SD Pages

Pages

Saturday, 11 August 2018

दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी महिला स्वॅट कमांडोंवर

नवी दिल्ली - दिल्लीच्या संरक्षणाची जबाबदारी आता पुरुषांच्या बरोबरीने महिला कमांडो संभाळणार आहेत. स्वॅट महिला कमांडो पथक दिल्लीच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आले असून दिल्ली हे स्वॅट महिला कमांडो पथक असलेले देशातील पहिले पोलीस दल ठरणार आहे. स्वॅट महिला कमांडोंचा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत दिल्ली पोलीस दलात अधिकृत समावेश करण्यात येईल. या कमांडो युनिटमध्ये ईशान्य भारतातील ३६ महिलांचा समावेश करण्यात आला आहे.

या ३६ महिलांना भारतीय आणि परदेशी तज्ञांच्या देखरेखीखाली अत्यंत कठोर, खडतर प्रशिक्षण देण्यात आले आहे. पुरुषांप्रमाणे अशा पद्धतीचे महिलांचे विशेष कमांडो युनिट उभारण्याची मूळ कल्पना दिल्लीचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांची आहे. या पथकावर दिल्लीतील दहशतवादी करावाया रोखण्याची मुख्य जबाबदारी असेल. या महिला पुरुषांच्या तुलनेत सरस असल्याचे त्यांच्या प्रशिक्षणकर्त्यांनी सांगितल्याचे पटनायक म्हणाले.

अनेक प्रगत पाश्चिमात्य देशांनी अजून महिलांचे स्वॅट कमांडो पथक उभारलेले नसल्यामुळे ही मोठी बाब असून या महिला कमांडोंमध्ये आसाममधील १३, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि मणिपूरमधील प्रत्येकी पाच महिलांचा समावेश आहे. या महिलांना भारताप्रमाणेच इस्त्रायलमध्येही प्रशिक्षण देण्यात आले आहे. या महिलांना विनाशस्त्र कसे लढायचे ते सुद्धा शिकवण्यात आले आहे.

या महिला कमांडो एमपी ५ सबमशिन गन आणि ग्लॉक २१ पिस्तुलने सुसज्ज असतील. या महिला कमांडोंची मध्य आणि दक्षिण दिल्लीतील महत्वाच्या स्थळांवर तैनाती करण्यात येईल. नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले असेल तर त्यांची कशी सुटका करायची, इमारतींचे मजले कसे चढून जाण्याचे त्याचे या महिला कमांडोंना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment