Saturday 30 December 2017

लोकमान्यांच्या सिंहगर्जनेला १०१ वर्षे पूर्ण

पुणे - लोकमान्य टिळक यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच’, ही सिंहगर्जना करून सामान्यांच्या मनातील ब्रिटिशांविरूद्धचा असंतोष जागा केला. या घोषणेला यंदा १०१ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ‘सकाळ प्रकाशन’ प्रसिद्ध करीत असलेल्या अरुण तिवारी यांच्या ‘ए मॉडर्न इन्टरप्रिटेशन ऑफ लोकमान्य टिलक्‍स्‌ गीतारहस्य’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

लखनौ येथील लोकभवनात शनिवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक हे या पुस्तकाचे प्रकाशन करतील. सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावेत, या उद्देशाने उत्तर प्रदेश व महाराष्ट्र सरकारमध्ये सामंजस्य करारही होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, डॉ. दिनेश शर्मा, संसदीय कार्यमंत्री सुरेश कुमार खन्ना, महिला व बाल कल्याणमंत्री रिटा बहुगुणा जोशी, युवक कल्याण राज्यमंत्री डॉ. नीलकंठ तिवारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी उपस्थित राहणार आहेत.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेले मंगल पांडे, तात्या टोपे, बहादूर शाह जफर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, अशफाक उल्ला खान, चंद्रशेखर आझाद, ठाकूर रोशन सिंह, रामकृष्ण खत्री, शचिंद्रनाथ बक्षी, दीनदयाळ उपाध्याय, उधमसिंह, महावीर सिंह, चापेकर बंधू, विष्णू पिंगळे, एस. आर. राणा, ठाकूर दुर्गा सिंह, राघव, सरयुशरण यांच्या वंशजांनाही याप्रसंगी सन्मानित करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक आणि त्यांच्या पत्नी, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्यासह हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे वंशज रवींद्र पिंगळे, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे वंशज सत्यशील आणि हर्षवर्धन राजगुरू, हुतात्मा चापेकर बंधूंचे वंशज चेतन चापेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वंशज सात्यकी यांनाही या समारंभासाठी निमंत्रित केले आहे.

लोकमान्य टिळकांनी लखनौमध्ये ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, ही घोषणा केली. त्याच शहरात हा ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे. शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनाही उत्तर प्रदेश सरकारने या कार्यक्रमासाठी सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे लोकमान्यांचे कार्य जनमानसात निश्‍चितच पोचेल, असा मला विश्‍वास आहे. महाराष्ट्राबाहेर लोकमान्यांच्या कार्याचा गौरव होताय, हे कौतुकास्पद असून उत्तर प्रदेश सरकारचे मी मनापासून आभार मानते.
- मुक्ता टिळक, महापौर, पुणे महापालिका

सकाळ वृत्तसेवा 07.11 AM

http://www.esakal.com/pune/pune-news-lokmanya-tilak-book-publish-89701

No comments:

Post a Comment