Sainik Darpan is global platform for Defense personnel (Indian Army , Navy, Air Force), Veterans, their families and dependent. Wide publicity is given to welfare information. For more details please mail to sainik.darpan@gmail.com
SD Pages
▼
Pages
▼
▼
Saturday, 17 June 2017
यापुढे बॅंक खाते उघडण्यासाठी आधार बंधनकारक
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आधार कार्डबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयाअंतर्गत बॅंकेत खाते उघडण्यासाठी आता आधार कार्ड बंधनकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांमधील व्यवहारासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आलेआहे. यामुळे काळ्या पैशांवर आळा बसेल असे म्हटले जात आहे. सर्व बॅंक खातेधारकांना 31 डिसेंबर 2017 पर्यंत आधार क्रमांक बॅंकेत जोडण्यास सांगितले आहे, असे न केल्यास त्यांची बॅंक खाती अवैध होतील. जर कोणाला नवे बॅंक खाते उघडायचे असेल आणि त्यांच्याकडे आधार कार्ड नसेल, तर त्यांना आधार एनरोलमेंट प्रूफ द्यावा लागेल. खाते उघडल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्यांना आधार क्रमांक द्यावे लागेल. बॅंक खाते आधारला जोडल्यास आता सरकार लोकांच्या अकाऊंटमध्ये जमा होणारे पैसे आणि त्यांच्या खरेदीवर लक्ष ठेवू शकतं. उदाहरणार्थ, आता घर खरेदीसाठीही आधार अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने घर खरेदी केल्यास त्यावर सरकारची नजर राहिल. याआधी आयकर रिटर्न आणि नव्या पॅन कार्डसाठीही आधार कार्ड गरजेचे असल्याचे केंद्र सरकारने सांगितले होते. परंतु आधार कार्डबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाने संविधान पीठाच्या अंतिम निर्णयापर्यंत आयकर रिटर्नसाठी आधार कार्ड अनिवार्य करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
No comments:
Post a Comment