Friday 26 May 2017

देशातल्या सर्वांत लांब पुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

भूपेन हजारिका यांच्या नावाने पुलाचे नामकरण होणार

नवी दिल्ली-आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या 9.15 किलोमीटरच्या देशातल्या सर्वांत लांब पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकार्पण केले. या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील दळणवळण सुलभ होणार असून प्रवासाचा मोठा वेळही वाचणार आहे. पुलाच्या उद्‌घाटनानंतर पंतप्रधानांनी काही मिनिटे पुलावरून पायी प्रवास केला. या पुलाच्या उद्‌घाटनामुळे या भागातल्या जनतेची दीर्घकालीन प्रतीक्षा समाप्त झाली आहे, असे पंतप्रधानांनी धोला येथे जाहीर सभेत बोलताना सांगितले. धोला-सदिया पुलाला महान संगीतकार-गीतकार-कवी भूपेन हजारिका यांचे नाव देण्यात येणार आहे.

पंतप्रधान म्हणाले, विकासासाठी, पायाभूत सोयीसुविधा सर्वांत महत्त्वाच्या आहेत आणि जनतेच्या आशा-आकांक्षाची पूर्तता करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश यामधले दळणवळण वाढणार असून आर्थिक विकासाची दारेही मोठ्या प्रमाणात खुली होणार आहेत. देशाचा पूर्व आणि ईशान्य भागात आर्थिक विकासाची मोठी क्षमता आहे. या पुलामुळे जनतेच्या जीवनात सकारामक बदल घडेल. केंद्र सरकार, जलमार्गच्या विकासावर मोठा भर देत असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. देशाच्या ईशान्य भागातचे इतर भागांशी दळणवळण वाढवण्याला केंद्र सरकारचे प्राध्यान्य असून यादृष्टीने वेगाने काम सुरू आहे. ईशान्य भागाशी उत्तम दळणवळण सुविधांमुळे दक्षिण-पूर्व आशियाच्या अर्थव्यवस्थेशीही हा भाग जोडला जाणार आहे.

ईशान्येकडच्या भागात पर्यटनाच्या अमाप संधी असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधल्या गोगामुख येथे आयएआरआय अर्थात भारतीय कृषी संशोधन संस्थेचे भूमिपूजन केले. या विभागाच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन आधुनिक शेती आणि तंत्रज्ञानाच्या गरजेवर त्यांनी भर दिला. देशभरात मोठ्या प्रमाणात उभारण्यात येत असलेल्या मृदा आरोग्य परीक्षण प्रयोगशाळा आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरत असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. ईशान्येकडच्या प्रदेशात दळणवळण वाढवण्यासाठी रेल्वे, महामार्ग, हवाई मार्ग, जलमार्ग आणि आयवेज हे पाच पंचतत्त्व पंतप्रधानांनी सांगितली.

No comments:

Post a Comment