Sunday 2 April 2017

अॅमेझॉनच्या चुकीला माफी नाही

 

नवी दिल्ली - अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर जानेवारी महिन्यात भारतीय राष्ट्रध्वजाच्या पायपुसण्या आणि चप्पला विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे भारतातील वातावरण चांगलेच तापले होते, त्यामुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अॅमेझॉनला चांगलेच फैलावर धरले होते. अशा उत्पादनांची विक्री जर लगेच थांबवली नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल अशी धमकी स्वराज यांनी दिली होती, अॅमेझॉनने त्यानंतर लगेच माफी मागत ही सारी उत्पादने आपल्या साईट्सवरून हटवली होती. पण अॅमेझॉनच्या माफीवरच हे प्रकरण थांबले नाही आता अॅमेझॉनवर कारवाई करण्यासाठी भारताने आणखी एक पाऊल उचलले असल्याचे समजत आहे.

याबाबत वृत्तसंस्थेला मिळालेल्या महितीनुसार अमेरिका आणि कॅनडाच्या दूतावासात भारताने काही दस्ताऐवज पाठवली आहे.

अॅमेझॉनच्या वरिष्ठांसमोर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी हा मुद्दा उपस्थित करा अशी मागणी या दस्ताऐवजात केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अमेझॉनच्या वरिष्ठापुढे तितक्याच ताकदीने हा मुद्दा उपस्थित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ माफी मागून हे प्रकरण निवळणार नाही, हे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. तसेच भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे कोणतेही उत्पादन अॅमेझॉनच्या कोणत्याही संकेतस्थळावर यापुढे दिसणार नाही अशी हमी देखील भारताने मागितली असल्याचे समजत आहे.

No comments:

Post a Comment