Sunday 17 February 2019

दहशतवादाविरोधात एकजूट, सर्वपक्षीय बैठकीत त्रिसूत्री प्रस्ताव पारित

पुलवामा येथील भ्याड आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी दहशतवादाविरोधात एकजूट दाखवली.

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: February 16, 2019 02:38 PM | Updated: February 16, 2019 05:09 PM

The resolution passed at the all-party meeting | दहशतवादाविरोधात एकजूट, सर्वपक्षीय बैठकीत त्रिसूत्री प्रस्ताव पारितदहशतवादाविरोधात एकजूट, सर्वपक्षीय बैठकीत त्रिसूत्री प्रस्ताव पारित

ठळक मुद्दे14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत. या दु:खाच्या देशवासीयांबसोबरच सर्व पक्ष शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहेत., असे या ठरावात म्हटले आहे सीमेपलीकडून दहशतवादाला मिळत असलेल्या सर्व प्रकारच्या पाठिंब्याचा आम्ही निषेध करतोगेल्या तीन दशकांपासून भारत सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा सामना करत आहे. भारतात पसरलेल्या दहशतवादाला सीमेपलीकडून प्रोत्साहन मिळत आहे

नवी दिल्ली  - पुलवामा येथील भ्याड आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी दहशतवादाविरोधात एकजूट दाखवली. तसेच दहशतवाद्यांविरोधात होणाऱ्या कारवाईत सरकारसोबत उभे राहण्याचे आश्वासन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिले. तसेच दहशतावादाविरोधात त्रिसूत्री प्रस्ताव पारित करण्यात आला.
पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली असून, त्या पार्श्वभूमीवर आज संसद भवन परिसरात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी तीन ठराव पास करण्यात  आले.
1 : 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत. या दु:खाच्या देशवासीयांबसोबरच सर्व पक्ष शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहेत., असे या ठरावात म्हटले आहे.
2 :  सीमेपलीकडून दहशतवादाला मिळत असलेल्या सर्व प्रकारच्या पाठिंब्याचा आम्ही निषेध करतो.
3 :  गेल्या तीन दशकांपासून भारत सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा सामना करत आहे. भारतात पसरलेल्या दहशतवादाला सीमेपलीकडून प्रोत्साहन मिळत आहे. भारत या आव्हानाचा मिळून सामना करत आहे. दहशतवादाविरोधातील या लढाईत आम्ही सुरक्षा दलांसोबत संपूर्ण शक्तिनिशी उभे आहोत.

The resolution passed at the all-party meeting: We strongly condemn the dastardly terror act of 14th February at Pulwama in J&K in which lives of 40 brave jawans of CRPF were lost. pic.twitter.com/0OjGkgS6He

— ANI (@ANI) February 16, 2019


दरम्यान, या बैठकीवेळी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या अध्यक्षांची बैठक आयोजित करावी, अशी मागणी केली. त्याला सर्व पक्षांना पाठिंबा दिला. तसेच एकजूट होऊन सुरक्षा दलांसोबत उभे राहण्याचे आश्वासन दिले. 

Ghulam Nabi Azad, Congress: We had requested the Home Minister to request the PM on our behalf to ask Presidents of all national & regional parties for a meeting. This was supported by other parties too. The entire nation is in mourning today, is angry. #PulwamaAttackpic.twitter.com/cmLOKmcRfE

— ANI (@ANI) February 16, 2019


या बैठकीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह गृहसचिव राजीव गौबा, बीएसपी नेते सतीशचंद्र मिश्रा, आरजेडी नेते जेपी यादव, सीपीएमचे नेते टी. के. रंगराजन, फारुख अब्दुल्ला, के. वेणुगोपाल, टीआरएसचे नेते जितेंद्र रेड्डी, राम मोहन नायडू, गुलाम नबी आझाद, चंदू माजरा, नरेश गुजराल, टीएमसीचे डेरेक ओब्रायन, सुदीप बंडोपाध्याय, शरद पवार, आनंद शर्मा, संजय सिंह, शिवसेना नेते संजय राऊत, ज्योतिरादित्य शिंदे, उपेंद्र कुशवाह हे उपस्थित होते.

Delhi: All party meeting called by central govt. underway at the Parliament. #PulwamaAttackpic.twitter.com/OqeqgzteE1

— ANI (@ANI) February 16, 2019


http://www.lokmat.com/national/resolution-passed-all-party-meeting/

No comments:

Post a Comment