Sunday 17 February 2019

पाकिस्तानविरुध्द इराणीचीही डरकाळी !


सकाळ वृत्तसेवा

दहशतवाद्यांना पोसण्याची मोठी किंमत पाकिस्तानला भोगावी लागेल, अशी डरकाळी इराणने फोडली आहे. इराणमध्ये रिवोल्यूशनरी गार्ड्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर इराणने पाकिस्तानवर ही तलवार रोखली.

बुधवारी झालेल्या सैनिकांच्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यातील षड्यंत्रात सामिल असणाऱ्यांना समर्थन देत असल्याचा पाकिस्तानवर इराण रिवाल्यूशनरी गार्ड्सचे कमांडर मेजर जनरल मोहम्मद अली जाफरी यांनी आरोप केला आहे. ते इराणच्या सरकारी वृत्तवाहीनीला मुलाखत देताना म्हटले, 'मुस्लीम धर्माला धोकादायक असलेले दहशतवादी कुठे आहेत, हे पाकिस्तान सराकारला माहित आहे. हा हल्ला दहशतवादी संघटना जैश-अल-अद्ल'ने केला आहे. पाकिस्तानच्या सैनिकांचे सुध्दा या दहशतवाद्यांना समर्थन आहे. पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांवर कारवाई करत शिक्षा दिली नाही तर आम्ही या दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देऊ आणि पाकिस्तानला सुध्दा दहशतवादी पोसण्याची किंमत मोजावी लागेल.' अशी चेतावणी कमांडर मेजर जनरल जाफरी यांनी पाकिस्तानला दिली आहे.

तसेच, कमांडर मेजर जनरल जाफरी यांनी तेहरानचे प्रादेशिक प्रतिस्पर्धी सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमीरातीवर दहशतवादी सुन्नी गटांना पाठिंबा देण्याचाही आरोप केला आहे. कमांडर मेजर जनरल जाफरी हे इराणी सैनिकांवर झालेल्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात मरण आलेल्या सैनिकांच्या अंत्यसंस्कारानंतर जमलेल्या इराण विसीयांना संबोधित करत होते.

No comments:

Post a Comment