Sunday 17 February 2019

हवी थेट कारवाई (राहुल भोसले)

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) सुमारे 39 जवान हुतात्मा झाले. जवानांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंनी सबंध देशाचं काळीज हललं. संतापाची लाट पसरली. नेमक्‍या कोणत्या त्रुटींमुळं हा हल्ला झाला, भारतानं काय करायला पाहिजे आदी गोष्टींबाबत भाष्य.

rahul bhosale

गेली महिनाभर गुप्तचर संघटनांकडून मोठा हल्ला होण्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळत होती. त्यावर खबरदारीचा उपाययोजना करण्याची गरज होती. त्यात आपण कमी पडल्याचं या घटनेवरून दिसून येते. दुसरी गोष्टी अशी, की आत्मघाती हल्ला किंवा स्फोटकांनी भरलेल्या मोटारीचा स्फोट करण्यासाठी तीनशे किलो स्फोटकं वापरण्यात आली. ही स्फोटकं आली कुठून? तीनशे किलो स्फोटकं काही कमी नाहीत. एवढी स्फोटकं काश्‍मीरमध्ये आहेत, हे आपल्याला समजू शकलं नाही, हेही गुप्तचर यंत्रणांचं अपयश आहे. हल्ले होणार ही माहिती आदी मिळाली होती. गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाली, तर सुरक्षा यंत्रणांनी त्याकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष केलं, तर लष्करी जवानांना असा जीव गमवावा लागतो आणि अशा दुदैवी घटना आपल्याला पाहाव्या लागतात. गेल्या काही वर्षांतला हा सर्वांत शक्तिशाली हल्ला आहे. त्यामागं पाकिस्तानच आहे. दुसरं म्हणजे आपण "सर्जिकल स्ट्राइक' केल्यानंतर त्याचा एवढा गवगवा केला, की त्याची ही प्रतिक्रिया असू शकते. तुमचा "सर्जिकल स्ट्राइक' यशस्वी झालेला नाही, त्यापेक्षा जास्त नुकसान आम्ही पोचवू शकतो, असा संदेश त्यांनी या हल्ल्यातून दिला आहे. यापूर्वीही आत्मघातकी हल्ले झाले; पण ते संपले होते. तेच पुन्हा कसे सुरू झाले याचा अभ्यास करावा लागेल.
भविष्यातल्या दहशतवादी हल्ल्याचा हा नवा धोका आहे. त्याकडे गांभीर्यानं पाहावं लागेल. त्यासाठी धोरण निश्‍चित करावं लागेल. कारण हे काम एक माणूस करू शकत नाही. अनेक लोकांची ती टोळी असणार आहे. पुलवामातल्या हल्ल्यासाठी त्यांनी गाडी घेतली, त्यात स्फोटकं भरली. हल्ल्यासाठी माणूस तयार केला, हे सगळं एक माणूस करू शकत नाही. म्हणूनच अशा टोळ्या तातडीनं उद्‌ध्ववस्त करण्यासाठी नियोजन केलं पाहिजे. युद्धपातळीवर मोहीम आखली पाहिजे. त्यासाठी सरकारनं आता राजकीय इच्छाशक्ती दाखविली पाहिजे. दहशतवाद्यांचे अड्डे कुठे आहेत, याची माहिती लष्कराकडे आहे. त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी मिसाइलसारख्या यंत्रणा आपल्याकडे आहेत. त्यामुळं खरी गरज ही थेट कारवाईची आहे. सुरक्षा यंत्रणा त्या कामी लागल्या असतीलच, अशी अपेक्षा आहे.
(शब्दांकन : संतोष शाळिग्राम)

https://www.esakal.com/saptarang/rahul-bhosale-write-pulwama-terror-attack-and-jaish-e-mohammed-article-saptarang-171704

No comments:

Post a Comment