SD Pages

Pages

Saturday, 23 September 2017

माजी सैनिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करावे - डॉ. रणजीत पाटील

मुंबई, दि. २० : राज्यातील माजी सैनिक व कुटुंबियांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करावे,  असे निर्देश आज गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. राज्यातील माजी सैनिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी माजी सैनिकांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी,पाल्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी, माजी सैनिकांच्या नोकरीसाठी असलेल्या समस्या, माजी सैनिक कल्याण मंडळ व इतर तत्सम मंडळातील कामकाजात येणाऱ्या अडचणी, त्याचप्रमाणे शहिद सैनिकांच्या विधवा पत्नींना नोकरी देताना येणाऱ्या अडीअडचणी सांगितल्या.
या सर्व सूचना आणि तक्रारी डॉ. पाटील यांनी ऐकून घेतल्या आणि संबंधितांना उपरोक्त निर्देश दिले.

No comments:

Post a Comment