नवी
दिल्ली : मूत्रपिंड दानासंबंधी मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्याबाबत जनतेकडून आलेल्या
सूचनांच्या आधारे, सरकारने मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्याला अंतिम स्वरुप दिले असून
तो राष्ट्रीय अवयव आणि पेशी प्रत्यारोपण संघटनेच्या www.notto.gov.in या संकेतस्थळावर
प्रसिद्ध करण्यात आला आहे. नैतिक, कायदेशीर आणि वैज्ञानिक मत लक्षात घेऊन अवयव वितरणाचे
धोरण तयार करण्यात आले आहे. या मार्गदर्शक
तत्त्वांमुळे मूत्रपिंडाचे वितरण पारदर्शक पद्धतीने होईल. यकृत आणि हृदयासाठी मार्गदर्शक
तत्त्वांचा मसुदा तयार करण्यात आला असून तो संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अवयवांच्या अवैध
व्यापार प्रत्यारोपणावर कायद्यान्वये प्रतिबंध घालण्यात आला आहे. - आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा
(राज्यसभा)
Showing posts with label राज्यसभा. Show all posts
Showing posts with label राज्यसभा. Show all posts
Sunday, 8 May 2016
नवीन संरक्षण खरेदी प्रक्रिया निश्चित
नवी
दिल्ली : सरंक्षण खात्यामध्ये नवीन खरेदी प्रक्रिया (2016) निश्चित करण्यात आली आहे.
या प्रक्रियेची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर 28 मार्च 2016 पासून उपलब्ध
करुन देण्यात आली आहे. या नवीन खरेदी प्रक्रियेत सरकारच्या “मेक इन इंडिया” अभियानाला प्राधान्य
देऊन संपूर्णपणे देशी बनावटीची उत्पादने खरेदी करण्यावर भर देण्यात येणार आहे. भारतीय
उद्योजकांची पूर्णपणे स्वदेशी उत्पादने लष्करात जास्तीत जास्त वापरली जावीत, यासाठी
विशेष प्रयत्न नवीन खरेदी धोरण निश्चित करताना
केले आहे - संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर (राज्यसभा)
Subscribe to:
Posts (Atom)