Sunday 14 January 2018

प्रेरणादायी व्यक्तींच्या कथा पुस्तकात याव्यात - एअर मार्शल बी. एन. गोखले (निवृत्त)

 

clip_image001 

एअर मार्शल बी. एन. गोखले गोखले (निवृत्त) : "अपराजित चैतन्यदायी झुंजीला सलाम" पुस्तकाचे प्रकाशन

पुणे - राष्ट्रीय संरक्षण अकादमीत प्रशिक्षण घेत असताना दिवंगत अधिकारी अनिलकुमार यांना अपघातामुळे अपंगत्व आले. मात्र, त्यांनी आपल्या संघर्षमय जीवनकहाणीतून तरुणांसमोर आदर्श निर्माण केला. विविध विषयांवर लिखाण केले. याची दखल घेत केंद्र सरकारने दहावीच्या पुस्तकात त्यांच्या कहाणीचा केलेला समावेश दोन वर्षापुर्वी काढला. ही खेदाची बाब असून उभ्या आयुष्यात जीवनाशी संघर्ष करुन प्रेरणादायी कहाणी रचलेल्या व्यक्तींच्या कथा पुस्तकामध्ये असाव्यात अशी अपेक्षा निवृत्त एअर मार्शल बी. एन. गोखले यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय संरक्षण अकादमीत (एनडीए) प्रशिक्षण घेत असताना दिवंगत अधिकारी अनिलकुमार यांना अपघातामुळे आलेले विकलांगत्व आणि त्यांनी त्यावर मात करण्यासाठी दिलेली अभूतपूर्व झुंज यावर आधारित त्यांचे प्रेरणादायी जीवनचरित्र असलेल्या "अपराजीत - चैतन्यदायी झुंजीला सलाम' या पुस्तकाचे प्रकाशन गोखले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अनिलकुमार यांचे वर्गमित्र आणि भारतीय वायुसेना दलात कार्यरत असलेले व अनिलकुमार यांच्या व्यक्तीचरीत्रावर लिखाण केलेले मूळ इंग्रजी पुस्तकांचे लेखक एअर कमांडर नितीन साठे, मराठी अनुवादक सुनीती जैन, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर आदी उपस्थित होते.

जैन म्हणाल्या, एनडीएत प्रशिक्षण घेतानाच अनिलकुमार यांना अपंगत्व आले. परंतु त्यांनी लिद्द न सोडता शारीरिक अपंगत्व असून देखील तोंडात पेन धरुन लिखाण केले. ते एका दैनिकात प्रसिध्द देखील झाले. त्यातूनच केंद्र सरकारने त्यांच्या कथेचा शालेय पुस्तकात समावेश केला. त्यांच्या या संघर्षमय जीवनाच्या कहाणीने आज अनेक तरुणांना प्रेरणा मिळते. एनडीएमध्ये शिक्षण घेत असताना त्यातुन मिळणाऱ्या प्रेरणेमुळेच ते सर्वकाही करू शकल्याचे जैन यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाटकर यांनी केले

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/preranadayi+vyaktinchya+katha+pustakat+yavyat+gokhale-newsid-79840638

No comments:

Post a Comment