SD Pages

Pages

Monday, 14 January 2013

माजी सैनिकांची मुले शिकताहेत विलायतेत

 
जळगाव- परदेशात शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांना सैनिक कल्याण निधीतून शिष्यवृत्ती देण्यात येते. ती अत्यंत तोकडी आहे. सैनिक कल्याण निधीतून यातूनच दोन वर्षात जिल्ह्यातून दोनच लाभार्थी उपलब्ध होऊ शकले. जळगाव येथील माजी सैनिक सुरेश पाटील यांचा मुलगा उज्ज्वल, तर अमळनेर येथील माजी सैनिक रामकृष्ण पाटील यांचा मुलगा कपिल दोघेही विलायतेत उच्च शिक्षण घेत आहेत. उज्ज्वल पाटील अमेरिकेत, तर कपिल पाटील जर्मनीत आहे. उज्ज्वलला 25 हजारच मिळाले होते. कपिल पुढल्या वर्षी रवाना झाल्याने त्याला दहा हजार जास्तीचे मिळाले!

कपिल पाटील हा ऑस्ट्रियातील क्रेम्स विद्यापीठात मास्टर प्रोग्रॅम मेडिकल ऍण्ड फार्मास्युटिकलसाठी 2011 ला गेला होता. कपिलला शासनातर्फे त्यासाठी देण्यात आले 35 हजार रुपये! कपिलने मास्टर डिग्री पूर्ण केली आणि सध्या तो जर्मनीतील बॉन युनिव्हर्सिटीत एन्ट्रन्सशीप करतोय. पीएच. डी.ची तयारीही सुरू आहे.

कपिल पाटीलच्या वडिलांनी मिल्ट्रीची पंधरा वर्षांची सेवा बजाविल्यानंतरही आणखी पाच वर्षे सेवा वाढवून घेतली होती. 2001 ला ते निवृत्त झाले. सध्या ते रांजणगाव एमआयडीसीत आयटीसी फूड कंपनीत नोकरीला आहेत.

जळगावच्या भूषण कॉलनीतील सुरेश पाटील व नंदिनीबाई वामनराव मुलींच्या शाळेतील पर्यवेक्षिका कामिनी पाटील यांचा मुलगा उज्ज्वल हा अमेरिका पीएच. डी. करतोय. उज्ज्वल याला 2010 मध्ये शिक्षणासाठी शासनाकडून 25 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली. उज्ज्वलचे वडील सुरेश पाटील 1993 ला सेवानिवृत्त झाले. तद्‌नंतर त्यांनी जिल्हा सैनिक कार्यालयात 2009 पर्यंत नोकरी केली.

एवढीच मिळते शैक्षणिक आर्थिक मदत
* शालेय शिक्षणासाठी वर्षातून एकदा एक हजार
* महाविद्यालयीन शिक्षणासाठी पाच हजार रुपये
* व्यावसायिक अभ्यासक्रम, पदवीसाठी दहा हजार
* पदविकेसाठी दयाळू सरकार देते पाच हजार रुपये
* परदेशात शिक्षणासाठी 35 हजार रुपये
* अन्य राज्यात शिक्षणासाठी दहा हजार रुपये
* स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीला दोन हजार रुपये
* संगणक प्रशिक्षण 30 आठवड्यांसाठी चार हजार
* 52 आठवड्यांसाठी 6 हजार, चार वर्षांपर्यंत आठ हजार


आणि मुलींच्या विवाहासाठी कमीच
* माजी सैनिकाच्या एका मुलीला चार हजार
* विधवेच्या दोन मुलींना प्रत्येकी सहा हजार
* युद्ध विधवेच्या सर्व मुलींना प्रत्येकी 11 हजार
* माजी सैनिक, विधवा यांच्या मृत्यूपश्‍चात सहा हजार

सैनिक कल्याण निधीत ध्वजनिधीच्या माध्यमातून जमा होणाऱ्या रकमेतून ही शिष्यवृत्ती दिली जाते. मागच्या वर्षापर्यंत परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या माजी सैनिक पाल्याला 25 हजार रुपये वर्षाला दिले जात होते. आता 35 हजार दिले जातात.
- कॅप्टन मोहन कुलकर्णी, सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव
माजी सैनिकांच्या मुलांसाठी केंद्राच्या पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सव्वा दोन लाखांची शिष्यवृत्ती मिळते. सध्याच्या काळात तीही तोकडी आहे. राज्य सरकारच्या योजनेतील 35 हजार रुपयांची मदत म्हणजे तर गंमतच आहे. शिष्यवृत्ती रकमेत वाढ हवीच.

- ईश्‍वर दयाराम मोरे, प्रदेश सचिव, कॉंग्रेस माजी सैनिक सेल, जळगाव
 
Esakal  सोमवार, 14 जानेवारी 2013 - 12:30 AM IST

No comments:

Post a Comment