SD Pages

Pages

Saturday, 15 August 2015

स्वातंत्र्यदिनी शौर्य पुरस्कार जाहीर

सैन्यदलांचे सर्वोच्च प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींनी सैन्यदल आणि निमलष्करी दलाच्या मिळून ६७ जवानांना शौर्य पुरस्कार द्यायला मान्यता दिली आहे.
यामध्ये ले. कर्नल नेक्टर संजेंबाम तसेच नायब सुभेदार राजेश कुमार (मरणोत्तर) यांना कीर्ती चक्रपुरस्कार घोषित करण्यात आला आहे.   
याशिवाय आज जाहीर झालेल्या या पुरस्कारांमध्ये १० शौर्य चक्र, एक बार टू सेना मेडल’, ४९ सेना शौर्य पदके, दोन नौसेना शौर्य पदके व तीन वायूसेना शौर्य पदकांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त राष्ट्रपतींनी आणखी २० उल्लेखनीय पुरस्कार लष्कर व निमलष्करी दलातील व्यक्तींना जाहीर केले. विविध लष्करी कारवायांमध्ये दिलेल्या लक्षणीय योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये तीन व्यक्तींना ऑपरेशन मेघदूत' करिता, १२ व्यक्तींना ऑपरेशन रक्षककरिता, एका व्यक्तीला ऑपरेशन ऑर्किडएका व्यक्तीला ऑपरेशन हिफाजततर तीन व्यक्तींना ऑपरेशन र्हीनोकरिता पुरस्कृत करण्यात आले आहे.  
शौर्यचक्र पुरस्कार विजेत्यांची नांवे पुढीलप्रमाणे :
१. कर्नल मुनींद्र नाथ रे, भूसेना
२. मेजर तनुज ग्रोव्हर, भूसेना
३. कॅप्टन वरून कुमार सिंग, भूसेना
४. हवालदार मान बहादूर छेत्री, भूसेना
५. हवालदार तनका कुमार लिम्बू, भूसेना
६. सीडीआर मिलिंद मोहन मोकाशी, नौसेना
७. कमांडर संदिप सिंग, वायूदल
८. दिवंगत मोहम्मद शफी शेख, हेड कॉन्स्टेबल, जम्मू-कश्मीर पोलीस
९. दिवंगत रेयाझ अहमद लोन, कॉन्स्टेबल, जम्मू-कश्मीर पोलीस
१०. दिवंगत हिरा कुमार झा, सहायक कमांडर, ७ बटालियन, सीआरपीएफ  

No comments:

Post a Comment