Wednesday 17 May 2017

राज्यात तलाठ्यांची मोठी भरती, मंत्रीमंडळाची भरतीला मंजूरी

राज्यातील वाढते नागरीकरण आणि लोकसंख्या विचारात घेऊन महसूल खात्याच्या कांमाना गती यावी आणि ग्रामस्थांना जलद सेवा मिळावी म्हणून राज्यात पुढील ४ वर्षात नवीन ३१६५ तलाठ्यांची भरती होणार आहे. तसेच ५२८ महसूल मंडळांच्या निर्मितीलाही मान्यता देण्यात आली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यात सध्या अस्तित्वात असणाऱ्या रचनेनुसार प्रत्येकी सहा तलाठी कार्यालये मिळून एक महसूल मंडळ आहे. राज्यात एकूण १२ हजार ३२७ तलाठी व २ हजार ९३ महसुली मंडळे कार्यरत आहेत. परंतु वाढते नागरीकरण आणि लोकसंख्या यांचा विचार करता ही व्यवस्था अपुरी पडत असल्याचे लक्षात घेऊन तलाठी कार्यालयांच्या पुनर्रचनेसाठी नागपूर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीकडून नवीन पदे एकाच वेळी मंजूर करून घेऊन ही पदे पुढील चार वर्षात टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात महापालिका, ‘अ’ व ‘ब’ नगरपरिषदा क्षेत्र आणि क वर्ग नगरपरिषदा यांचा विचार करुन या नागरी भागातील ४१५ व आदिवासी क्षेत्रातील ३५१ अशा एकूण ७६६ नवीन तलाठी व १२८ महसूल मंडळांची निर्मिती यंदाच्या वर्षामध्ये करण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात ८०० तलाठी व १३३ महसूल मंडळे निर्माण करण्यात येतील,तर तिसऱ्या टप्प्यात या ८०० व ७९३ तलाठी आणि १३३ व १३४ महसूल मंडळांची निर्मिती करण्यात येणार आहे.

मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार निर्माण करण्यात येणाऱ्या तलाठी साझे आणि महसूल मंडळांच्या निर्मितीत कोकण विभागात येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ७४४ तलाठी आणि १२४ महसूल मंडळांची निर्मिती करण्यात आली आहे. अन्य विभागनिहाय माहिती पुढीलप्रमाणे –

नाशिक- (६८९), (११५), पुणे- (४६३), (७७), संभाजीनगर- (६८५), (११४), नागपूर-(४७८), (८०), अमरावती-१०६ तलाठी व १८ मंडळे असा समावेश आहे.

Dailyhunt सामना प्रतिनिधी । मुंबई

No comments:

Post a Comment