Sunday 3 March 2019

भारत आता 'चून-चून के बदला लेता है' : पंतप्रधान


वृत्तसंस्था

पटणा : देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांसाठी भारत आता गप्प बसत नाही. तर 'चून-चून के बदला लेता है', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच हवाई दलाकडून करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत विरोधकांकडून पुरावे मागितले जात आहेत, त्यावरही मोदींनी टीकास्त्र सोडले.

पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र, आता विरोधकांकडून या कारवाईचे पुरावे मागितले जात आहेत. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून भारतीय लष्कराचे खच्चीकरण का केले जात आहे? तसेच ज्या विधानांमुळे आपल्या शत्रूला फायदा होतो, अशी विधाने त्यांच्याकडून का केली जात आहेत, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकबाबत शंका नाही. पण अमेरिकेने लादेनचा खात्मा केल्यानंतर त्याचे पुरावे जगासमोर सादर केले होते. त्याचप्रमाणे भारतानेही एअर स्ट्राइकचे भक्कम पुरावे सादर करावेत, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर पंतप्रधान मोदींनी टीकास्त्र सोडले.

1 comment:


  1. LIC Merchant is the one stop Destination for Partners and Life Insurance Agents of Life Insurance Corporation of India.
    LIC Merchant Login

    ReplyDelete