SD Pages

Pages

Sunday, 2 April 2017

भारतीय नौदलाच्या TU-142M विमानाला निरोप

भारतीय नौदलाचे आकाशातील नेत्र असलेल्या TU-142M विमानाला निरोप देण्यात आला. TU-142M विमानाने 29 वर्ष नौदलात सेवा बजावली. तामिळनाडूच्या आराकोनम येथील आयएनएस राजालीतळावर पार पडलेल्या या निरोप संमारंभला नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा, व्हाईस अॅडमिरल एचसीएस बिस्ट आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  टेहळणी आणि पाणबुडी विरोधी मोहिमांमध्ये TU-142M विमानाचा वापर करण्यात आला. मालदीवच्या कॅक्टस ऑपरेशनमध्ये TU-142M विमानाने महत्वाची भूमिका पार पाडल्याची आठवण सुनील लांबा यांनी सांगितली. 1999 साली प्रजासत्ताक दिनाच्या फ्लायपास्टमध्ये सहभागी झालेले टीयू नौदलाचे पहिले विमान होते.

No comments:

Post a Comment