Friday 9 June 2017

पॅनकार्डसाठी आधारकार्ड आवश्यक की नाही?; आज होणार फैसला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पॅनकार्डसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयावर शुक्रवारी सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. आयकर कायद्यानुसार आयकर रिटर्न आणि पॅनकार्डसाठी आधार नंबर अनिवार्य करण्यात आला आहे. याआधी आयकर भरण्यासाठी फक्त पॅन कार्ड आवश्यक होते. आयकर कायद्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या या कलमाच्या संविधानिक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका कोर्टात दाखल झाल्या आहेत.

न्यायमुर्ती ए.के. सिकरी आणि अशोक भूषण यांनी याबाबतच्या याचिकांवरचा निर्णय ४ मे रोजी सुरक्षित ठेवला होता. वर्ष २०१७-१८च्या अर्थसंकल्पात आयकर कायद्याच्या कलम १३९ अअ लागू करण्यात आलं होतं. ज्यानुसार आयकर रिटर्न भरण्यासाठी आणि पॅनकार्ड बनवण्यासाठी आधारकार्ड नंबर अनिवार्य करण्यात आलं आहे. जास्तीत जास्त लोकांना कराच्या कक्षेत आणण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. देशभरात ६ कोटी लोक आयकर भरतात आणि त्यांच्याकडे पॅन कार्ड आहेत. आयकर भरण्यासाठी आधारकार्ड सक्तीचे केल्यास कर चुकवणाऱ्यांवर नजर ठेवणे सोपे होईल या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतला. तसेच बनावट पॅनकार्ड बनवणाऱ्यांनाही चाप बसेल.
त्यामुळे सुप्रीम कोर्ट याबाबत काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment