५० लाखापर्यंत सवलत मिळेल.

पात्रतेच्या अटी
या सवलतीचा फायदा घेण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागेल. ही सवलत ४५ लाख रुपयापर्यंतच्या होमलोनवरच मिळेल. या होम लोन चा कालावधी जास्तीत जास्त १५ वर्षे असणे अनिवार्य आहे. तसेच कर्ज घेणाऱ्याच्या नावावर कोणतीही प्राॅपर्टी नसली पाहिजे. या योजनेचा फायदा १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० पर्यंत घेण्यात आलेल्या होम लोनवरच मिळेल. म्हणजेच नव्या खरेदीदारांनाच याचा फायदा घेता येईल.

उदारहरणार्थ
असे समजा की प्रतिवर्षी १० लाख रुपयाची कमाई करणाऱ्या सुधीरने दिल्लीमध्ये ४० लाख रुपयांचे घर खरेदी केले आहे. या घरासाठी सुधीरने SBI कडून ८.५५ च्या व्याजदरावर ३० लाख रुपयाचे होम लोन घेतले आहे. आता सुधीर इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये होम लोनवरील व्याजदराचा हिशोब देऊ शकतात. यांमुळे सुधीरला ३.५० लाख रुपयाची सूट मिळेल.

Dailyhunt

No comments:

Post a Comment