Saturday 11 August 2018

व्याप्त काश्‍मीरातील बांधकाम थांबवा.

 

भारताची चीनला लेखी सूचना
नवी दिल्ली - चीनने पाकिस्तानच्या मदतीने पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरात काही बांधकाम सुरू केले आहे त्यांना ते काम थांबवण्यास सांगण्यात आले आहे अशी माहिती सरकारच्यावतीने राज्यसभेत देण्यात आली. संरक्षण राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी या विषयावर माहिती देताना सांगितले की संपुर्ण जम्मू काश्‍मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे अशी भारताची सातत्याची भूमिका आहे त्यामुळे पाकिस्तान व्याप्त काश्‍मीर हा भारताचाच भाग असल्याने तेथे चीनला भारताच्या संमती शिवाय काहींही करता येणार नाही.

आमची ही भूमिका आम्ही त्यांना कळवली आहे असे सिंह यांनी सांगितले. पाकिस्तानने काश्‍मीरचा काही भाग बळजबरीने आपल्या ताब्यात घेतला असून त्यांचा तेथील ताबा बेकायदेशीर आहे. चीनने त्या हद्दीत सुरू केलेल्या कामाची भारत सरकारला कल्पना असून सर्वोच्च पातळीवर आम्ही हा विषय चीनशी उपस्थित केला आहे.

चीनच्या पाक व्याप्त काश्‍मीरातील बांधकामामुळे भारताच्या अंतर्गत व्यवहारात ढवळाढवळ होत असून हा आमच्या स्वायत्ततेचाही भंग आहे असे आम्ही त्यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद केल्याचेही सिंह यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment