Showing posts with label श्रद्धांजली. Show all posts
Showing posts with label श्रद्धांजली. Show all posts

Saturday, 24 September 2016

हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून काढणार मोर्चा - पुणे

पंधरा लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग असणार
पुणे - मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी रविवारी (ता. 25) पुण्यात होणाऱ्या "मराठा क्रांती (मूक) मोर्चा‘ची तयारी पूर्ण झाली असून, या मोर्चात 15 लाख नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा मोर्चा नियोजन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यादृष्टीने मोर्चाची संपूर्ण रचना करण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.


मोर्चाचे नियोजन करणाऱ्या 25 हून अधिक समित्यांनी केलेल्या तयारीची माहिती पत्रकार परिषदेत दिली. मोर्चाच्या प्रारंभी उरी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. त्यानंतर मोर्चाला सुरवात होईल. विधानभवन येथे समारोप होईल. पाच युवतींचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर करेल. तेथून बाहेर आल्यानंतर सरकारला सादर केलेल्या निवेदनाचे वाचन एक युवती करेल. राष्ट्रगीतानंतर मोर्चाचा समारोप होईल. मोर्चा विसर्जित झाल्याची घोषणा झाल्यानंतर मोर्चातील सहभागी नागरिक आहे त्याच ठिकाणाहून आपापल्या गावी निघतील. मोर्चाला मोठ्या प्रमाणात वाहने येणार असल्याने शहरातील नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर आणू नयेत, असे आवाहनही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

असा राहणार मोर्चा
* महिला, युवती, वृद्धांचा लक्षणीय सहभाग
* पाच ते सात हजार स्वयंसेवक
* प्रमुख रस्त्यांभोवतीच्या 40 संस्थांच्या मैदानांवर पार्किंग
* मोर्चामागे कचरा उचलण्यासाठी स्वयंसेवकांची पथके
* अल्पोपाहार - पाणी, बिस्किटांची सोय
* 25 ठिकाणी मोबाईल स्वच्छतागृहे

मोर्चाची सुरवात, मार्ग व समारोप
गोपाळ कृष्ण गोखले चौकाजवळील (गुडलक चौक) छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सकाळी 10.30 वाजता मोर्चास सुरवात. खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक, सोन्या मारुती चौक, सतरंजीवाला चौक, नाना पेठ, क्वार्टर गेट, एमएसईबी चौक, समर्थ पोलिस ठाणे, लाल देऊळ, नवीन जिल्हा परिषदमार्गे विधानभवन. शासकीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून मोर्चाचा समारोप.

वैद्यकीय सेवा व मदत केंद्र
* प्रत्येक चौकात मदत केंद्र
* डॉक्‍टर्स - 550
* परिचारिका - 200
* रुग्णवाहिका - 40
* स्वयंसेवक - 150

Wednesday, 27 July 2016

कारगिल युद्धातील हुतात्म्यांना 'सॅल्यूट' - नरेंद्र मोदी - - पीटीआय

नवी दिल्ली - तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने 1999 मधील कारगिल युद्धात खंबीरपणा दाखविल्यानेच भारताला नेत्रदीपक विजय मिळाला. या युद्धात देशासाठी ज्या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना माझा "सॅल्यूट‘, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

कारगिल विजय दिनानिमित्त मोदी यांनी आज "ट्विट‘ केले. मोदी म्हणाले, ‘1999 मध्ये त्यावेळच्या सरकारने खंबीरपणे घेतलेल्या निर्णयाचा मला आजही अभिमान वाटतो. कारगिलमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शत्रूंना भारतीय जवानांनी जशास तसे दिलेले उत्तर अविस्मरणीय आहे. भारतीय लष्कराच्या धैर्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि भारत या धैर्याला कदापी विसरणार नाही. शेवटच्या श्‍वासापर्यंत जे जवान लढले, ज्यांनी देशासाठी त्याग केला, त्यांची प्रेरणा आम्ही घेत राहू.‘‘
द्रास येथे श्रद्धांजली
लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्ट. जनरल डी. एस. हुडा यांनी आज जम्मू आणि काश्‍मिराच्या द्रास भागात कारगिल युद्धातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. द्रास येथील ऐतिहासिक स्मृतीस्थळाला हुडा यांनी भेट दिली. कारगिल युद्धात भारतीय लष्कराने केलेल्या नेत्रदीपक कामगिरीचा त्यांनी या वेळी गौरव केला. या वेळी लष्करातील अधिकारी आणि जवान उपस्थित होते.

