न सांगीतले गेलेले छत्रपती...!!!
छत्रपती
शिवाजी महाराजांबाबत प्रमुख्याने फक्त या तीनच
गोष्टी सांगितल्या जातात....!
1.अफजलखानाचा
कोथळा
2.शाहीस्तेखानाची
बोटे आणि
3.आग्र्याहुन
हून सुटका
पण मला भावलेले छत्रपती
शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून
घ्यावेसे वाटतील....!
1. आपल्या
आईला जिजाऊ मॉसाहेबांना सती जाण्यापासून रोखणारे
छत्रपती शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती" करणारे होते...!
2. रयतेच्या
भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा
नये हा आदेश देणारे
"लोकपालक" राजे होते...!
3. सर्व
प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून
तिची नोंद त्यांनी ठेवायला
चालू केली असे "उत्तम
प्रशासक" होते...!
4. विनाकारण
व विना मोबदला झाडं
तोडल्यास नवीन झाड लावून
जगवण्याची शिक्षा देणारे "पर्यावरण रक्षक" होते...!
5. समुद्र
प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो
विरोध पत्करून आरमार उभे केले व
आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा
पेक्षा देश मोठा हा
संदेश देणारे "स्व-धर्मचिकित्सक" होते ...!
6. मुहूर्त
न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या
अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करुन
त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून
"अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारे चिकीत्सक राजे"
7. ३५०
वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन
पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी
आहे ! "जलतज्ञ" राजे छत्रपती शिवराय!!
8. ३५०
वर्षांपूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य
असे १०० राहून अधिक
गडकिल्ल्यांचे निर्माते, "उत्तम अभियंते राजे"
9. सर्व
जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत
सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे!!
10. परस्त्री
मातेसमान मानत महिलांना सन्मानाने
वागवाणारे "मातृभक्त, नारीरक्षक" छत्रपती शिवराय
11. संपुर्ण
विश्वात फक्त छत्रपती शिवरायांच्या
दरबारातच मनोरंजनासाठी कोणतीही स्री नर्तीका नाचवली
गेली नाही की मद्याचे
प्याले ही रिचवले गेले
नाहीत
खऱ्या
अर्थाने ते "लोकराजे" होते कारण ते
धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे
स्वप्न पहात होते हीच
खरी शिवशाही होती.....!
तमाम
शिवप्रेमी बांधवांना शिवजन्मोत्सवाच्या सहस्त्र कोटी शिवसदिच्छा 🚩🚩🚩