Thursday 8 June 2017

शेजारी राष्ट्रांशी दोन हात करण्यासाठी भारतीय लष्कर पुर्णपणे सज्ज - लष्करप्रमुख

नवी दिल्ली – लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी भारतीय लष्कर एकाचवेळी देशाबाहेरील आणि देशांतर्गत धोक्यांशी सामना करण्यासाठी पुर्णपणे सज्ज असल्याचे सांगितले आहे. भारतीय लष्कर शेजारी राष्ट्रांशी दोन हात करण्यासाठी पुर्णपणे तयार असल्याचा विश्वास बिपीन रावत यांनी व्यक्त केला आहे. एकाचवेळी चीन, पाकिस्तान आणि देशांतर्गत धोक्यांचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर तयार असल्याचे बिपीन रावत म्हणाले आहेत.

लष्करप्रमुख बिपीन रावत जम्मू काश्मीरमधील परिस्थिती लवकरच सुधारेल असेही बोलले आहेत. पाकिस्तान तरुणांना सोशल मिडियाच्या माध्यमातून भडकावत असल्याचा आरोपही बिपीन रावत यांनी यावेळी केला आहे. सोशल मीडियाचा वापर करत पाकिस्तान काश्मीरमधील तरुणांमध्ये चुकीची माहिती पसरवत असल्याचे बिपीन रावत बोलले आहेत. पाकिस्तान राज्यात अस्थिरता निर्माण व्हावी यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असून यासाठी सोशल मीडियाचा वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment