Thursday 8 June 2017

हिंदुस्थान एकाचवेळी पाकिस्तान, चीनशी लढण्यास तयार!: लष्करप्रमुख

 

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान शेजारी देशांनी दिलेल्या आव्हानांचा सामना करण्यास सज्ज आहे. एकाचवेळी पाकिस्तान, चीन, दहशतवाद आणि नक्षलवाद या आव्हानांशी लढण्याएवढे हिंदुस्थानचे लष्कर सक्षम असल्याचे लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणाले. जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती लवकरच सुधारेल असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

पाकिस्तान सोशल मीडियाच्या मदतीने चुकीची माहिती पसरवून कश्मीरमधील तरुणांची दिशाभूल करत आहे. या बनावट प्रचाराला आळा घालण्यासाठी लष्कराने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळू लागले आहे, असे लष्करप्रमुख रावत यांनी सांगितले. कश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तान तसेच कश्मीर खोऱ्यातील काही जण प्रयत्न करत आहेत. मात्र अशा शत्रूचा बीमोड करण्यासाठी ठोस पावले उचलत आहोत, असे लष्करप्रमुख म्हणाले.

सैन्याच्या तिन्ही दलांचे वेगाने आधुनिकीकरण सुरू आहे. सैन्याच्या तिन्ही दलांचा भर ३० टक्के जुनी, ४० टक्के कमी वापराची आणि ३० टक्के आधुनिक शस्त्रे वापरण्यावर असल्याचे लष्करप्रमुखांनी सांगितले

No comments:

Post a Comment