कारगिल युद्धातील हुतात्म्यांना 'सॅल्यूट' - नरेंद्र मोदी - - पीटीआय

नवी दिल्ली - तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने 1999 मधील कारगिल युद्धात खंबीरपणा दाखविल्यानेच भारताला नेत्रदीपक विजय मिळाला. या युद्धात देशासाठी ज्या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना माझा "सॅल्यूट‘, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

कारगिल विजय दिनानिमित्त मोदी यांनी आज "ट्विट‘ केले. मोदी म्हणाले, ‘1999 मध्ये त्यावेळच्या सरकारने खंबीरपणे घेतलेल्या निर्णयाचा मला आजही अभिमान वाटतो. कारगिलमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शत्रूंना भारतीय जवानांनी जशास तसे दिलेले उत्तर अविस्मरणीय आहे. भारतीय लष्कराच्या धैर्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि भारत या धैर्याला कदापी विसरणार नाही. शेवटच्या श्‍वासापर्यंत जे जवान लढले, ज्यांनी देशासाठी त्याग केला, त्यांची प्रेरणा आम्ही घेत राहू.‘‘
द्रास येथे श्रद्धांजली
लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्ट. जनरल डी. एस. हुडा यांनी आज जम्मू आणि काश्‍मिराच्या द्रास भागात कारगिल युद्धातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. द्रास येथील ऐतिहासिक स्मृतीस्थळाला हुडा यांनी भेट दिली. कारगिल युद्धात भारतीय लष्कराने केलेल्या नेत्रदीपक कामगिरीचा त्यांनी या वेळी गौरव केला. या वेळी लष्करातील अधिकारी आणि जवान उपस्थित होते.

Monday, 23 May 2016

महाराष्ट्रमुंबई महाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मिरात वीरमरण

श्रीनगर कुपवाडा जिल्ह्यातील ड्रगमुला भागात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जखमी झालेले नायक पांडुरंग महादेव गावडे यांना वीरमरण आलं आहे. गावडे यांचं रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती आज संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 

पांडुरंग गावडे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील सुपुत्र होते. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचं पार्थिव सिंधुदुर्गातील त्यांच्या मूळगावी पाठवण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरच्या सीमाभागात असलेल्या कुपवाडा जिल्ह्यात शनिवारी तब्बल नऊ तास चाललेल्या चकमकीत भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर देत पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. ४७ राष्ट्रीय रायफल्स, ४१ राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली होती. या चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना ४१ राष्ट्रीय रायफल्सचे पांडुरंग महादेव गावडे, ४७ राष्ट्रीय रायफल्सचे अतुल कुमार व अन्य एक जवान गंभीररीत्या जखमी झाले होते. पांडुरंग यांच्या चेहऱ्यावर गोळी लागली होती तर अतुल यांच्या उजव्या खांद्याला गोळी लागली होती. या दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत प्रथम ड्रगमुला येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर श्रीनगर येथील रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले होते. तिथे उपचार घेत असतानाच आज पांडुरंग गावडे यांची प्राणज्योत मालवली. 


पाच वर्षापूर्वी झाले होते भरती :

 पांडुरंग हे सावंतवाडी तालुक्यातील आंबोली-मुळवंदवाडीतील होते. पाच वर्षांपूर्वीच ते लष्करात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा अवघा दोन ते तीन महिन्यांचा आहे. पांडुरंग यांच्या निधनाने गावडे कुटुंब तसेच संपूर्ण आंबोलीवरच शोककळा पसरली आहे. 

मटा ऑनलाइन वृत्त 

Sunday, 14 February 2016

हनुमंतप्पांची मृत्यूशी अपयशी झुंज - वृत्तसंस्था

सियाचिनचा बहाद्दूर जवान हुतात्मा; देशाने वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली : सियाचिनमध्ये हिमकडे कोसळून त्याखाली सहा दिवस गाडले गेलेले लान्स नाईक हनुमंतप्पा कोप्पड यांची मृत्यूशी झुंज अखेर गुरुवारी संपली. हनुमंतप्पा या लढवय्या जवानाने गुरुवारी 11 वाजून 45 मिनिटांनी दिल्लीतील आर. आर. रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

गेल्या दोन दिवसांपासून हनुमंतप्पा यांचे प्राण वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील तज्ज्ञ डॉक्‍टरही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते; पण गुरुवारी त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि या वीराची प्राणज्योत मालवली. हनुमंतप्पांच्या पश्‍चात त्यांची पत्नी महादेवी आणि दोन वर्षांची मुलगी नेत्रा कोप्पड असा परिवार आहे. कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यातील बेटादूर गावचे हनुमंतप्पा 13 वर्षांपूर्वी लष्करात दाखल झाले होते.

हनुमंतप्पा यांच्या मेंदूकडे होणारा प्राणवायूचा पुरवठा खालावला. त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांना न्यूमोनियाची लागण झाल्याचे सीटी स्कॅनमधून स्पष्ट झाले होते. त्याचप्रमाणे त्यांची विविध इंद्रिये हळूहळू निकामी होत गेली. शक्‍य तितके सर्व उपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर आज दुपारी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने त्यांचे निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही रुग्णालयात जाऊन हनुमंतप्पांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. संपूर्ण देशभर हनुमंतप्पाच्या प्रकृतीत सुधारणेसाठी प्रार्थना केली होती; पण हनुमंतप्पाच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या मूळगावासह संपूर्ण देश शोकाकुल झाला आहे. देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात होती. ट्विटर या सोशल नेटवर्क साईटवरूनही अनेक जण आपल्या भावना व्यक्त करत होते.

सियाचिन हिमनदी क्षेत्रात गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासून ते नियुक्त होते. गेल्या डिसेंबरमध्ये तेथील 19,500 फूट उंचावरील शिखरावर नियुक्त झालेल्या तुकडीत त्यांचाही समावेश होता. तिथे उणे 40 अंश तापमानाला आणि ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना जवानांना तोंड द्यावे लागते. सियाचिन हिमनदीमध्ये 3 फेब्रुवारीला हिमस्खलनामुळे 19 मद्रास बटालियनचे दहा जवान ढिगाऱ्याखाली सापडले होते. हिमस्खलन झालेल्या ठिकाणी तब्बल 25 फूट बर्फ कापून काढल्यानंतर सहा दिवसांनी हनुमंतप्पा कोप्पड यांना जिवंत बाहेर काढण्यात आले होते.
हनुमंतप्पा हे नेहमीच जोखमीच्या मोहिमांसाठी उत्सुक असत. 13 वर्षांच्या लष्करी सेवेत अत्यंत धोकादायक आणि आव्हानात्मक भागांत त्यांनी जिद्दीने सेवा बजावली आहे. 33 वर्षांचा हा जवान उच्च ध्येयाने भारावलेला आणि उत्तम शरीर कमावण्यावर भर देणारा होता, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. काश्‍मिरात दहशतवाद्यांविरोधी मोहिमांत ते पाच वर्षे आणि ईशान्य भारतातही दोन वर्षे त्यांनी अतिरेक्‍यांविरोधात झुंज दिली आहे.
दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
लान्सनायक हनुमंतप्पा कोपड यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपाध्यक्ष अमित शहा, "आप‘ नेते कुमार विश्‍वास, जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, चित्रपट अभिनेता सनी देओल यांनी हनुमंतप्पांना श्रद्धांजली वाहिली.

गावावर शोककळा
दरम्यान, हनुमंतप्पांच्या निधनाची बातमी कळताच, त्यांच्या कर्नाटकातील धारवाडजवळच्या बेटादूर गावावर शोककळा पसरली. मात्र, गावचा जवान देशासाठी कामी आला, हा अभिमानाचा हुंदकाही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.