SD Pages

Pages

Sunday, 23 August 2015

माजी सैनिकांसाठी माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांची मुलगी रणांगणात

नवी दिल्ली : दिल्लीच्या जंतर-मंतरवर ‘वन रँक वन पेन्शन’च्या मागणीसाठी माजी सैनिक आंदोलन करत आहेत. माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंह यांची मुलगी मृणालिनी या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे माजी सैनिकांच्या आंदोलाना आणखी धार आली आहे.


दिल्लीच्या जंतर-मंतरवर माजी सैनिक मोदी सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. वन रँक वन पेन्शन योजना लवकरात लवकर अंमलात आणावी, अशी माजी सैनिकांची मागणी आहे. मोदी सरकारने प्रचारादरम्यान आणि सत्तेत आल्यानंतरही माजी सैनिकांना या योजनेबाबत आश्वास्त केलं होतं. मात्र, सत्तेत आल्यानंतर या योजनेबाबत चकारही काढला नाही. त्यामुळे माजी सैनिकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.

वाचा : ‘वन रँक वन पेन्शन’ म्हणजे काय?

माजी सैनिकांच्या दिल्लीतील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेल्या मृणालिनी यांनी सांगितले की, “मी माजी सैनिकाची मुलगी या नात्याने या आंदोलनात सहभागी झाले आहे. माजे आजोबाही सैनिक होते, वडील सैनिक होते, मीही सैनिक आहे आणि माझे पतीही सैनिक आहेत. त्यामुळे सैनिक या नात्याने मी या आंदोलनात सहभागी झाले आहे.”
“मला एक गोष्ट माहित आहे. ती म्हणजे, मोदीजी जे बोलतात, ते करतात. त्यामुळे मला विश्वास आहे की वन रँक वन पेन्शन योजना लवकरच सत्यात उतरेल.”, असेही मृणालिनी म्हणाल्या.

No comments:

Post a Comment