Tuesday 18 September 2018

पुणे वसतिगृह प्रवेश

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत मराठा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसर औंध पुणे येथे वसतिगृह सुरू करण्यात येत आहे.

( सदरचे वसतिगृह औंध पुणे विद्यापीठाजवळ , ब्रेमेन चौक येथे आहे , या ठिकाणाहून शिवाजीनगर पुणे , पिंपरी चिंचवड भागात जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे )

केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया द्वारे व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी, बिगर व्यवसायिक व उच्च शिक्षण अभ्यासक्रमांसाठी आणि इयत्ता ११ व १२ वी साठी शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांना कडून अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती व अर्जा चा नमूना

https://punehostel.wordpress.com/

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पूर्ण भरलेले अर्ज योग्य कागदपत्रासोबत दिनांक ११/०९/२०१८ ते २१/०९/२०१८ रोजी ०६:३० वाजेपर्यंत या कालावधीत कार्यलयीन वेळेत रिसेप्शन, सागर कॉम्प्लेक्स, नाशिक फाटा, कासारवाडी रेल्वे स्टेशन समोर, कासारवाडी, पुणे ४११०३४ अथवा

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसर औंध पुणे या पत्त्यावर जमा करावीत.

कृपया ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थी व शिक्षक यांच्यापर्यंत हि माहिती पाठवा

Children of ex servicemen are welcome.

Please contact

Major Milind Tungar (retd)

Mob 9423039599

District collector off

No comments:

Post a Comment